28-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, हे ज्ञान तुम्हाला शांत बनवते, या ज्ञानानी काम-क्रोधाची आग नष्ट होऊन जाते, भक्ती केल्यानी ही आग नष्ट होत नाही...!!

प्रश्न:-
आठवणीमध्ये महत्त्वाची मेहनत कोणती आहे?

उत्तर:-
बाबांच्या आठवणीमध्ये बसल्यानंतर शरीराचीही आठवण यायला नको. आत्म-अभिमानी बनून बाबांची आठवण करा, हीच मेहनत आहे. यामध्येच विघ्न येतात. कारण अर्ध्याकल्पापासून देह-अभिमान राहण्याची सवय लागली आहे. भक्ती म्हणजे देहाची आठवण.

ओम शांती।
तुम्ही मुले जाणता आठवण करण्यासाठी एकांत असणे खुप आवश्यक आहे. जेवढे तुम्ही एकांत किंवा शांती मध्ये बाबांची आठवण करु शकता तेवढी घोळक्या मध्ये नाही करु शकत. शाळेमध्ये ही मुले शिकतात तर एकांतामध्ये जाऊन अभ्यास करतात. येथेही एकांत पाहिजे. फिरायला जाता तिथेही आठवण करणे महत्त्वाचे आहे. शिक्षण तर खुप सोपे आहे. कारण अर्धाकल्प मायेचे राज्य आल्यामुळे तुम्ही देह-अभिमानी बनले आहात. पहिला-पहिला शत्रु आहे देह-अभिमान. बाबांची आठवण न करता देहाची आठवण करतात. याला देहाचा अहंकार म्हटले जाते. येथे तुम्हा मुलांना सांगितले जाते. आत्म अभिमानी बना, यामध्ये मेहनत आहे. आता भक्ती तर सुटली. भक्ती शरीरासोबत करतात. तीर्थयात्रेला शरीरासोबत जावे लागते. दर्शन घेण्यासाठी, काही करण्यासाठी शरीराला जावे लागते. येथे तुम्हाला हेच चिंतन करायचे आहे की मी आत्मा आहे, आम्हाला परमपिता परमात्मा पित्याची आठवण करायची आहे. बस जेवढी आठवण कराल तेवढे पाप नष्ट होतील. भक्तीमार्गात तर कधी पाप नष्ट होत नाहीत. कुणी वृध्द असेल तर मनामध्ये हा गैरसमज असतो की आम्ही भक्ती नाही केली तर नुकसान होईल,‍ नास्तिक बनून जाऊ. भक्तीची जशी आग लागलेली आहे. ज्ञानामध्ये आहे शितलता. यामध्ये काम-क्रोधाची आग नष्ट होऊन जाते. भक्तीमार्गामध्ये मनुष्य किती भावना ठेवतात, मेहनत करतात, समजा बद्रीनाथाला गेले आणि मुर्तीचा साक्षात्कार झाला मग काय? लगेच भावना बसते. नंतर बद्रीनाथच्या शिवाय दुसऱ्या कुणाचीही आठवण बुध्दीमध्ये राहत नाही. पुर्वी तर चालत जात हाते. बाबा म्हणतात मी थोड्यावेळासाठी मनोकामना पुर्ण करतो. साक्षात्कार करवतो. बाकी मी त्यांना भेटत नाही. माझ्याशिवाय वारसा थोडाच मिळेल. वारसा तर तुम्हाला माझ्याकडूनच भेटणार आहे. हे तर सर्व देहधारी आहेत. वारसा एकच बाप रचयिता कडून मिळतो, बाकी जे पण आहे जड किंवा चैतन्य ती सर्व आहे रचना. रचनेकडून कधी वारसा भेटू शकत नाही. पतित-पावन एकच पिता आहे. कुमारींना तर संग-दोषापासून खुप सांभाळून राहायचे आहे. बाबा म्हणतात या पतित पणामुळे तुम्ही आदि-मध्य-अंत दु:ख प्राप्त करता. आता सर्व आहेत पतित. तुम्हाला आता पावन बनायचे आहे. निराकार बाबा येऊन तुम्हाला शिकवतात. असे कधी नका समजू की ब्रह्मा शिकवतात, सर्वांची बुध्दी शिवबाबांकडे राहायला पाहिजे. शिवबाबा यांच्याद्वारे शिकवतात. दादींना सुध्दा शिकवणारा शिवबाबा आहे. त्यांची काय विचारपूस करणार! तुम्ही शिवबाबांसाठी द्राक्षे, आंबे घेऊन येता, शिवबाबा म्हणतात मी तर अभोक्ता आहे. सर्वकाही तुम्हा मुलांसाठी आहे. भक्तांनी भोग लावला आणि वाटून खाल्ला. मी थोडीच खातो. बाबा म्हणतात मी तर येतो तुम्हा मुलांना शिकवून पावन बनवण्यासाठी, पावन बनून तुम्ही एवढे उंच पद मिळवाल. माझा धंदा हा आहे. म्हणतातच शिव भगवानुवाच. ब्रह्मा भगवानुवाच तर म्हणत नाहीत खुशाल हे मुरली चालवतात परंतू नेहमी असेच समजा शिवबाबा चालवतात. कोणत्या मुलाला चांगला तीर (बाण) लागणार असेल तर स्वत: प्रवेश करतील. ज्ञानाचा बाण तीव्र आहे असे म्हणतात ना. विज्ञानामध्ये किती शक्ती आहे. बॉम्ब इ.चा किती धमाका होतो. तुम्ही किती शांतीमध्ये राहता. विज्ञानावर शांती विजय प्राप्त करते.

तुम्ही या सृष्टीला पावन बनवता. सुरुवातीला स्वत:ला पावन बनवायचे आहे. ड्रामानुसार पावनही बनायचे आहे. म्हणून विनाशाचीही नोंद आहे. नाटकाला समजून खुप हर्षित राहिले पाहिजे. आता आम्हाला जायचे आहे. शांतीधामला बाबा म्हणतात ते तुमचे घर आहे. घरी तर आनंदाने जायला पाहिजे ना. यामध्ये देही-अभिमानी बनण्याची खुप मेहनत करायची आहे. या आठवणीच्या यात्रेवरच बाबा खुप जोर देतात, यामध्येच मेहनत आहे. बाबा विचारतात चालता-फिरता आठवण करणे सोपे आहे, का एका जागेवर बसून आठवण करणे सोपे आहे. भक्ती मार्गातही किती माळा जपतात, राम-राम जपतात. फायदा तर काहीच नाही बाबा तर तुम्हा मुलांना एकदम सोपी युक्ती सांगतात-भोजन बनवा. काहीही करा, बाबांची आठवण करा. भक्तीमार्गात श्रीनाथ मंदीरात भोग बनवतात तेव्हा तोंडाला पट्टी बांधतात. जराही आवाज होत नाही. तो आहे भक्तीमार्ग, तुम्हाला तर बाबांची आठवण करायची आहे. ते लोक एवढा भोग लावतात. मग ते खातात थोडीच. पण्डे लोकांचे कुटूंब असतात. ते खातात तुम्ही येथे जाणता की आम्हाला शिवबाबा शिकवतात. भक्तीमध्ये थोडीच हे समजतात की आम्हाला शिवबाबा शिकवतात. जरी शिव पुराण बनवले आहे, परंतू त्यामध्ये शिव-पार्वती, शिव-शंकर सर्व मिसळले आहे, ते वाचल्यानी काही फायदा होत नाही. प्रत्येकाला आपले ग्रंथ वाचले पाहिजे. भारतवासींची आहे एक गीता. त्यामध्येच ज्ञान आहे. ज्ञानच शिकले जाते. तुम्हाला न घ्यायचे आहे. लढाई इ.च्या गोष्टी ज्या पुस्तकांमध्ये आहेत, त्यांच्याशी तुमचे काही कामच नाही. आम्ही आहोत योगबळवाले मग बाहुबल (शारि रीक बळ) वाल्यांच्या गोष्टी का ऐकायच्या! तुमची वास्तवामध्ये लढाई नाही. तुम्ही योगबळाद्वारे 5 विकारांवर विजय प्राप्त करता. तुमची लढाई आहे 5 विकारांसोबत, ते तर मनुष्य मनुष्यांबरोबर लढाई करतात. तुम्ही आपल्या विकारांशी लढाई लढता. या गोष्टी सन्यासी इ. समजावू शकत नाहीत. तुम्हाला कोणती योगासने इ. पण शिकवली जात नाहीत. तुमची योगासने आहे एकच, तुमचा आहे योगबळ. आठवणीच्या बळाद्वारे 5 विकारांवर विजय प्राप्त करता. हे 5 विकार दुश्मन आहेत. त्यामध्येही नंबरवन आहे देह-अभिमान. बाबा म्हणतात, तुम्ही तर आत्मा आहात ना. तुम्ही आत्मे येता, येऊन गर्भामध्ये प्रवेश करता. मी तर या शरीरामध्ये विराजमान झालो आहे. मी काही गर्भामध्ये थोडीच जातो. सतयुगामध्ये तुम्ही गर्भ महलमध्ये राहता, नंतर रावण राज्यामध्ये गर्भजेल मध्ये जाता. मी तर प्रवेश करतो. याला दिव्य जन्म असे म्हटले जाते. ड्रामानुसार मला यांच्यामध्ये यावे लागते. यांचे नाव ब्रह्मा ठेवतो कारण माझा बनला आहे ना. दत्तक घेतल्यावर नावे किती छान-छान ठेवतात. तुमचीही खुप छान-छान नावे ठेवली. लिस्ट खुप मजेशीर आली होती, संदेशीच्या द्वारे बाबांच्या लक्षात सर्व नावे थोडीच आहेत. नावाशी तर काही काम नाही. शरीरावर नाव ठेवले जाते ना. आता तर बाबा म्हणतात स्वत:ला आत्मा समजा, बाबांची आठवण करा. बस तुम्ही जाणता आम्ही पुज्य देवता बनतो नंतर राज्य करु. नंतर भक्तीमार्गामध्ये आमचेच चित्र बनणार. देवीची खुप चित्र बनवतात. आत्म्यांची ही पुजा होते. मातीचे साळीग्राम बनवतात. नंतर रात्री तोडून टाकतात. देवींचीही सजावट करुन, पुजा करुन नंतर समुद्रात टाकून देतात. बाबा म्हणतात माझे ही रुप बनवून, खायला-प्यायला घालून नंतर मला म्हणतात तो दगड-धोंड्यात आहे. सर्वांत जास्त दुर्दशा तर माझी करतात. तुम्ही किती गरीब बनले आहात. गरीबच नंतर उच्च पद प्राप्त करतात. साहुकार खुप कमी येतात. बाबा पण साहुकारांचे, एवढे घेऊन काय करणार! येथे तर मुलांच्या थेंबा थेंबानी हे घर (सेंटर) इ. बनवतात. म्हणतात बाबा आमची एक वीट लावा. समजतात त्यांच्या बदल्यात आम्हाला सोन्या-चांदीचे महल मिळणार. तिथे तर सोने भरपुर असते. सोन्याच्या वीटा असतील तेव्हा तर घरे बनतील तर बाबा खुप प्रेमानी सांगतात- गोड गोड मुलांनो, आता माझी आठवण करा, आता नाटक पुर्ण होत आहे.

बाबा गरीब मुलांना साहुकार बनण्याची युक्ती सांगतात. गोड मुलांनो, तुमच्याजवळ जे काही आहे ते बदली करा. येथे तर काहीच राहणार नाही, येथे जे बदली कराल, ते नवीन दुनियेमध्ये तुम्हाला 100 पटीने जास्ती मिळेल. बाबा काही मागत नाहीत. तो तर दाता आहे, ही युक्ती सांगितली जाते. येथे तर सर्व मातीमध्ये मिसळून जाणार आहे. काही बदली केले तर तुम्हाला नवीन दुनियेत भेटेल. या जुन्या दुनियेच्या विनाशाची वेळ आहे. हे काहीच उपयोगी पडणार नाही म्हणून बाबा म्हणतात. घरा-घरांमध्ये युनिवसिटी (विद्यापीठ) कम हॉस्पीटल खोला, ज्याद्वारे आरोग्य आ धन मिळेल. हेच महत्त्वाचे आहे. अच्छा. गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास 12-03-68
यावेळी तुम्ही गरीब साधारण माता पुरुषार्थ करुन उच्च पद प्राप्त करता. यज्ञामध्ये मदत इ. माता खुप करतात, पुरुष खुप थोडे आहेत जे मदतगार बनतात. मातांना वारस बनण्याचा नशा राहत नाही. ती बाबांच्या कार्यामध्ये मदत करत राहते, आपले जीवन बनवत राहते. तुमचे ज्ञान सत्य आहे. बाकी आहे भक्ती. आत्मिक पिता येऊन ज्ञान देतो. बाबांना ओळखले तर बाबांकडून वारसा नक्की घेणार. तुम्हांकडून बाबा पुरुषार्थ करवून घेतात. समजावत राहतात वेळ वाया घालवू नका. बाबा जाणतात कुणी चांगले पुरुषार्थी आहेत कुणी मध्यम, कुणी कनिष्ठ. बाबांना विचारले तर बाबा लगेच सांगतील. तुम्ही पाहिले आहात, का दुसरे, का तिसऱ्या क्रमांकावर आहात. पुरावा देत नाहीत तर बाबा असेच म्हणणार ना. भगवान येऊन जे ज्ञान शिकवतो ते नंतर लोप होऊन जाते. हे कुणालाच माहित नाही. ड्रामाच्या प्लॅननूसार हा भक्तीमार्ग आहे. याद्वारे कुणी मला प्राप्त करु शकत नाही. सतयुगात कुणी जाऊ शकत नाहीत. आता तुम्ही मुले पुरुषार्थ करत आहात. कल्पापुर्वी प्रमाणे जेवढा ज्याने पुरुषार्थ केला आहे, तेवढा करत राहतात. बाबा समजू शकतात. आपले कल्याण कोण करु शकतात. बाबा तर म्हणतात रोज या लक्ष्मी-नारायणाच्या चित्रासमोर येऊन बसा. बाबा तुमच्या श्रीमतावर हा वारसा आम्ही नक्की घेऊ. आपसमान बनवण्याच्या सेवेची खुप आवड पाहिजे. सेंटरवाल्यांनाही लिहतो, एवढे वर्ष ‍शिकत आहात कुणाला शिकवू शकत नाही तर मग काय शिकलात. मुलांची प्रन्नती तर केली पाहिजे ना. बुध्दीमध्ये संपूर्ण दिवस सेवेचे विचार चालायला पाहिजेत.

तुम्ही वानप्रस्थी आहात ना. वानप्रस्थींचे ही आश्रम असतात. वानप्रस्थींच्या जवळ जायला पाहिजे. मरण्यापूर्वी लक्ष्य तर सांगितले पाहिजे. वाणींच्या पलीकडे तुमची आत्मा कशी जाणार. पतित आत्मा तर जावू शकत नाही. भगवानूवाच माझी आठवण करा तर तुम्ही वानप्रस्थ मध्ये निघून जाल. वाराणसी मध्येही सेवा खुप आहे. खुप साधू लोक काशीवास साठी तिथे जातात, संपूर्ण दिवस म्हणत राहतात, शिवकाशी विश्वनाथ गंगा, तुमच्या मनामध्ये सदैव खुशीच्या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. विद्यार्थी आहात ना. सेवा पण करता,‍ शिकता पण बाबांची आठवण करायची आहे. वारसा घ्यायचा आहे. आता आम्ही शिवबाबांच्या जवळ जातो. हे मनमनाभव आहे. परंतू खुप जणांना आठवण राहत नाही. परचिंतन करत राहतात. मुख्य गोष्ट आहे आठवणीची. आठवणच खुश ठेवेल. सर्वांना वाटते विश्वामध्ये शांती असायला हवी. बाबाही म्हणतात त्यांना समजावा की विश्वामध्ये शांती आता स्थापन होत आहे, म्हणून बाबा लक्ष्मी-नारायणाच्या चित्राला जास्त महत्त्व देतात. सांगा, या दुनियेची स्थापना होत आहे, जिथे सुखशांती, पवित्रता सर्व होते. सर्व म्हणतात विश्वामध्ये शांती असायला हवी. पारितोषिक अनेकांना भेटते. विश्वामध्ये शांतीची स्थापना करणारा तर मालक असेल ना. यांच्या राज्यामध्ये विश्वामध्ये शांती होती. एक भाषा, एक राज्य, एक धर्म होता. बाकी सर्व आत्मे निराकारी दुनियेमध्ये होते. अशी दुनिया कुणी स्थापन केली होती. शांती कुणी स्थापन केली होती. विदेशी ही समजतील हा स्वर्ग होता, यांचे राज्य होते. विश्वामध्ये शांती तर आता स्थापन होत आहे. बाबांनी समजावले होते. प्रभात फेरीमध्ये, हे लक्ष्मी नारायणाचे चित्र ठेवा. सर्वांना ऐकू जायला हवे की हे राज्य स्थापन होत आहे. नर्काचा विनाश समोर उभा आहे. हे तर जाणता ड्रामा अनुसार बहुतेक थोडा उशीर होईल. मोठ्या-मोठ्यांच्या भाग्यात आता नाही. तरीही बाबा पुरुषार्थ करवत राहतात. ड्रामानुसार सेवा होत आहे. अच्छा. शुभरात्री.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. संगदोषापासून स्वत:ला खुप-खुप सांभाळायचे आहे. कधीही पतितांच्या संगामध्ये यायचे नाही. शांतीच्या बळाद्वारे या सृष्टीला पावन बनवण्याची सेवा करायची आहे.

2. ड्रामा (नाटक) ला चांगल्याप्रकारे समजून हर्षित राहायचे आहे. आपले सर्व काही नवीन दुनियेसाठी बदली (ट्रांसफर) करायचे आहे.

वरदान:-
आत्मीयतेच्या प्रभावाद्वारे फरिश्ता पणाचा मेकअप (श्रृंगार) करणारे सर्वांचे स्नेही भव

जी मुले सदैव बापदादांच्या संगामध्ये राहतात. त्यांना संगाचा रंग असा लागतो. जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मिकतेचा प्रभाव दिसून येतो. ज्या आत्मियते मध्ये राहिल्याने फरिश्ते पणाचा मेकअप स्वत: होऊन जातो. जसे मेकअप केल्यानंतर कुणी कसेही असेल परंतू बदलून जातो. मेकअप केल्यानी सुंदर दिसतो. येथेही फरिश्ता पणाच्या मेकअपद्वारे चमकु लागतात आणि हा आत्मिक मेकअप सर्वांचे स्नेही बनवतो.

बोधवाक्य:-
ब्रह्मचर्य, योग आणि दिव्य गुणांची धारणा हाच वास्तविक (खरा) पुरुषार्थ आहे.