21-06-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   16.02.86  ओम शान्ति   मधुबन


"स्वर्णजयंती चा सोनेरी संकल्प"


आज भाग्यविधाता बाबा आपल्या चोहीकडच्या पद्मापदम भाग्यवान मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलाच्या मस्तकावर भाग्याचा चमकणारा तारा पाहून आनंदी होत आहेत. साऱ्या कल्पामध्ये असा कोणता पिता होऊ शकत नाही, त्यांची एवढी सर्व मुलं भाग्यवान असतात. क्रमवारीने भाग्यवान असून सुद्धा जगातील आजकालच्या श्रेष्ठ भाग्यवान समोर, शेवटचा भाग्यवान मुलगा पण ,अति श्रेष्ठ आहे, त्यामुळे बेहद्द बापदादाला मुलांच्या भाग्यावर अभिमान आहे. बाप दादा पण नेहमीच वा माझी भाग्यवान मुलं ,एकाच लगन मध्ये मगन राहणारी मुलं हे गीत गात राहतात. बाप दादा आज विशेष सर्व मुलांना स्नेह आणि साहस या दोन्ही विशेषतांचे अभिनंदन करण्यासाठी आले आहेत.

प्रत्येकाने यथायोग्य स्नेहा ची भेट सेवेद्वारे दाखवली. एका लगन द्वारे बाबाला प्रत्यक्ष करण्याची हिम्मत प्रत्यक्ष रूपामध्ये दाखवली. आपले कार्य उमंग-उत्साहामध्ये संपन्न केले. या कार्याचे खुशीने अभिनंदन बाप दादा करत आहेत. देश-विदेशातील समोर आलेले किंवा दूर बसलेले पण आपल्या मनातील श्रेष्ठ संकल्पा द्वारे किंवा सेवेद्वारे सहयोगी बनलेले आहेत. त्या सर्व मुलांना बाप दादा सदा विजयी भव, सदा प्रत्येक कार्यामध्ये संपन्न भव, सदा प्रत्यक्ष प्रमाण दाखवणारे असे वरदान देत आहेत. सर्वांची स्वपरिवर्तनाची, सेवेमध्ये आणखी पुढे जाण्याची ,शुभ उमंग उत्सवाच्या शपथा बाप दादाने ऐकल्या. सांगितले आहे ना की बाप दादा जवळ तुमच्या साकारी दुनिये पेक्षा वेगळाच शक्तिशाली टीव्ही आहे. तुम्ही फक्त शरीराच्या हालचालीला पाहू शकतात. बाप दादा मनात चाललेल्या संकल्पांना पण पाहू शकतात. जी पण प्रत्येकाने भूमिका पार पाडली ती सर्व संकल्पा सहित, मनाची गती विधी आणि तनाची गती विधी दोन्ही पण पाहिल्या, ऐकल्या. काय काय पाहिले असेल? आज तर अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे इतर काही गोष्टी आज सांगणार नाही. बाप दादा आणि त्याच बरोबर तुमचे सर्व सेवा साथी मुलांनी एका गोष्टीवर फार आनंदाने टाळ्या वाजवल्या, हाताच्या टाळ्या नाही,आनंदाच्या टाळ्या वाजवल्या. साऱ्या संघटनांमध्ये सेवेद्वारे,आताच्या- आता बाबाला प्रत्यक्ष करावे. आताच्या आता विश्वामध्ये आवाज उठवावा, हा एक उमंग-उत्साहाचा संकल्प सर्वांमध्ये एकच होता. मग भाषण करणारे, ऐकणारे व कोणते पण स्थूल कार्य करणारे,सर्वांमध्ये हा संकल्प, आनंदाच्या रूपात चांगला होता, त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण, बाबाला प्रत्यक्ष करण्याचा उमंग, वातावरण आनंदी राहिले. बहुतांश खुशी आणि निस्वार्थ स्नेहाचा अनुभवाचा प्रसाद घेऊन गेले. त्यामुळे बाप दादा पण मुलांच्या आनंदात आनंदी झाले होते. समजले.

सुवर्णजयंती पण साजरी केली ना ! आता पुढे काय साजरे करायचे ! हीरक जयंती येथे साजरी करायची का आपल्या राज्यात करायची ? स्वर्णजयंती कशासाठी साjजरी केली ? सुवर्णयुग आणण्यासाठी केली ना. सुवर्ण जयंतीपासून कोणता श्रेष्ठ सुवर्ण संकल्प केला? दुसऱ्याला तर सुवर्ण विचार खूप सांगितले . चांगले चांगले सांगितले . स्वतःसाठी कोणता विषय सोनेरी संकल्प घेतला ? जो पूर्ण वर्ष , प्रत्येक संकल्प, प्रत्येक तास ,सोनेरी राहील . लोक तर फक्त सोनेरी सुप्रभात किंवा सोनेरी शुभ रात्री म्हणतात किंवा सोनेरी सायंकाळ म्हणतात . परंतु तुम्हा सर्वश्रेष्ठ आत्म्याचा प्रत्येक क्षण सोनेरी असावा . सोनेरी संकल्प करावा. फक्त सोनेरी सुप्रभात किंवा सोनेरी शुभ रात्री नसावी. प्रत्येक वेळी तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये स्वर्ण युग आणि सोनेरी प्रकाशाचे घर असावे . हा सोनेरी प्रकाश आहे, हे सुवर्ण युग आहे ,असाच अनुभव व्हावा. आठवणीत आहे ना .सुरुवातीला एक चित्र बनवले होते . एका डोळ्यात मुक्ती, दुसऱ्या डोळ्यात जीवन मुक्ती .हा अनुभव करणे हाच सुवर्ण जयंतीचा, स्वर्ण संकल्प आहे. असा संकल्प सर्वांनी केला,की फक्त दृश्य पाहूनच खूष होत राहिले . स्वर्णजयंती या श्रेष्ठ कार्यासाठी आहे .या कार्यासाठी तुम्ही सर्वजण पण कार्याचे सोबती आहात. फक्त साक्षी होऊन पाहणारे नाहीत ,साथी आहात . .विश्वविद्यालयाची स्वर्णजयंती आहे. जरी एक दिवसाचा पण विद्यार्थी असेल, त्याची पण स्वर्णजयंती आहे .विनासायास आपोआप जयंती साठी पोहोचले आहेत. तयारी करण्याचे कष्ट यांनी केले ,आणि साजरी करण्याच्या वेळी तुम्ही सर्व पोहोचले .तर सर्वांना ,सुवर्ण जयंती चे बाप दादा पण अभिनंदन करत आहेत. सर्व असे समजत आहेत ना! फक्त पाहणारे तर नाहीत ना ! बनणारे आहात की पाहणारे आहात! पाहिले तर जगामध्ये पुष्कळ काय आहे परंतु येथे पाहणे म्हणजे बनणे. ऐकणे म्हणजे बनणे . तर कोणता संकल्प केला? प्रत्येक संकल्प सोनेरी असावा .नेहमी प्रत्येक आत्म्यासाठी स्नेहाची, आनंदाची, सोनेरी फुलाची वर्षा करत राहा. शत्रु जरी असला तरी पण स्नेहाचे वर्षाव केल्याने,शत्रूला पण दोस्त बनवाल .जरी कोणी तुम्हाला मान देवो वा ना देवो परंतु तुम्ही नेहमी सन्माना मध्ये राहून इतरांना स्नेहाचे दृष्टी द्वारे, स्नेही वृतीद्वारे ,आत्मिक मान देत रहा. ते तुम्हाला मानू अथवा न मानू ,परंतु तुम्ही त्यांना प्रिय भाऊ, बहिण मानत रहा . ते ना मानो देत तुम्ही तर मानू शकता ना. त्यांनी दगड मारला तरी तुम्ही रत्न द्या. तुम्ही दगड फेकू नका कारण तुम्ही रत्नाकर पित्याची मुलं आहात, रत्नाच्या खाणीचे मालक आहात. लखोपती आहात ,भिकारी नाहीत. तर विचार करू नका, कि, त्यांनी दिले तर देऊ,हे भिकारी पणाचे संस्कार आहेत .दाताची मुलं कधी घेण्यासाठी हात पुढे करत नाहीत, बुद्धीने पण असा संकल्प करने की ,त्यांनी केले तर मी करेन, त्यांनी स्नेहा दिला तर मी देईन, त्याने मान दिला तर मी देईन .हे पण हात पसरणे आहे. हे पण उत्तम भिकारीपन आहे. यामध्ये पण निष्काम योगी बना.तेव्हा स्वर्णजयंतीची खुशीची लहर विश्वापर्यंत पोहोचेल .जसे विज्ञानाच्या शक्तीने साऱ्या जगाला नष्ट करण्याची सामग्री फार शक्तिशाली बनवली आहे. त्यामुळे थोड्या वेळात सर्व कार्य समाप्त होईल.विज्ञानाची शक्ती अशा अतिसूक्ष्म वस्तू बनवत आहे. तुम्ही ज्ञानाच्या शक्तीवाले अशी शक्तिशाली वृत्ती आणि वातावरण बनवा .ज्याद्वारे थोड्यावेळात सर्वत्र खुशीचे तरंग, सृष्टीतील श्रेष्ठ भविष्याची लहर, फार लवकरात लवकर पसरेल. अर्धे जग तर आता अर्धे मेलेले आहे. मृत्यूच्या शय्येवर झोपलेले आहे. त्यांना खुशीच्या वातावरणा चा ऑक्सीजन द्या. हा स्वर्णजयंती सोनेरी संकल्प नेहमी अनुभवत राहा .समजले. काय करायचे आहे? आता आणखीन गतीला तीव्र करा .आतापर्यंत जे केले ते पण फार चांगले केले .आता यापुढे पण चांगले, चांगले, करत करा. अच्छा.

दुहेरी विदेशीना फार उमंग आहे .आता आहेच दुहेरी विदेशींना संधी. अनेक जण पोहचले पण आहेत,समजले. आता सर्वाना खुशीचा प्रसाद खाऊ घाला. दिल खुश मिठाई असते ना. तर खूप दिल खुश मिठाई वाटा,अच्छा. सेवाधारी पण खुशी मध्ये नाचत आहेत ना. नाचल्याने थकवा नाहीसा होतो.तर सेवेचे व खुशीचे नृत्य सर्वांना दाखवले? काय केले ?नृत्य दाखवले ना,अच्छा .

सर्वश्रेष्ठ भाग्यवान विशेष आत्म्यांना, प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प सोनेरी बनवणाऱ्या ,सर्व आज्ञाकारी मुलांना ,नेहमी दाताची मुलं बनवून सर्वांची झोळी भरणारे ,संपन्न मुलांना, सदा दाता विधाता आणि वरदाता बनून सर्वाना मुक्ती व जीवनमुक्तीची प्राप्ती करणारे सदा भरपूर मुलांना बापदादाची, श्रेष्ठ स्नेहातील, उत्तम खुशीच्या फुला सहित, प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

पार्टी बरोबर:-नेहमी बाबा आणि वारसा दोन्हीची आठवण राहते का? बाबा ची आठवण आपोआप वारशा ची पण आठवण देऊन जाते आणि वारसा आठवण येत असेल तर बाबांची आठवण आपोआप येते. बाबा आणि वारसा दोन्ही एकत्र आहेत.बाबाची आठवण करता वारशासाठी .जर वारशाची प्राप्ती नसेल तर बाबा ची पण आठवण का करायची ?त्यामुळे बाबांनी आणि वारशाची आठवण नेहमीच भरपूर बनवीत आहे. खजाने भरपूर तर दुःख दर्द पासून दूर,दोन्हीकडून फायदा आहे .दुःखापासून दूर होतो आणि खजान्याने भरपूर होऊन जातो .अशी सदाकाळ ची प्राप्ती बाबा शिवाय इतर कोणी करू शकत नाही .हीच आठवण सदा संतुष्ट आणि संपन्न बनवेल .जसे बाबा सागर आहेत .नेहमी भरपूर आहेत .किती पण सागराला सुकविण्याचा प्रयत्न केला तरीपण सागर नाहीसा होणार नाही .सागर संपन्न आहे. तसे तुम्ही सदा सर्व संपन्न आत्मे आहात ना.संपन्नता नसेल तर कुठून तरी घेण्यासाठी हात पसरावा लागेल परंतू भरपूर आत्मा नेहमीसाठी खुशीच्या झोपाळयामध्ये झुलत राहते. तर असे श्रेष्ठ आत्मा बनले आहात ? नेहमी संपन्न राहायचे आहे . तपासून पहा कि ,मिळालेल्या शक्तीचा खजाना किती कार्यामध्ये लावला आहे ?.

नेहमी हिम्मत आणि उमंगाच्या पंखाने उडत राहून दुसऱ्यांना पण उडवत रहा. हिम्मत आहे आणि उमंग नाही तरीपण सफलता मिळत नाही. उमंग आहे हिम्मत नाही तरीपण सफलता नाही .दोन्ही एकत्र असेल तर उडती कला आहे .त्यामुळे नेहमी हिम्मत आणि उमंगा च्या पंखा द्वारे उडत रहा .अच्छा.

अव्यक्त मुरली मधून निवडलेले अनमोल महावाक्य :-

108 रत्नांच्या वैजयंतीमाळे मध्ये येण्यासाठी संस्कार मिलनची रास करा.:-

(१) कोणती पण माळा जेव्हा बनवितात , त्यावेळी एक मणी दुसऱ्या मन्या बरोबर एकत्र असतो. वैजयंती माळे मध्ये पण जरी कोणी 108 व्या क्रमांकाचा असेल ,तरीपण मणी, मन्या बरोबर एकत्र असतो .त्यामुळे सर्वांना याचा अनुभव होतो,कि,हे तर माळेमध्ये गुंफल्या सारखा मणी आहे.वेग वेगळे संस्कार असून सुद्धा जवळचे दिसून येतात.

(२ ) एक दोघांच्या संस्काराला ओळखून, एक दोघांच्या स्नेहा मध्ये एकमेकात मिळून-मिसळून राहायचे आहे .ही माळेतील मन्याची विशेषता आहे परंतु एक दोघाचे स्नेही, तेव्हाच बनाल ,जेव्हा संस्कार आणि संकल्पांमध्ये एकमेकाशी मिळून घ्याल, त्यासाठी सरळपणा चा गुण धारण करा.

(३ ) आता पर्यंत स्तुती च्या आधारा वर स्थिती आहे ,जे कर्म करता त्याच्या फळाची इच्छा राहते, स्तुती नाही मिळाली तर स्थिती राहत नाही. निंदा झाली तर धनीची आठवण विसरते, विना-धनीचे बनता,परत संस्काराची टक्कर सुरू होते. या दोन्ही गोष्टीं माळे पासून दूर करतात. त्यामुळे स्थिती आणि निंदा दोन्हीमध्ये समान स्थिती बनवा.

(४)संस्कार मिळविण्यासाठी जेथे मालक बनून राहायचे आहे,तेथे बालक बनू नका आणि जेथे बालक बनावयाचे आहे तेथे मालक होऊ नका .बालकपण म्हणजे निरसंकल्प ,जी पण आज्ञा मिळेल,आदेश मिळेल ,त्यावरती चाला. मालक बनून आपले मत द्या आणि बालक बना. त्यामुळे टक्कर होणार नाही.

(५) सेवेमध्ये सफलतेचा आधार आहे नम्रता.जेवढी नम्रता तेवढी सफलता.नम्रता येते निमित्त समजल्याने ,नम्रते च्या गुणामुळे सर्व नमन करतात .जो स्वतः झुकतो, त्याचे समोर सर्व झुकतात. त्यामुळे शरीराला निमित्तमात्र समजून चला .आणि सेवेमध्ये स्वतःला निमित्त समजून वागा. तर नम्रता येईल जिथे नम्रता आहे तिथे टक्कर होणार नाही. आपो आपच संस्कार मिलन होईल.

(६) मनामध्ये जे पण संकल्प उत्पन्न होतात, त्यामध्ये खरे पणा आणि स्वच्छता पाहिजे. आत मध्ये कोणता पण विकर्मा चा कचरा नसावा. कोणता पण भाव स्वभावाचा, जुन्या संस्काराचा, पण कचरा नसावा .जो खरा असेल , तो सर्वांना प्रिय असेल, सर्वांचे प्रिय बनाल, तर संस्कार मिलनाची रास होईल . खऱ्या वर साहेब खुश होतात.

(७) संस्कार मिलनाची रास करण्यासाठी ,आपला स्वभाव सरळ आणि तत्पर बनवा म्हणजे आपल्या पुरुषार्था मध्ये, संस्कारांमध्ये भारी पण येणार नाही.सरळ असाल तर तत्पर राहाल.सरळ सहज राहिल्याने ,सर्व कार्य पण सहज होते. पुरुषार्थ पण सहज होऊन जातो.स्वतः सरळ नाही राहिला, तर कठीणतेला तोंड द्यावे लागेल .मग आपले संस्कार ,स्वतःमधील कमतरता, अवघड वाटू लागतात.

(८) संस्कार मिलनाची रास ,तेव्हा होईल ,जेव्हा प्रत्येकाची विशेषता पाहाल, आणि स्वतःला विशेष आत्मा समजून, विशेषते ने संपन्न बनाल. हे माझे संस्कार आहेत, हे माझे संस्कार आहेत,असे शब्द पण नाहीसे होतील, एवढ्या पर्यंत नष्ट व्हायचे आहे .त्यामुळे स्वभाव पण बदलून जाईल, जेव्हा प्रत्येकाचे स्वभाव बदलतील, तेव्हा, तुम्हा लोकांचे ,अव्यक्त रुपाचे ,चेहरे बनतील.

(९) बापदादा, मुलांना विश्व महाराजा बनण्याचे शिक्षण देत आहेत .विश्व महाराजा बनणारे सर्वांचे स्नेही असतात .जसे बाबा सर्वांचे स्नेही आणि सर्व त्यांचे स्नेही आहेत ,तसे एकमेकाच्या मनातून, त्यांचे विषयी स्नेहाची फुले पडतील. जेव्हा स्नेहाची फुले येथे पडतील, तेव्हाच जड चित्रावर,पण फुले पडतील. तर लक्ष ठेवा की ,सर्वांचे स्नेहाचे पुष्पपाञ बनायचे आहे. स्नेह मिळेल सहयोग दिल्याने.

(१०) नेहमी हे लक्षात ठेवा कि, आपल्या वागण्याने कोणी पण दुःखी होऊ नये. माझे वागणे, संकल्प,वाणी आणि तर प्रत्येक कर्म सुखद होईल .ही आहे ब्राह्मण कुळाची रीत , ही रीत स्वीकारा तर संस्कार मिळण्याची रास होईल.

वरदान:-
ईश्वरी उच्चप्रतीचे संस्कारा द्वारे प्रत्येकाच्या विशेषता चे वर्णन करणारे पुण्यात्मा भव.

नेहमी स्वतःला विशेष आत्मा समजून ,प्रत्येक संकल्प व कर्म करणे अणि प्रत्येका मध्ये विशेषता पाहणे, वर्णन करणे, सर्वांसाठी विशेष बनण्याची शुभ कल्याणाची इच्छा ठेवणे ,हीच ईश्वर श्रेष्ठता आहे. राजघराण्यातील आत्मे दुसऱ्या द्वारे सोडलेली वस्तू स्वतःमध्ये धारण करू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कि ,कोणाची कमजोरी वा अवगुण पाहण्याचा नेत्र नेहमी बंद ठेवा. एकमेकाचे गुणगान करा ,स्नेह ,सहयोगाच्या पुष्पाची देवाण-घेवाण करा, तर पुण्यात्मा बनाल.

सुविचार:-
वरदानाची शक्ती ,परिस्थिती रुपी अग्नीला पण ,पाणी बनवेल.


सूचना :-आज आंतरराष्ट्रीय दिवसाचा तिसरा रविवार आहे. सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत, सर्व भाऊ-बहिणी संघटित रूपात एकत्र येऊन,योगाभ्यास करा कि, मी भृकुटी आसनावर विराजमान, परमात्मा शक्तीद्वारे, संपूर्ण सर्वश्रेष्ठ राज्याची आत्मा कर्मद्रीयजीत, विक्रमाजीत आहे .सारा दिवस या आठवणी मध्ये राहून ,साऱ्या कल्पामध्ये हिरोची भूमिका वठवणारे,आम्ही सर्वश्रेष्ठ महान आत्मा आहे.