17-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, बाबा जे दररोज शिकवत आहेत, ते शिक्षण कधी चुकवायचे नाही, या शिक्षणाद्वारेच मनातील संशय दूर होईल...!!!

प्रश्न:-
बाबाच्या ह्दयाला जिंकण्याची युक्ती काय आहे?

उत्तर:-
बाबाच्या ह्दयाला जिंकावयाचे असेल तर जोपर्यंत संगमयुग आहे तोपर्यंत बाबापासून काही पण लपवायचे नाही. आपल्या चारित्र्यावर पुरेपुर ध्यान ठेवा. जर कोणते पापकर्म झाले तर अविनाशी सर्जनला सांगा, तर हल्के होईल. बाबा जी शिकवण देत आहेत तीच त्यांची दया, कृपा व आशिर्वाद आहे. तर बाबाला दया कृपा मांगण्यापेक्षा स्वत:वर कृपा करा. असा पुरुषार्थ करुन बाबांच्या ह्दयाला जिंकू शकता.

ओम शांती।
आता आत्मिक मुले हे तर जाणतात कि, नविन दुनियेत सुख आहे, जुन्या दुनियेमध्ये दु:ख आहे. दु:खाचे वेळी सर्व दु:खामध्ये येतात, आणि सुखाचे वेळी सर्व सुखामध्ये येतात. सुखाचे दुनियेमध्ये दु:खाचे नावरुप नाही मग जिथे दु:ख आहे तिथे सुखाचे नावनिशाण नाही. जिथे पाप आहे तिथे पुण्याचे नांव रुप नाही, जिथे पुण्य आहे तिथे पापाचे नाव रुप नाही. ते कोणते ठिकाण आहे? एक आहे सतयुग, दुसरे आहे कलियुग. हे तर मुलांच्या बुध्दीमध्ये जरुर आहेच. आता दु:खाची वेळ पुर्ण झाली आहे, आणि सतयुगाची तैयारी होत आहे. आम्ही आता या पतित छी छी दुनियेपासून सतयुग अर्थात रामराज्यामध्ये जात आहोत. नविन दुनियेमध्ये आहे सुख, जुन्या दुनियेमध्ये आहे दु:ख, असे नाही कि जे सुख देतात तेच दु:ख पण देतात. नाही, सुख बाबा देत आहेत, दु:ख माया रावण देत आहे.रावण शत्रुचा पुतळा प्रत्येक वर्षी जाळतात. दु:ख देणाऱ्याला नेहमी जाळले जाते. मुले जाणतात कि, जेव्हा त्यांचे राज्य पुर्ण होते, तर कायमचे नष्ट होते. 5 विकारच सर्वांना आदि मध्य अंताला दु:ख देत आले आहेत. तुम्ही येथे बसले आहात तरी पण तुमच्या बुध्दीमध्ये हे राहिले पाहिजे की, आम्ही बाबाजवळ जावू. रावणाला तर तुम्ही पिता म्हणत नाही. कधी ऐकले आहे, रावणाला कोणी परमपिता परमात्मा म्हणतात काय?कधीच नाही. काही समजतात कि लंकेमध्ये रावण होता. बाबा सांगतात कि, ही सारी दुनियाच लंका आहे. म्हणतात कि, वास्कोदीगामाने चक्रा मारले, जहाज व बोटीद्वारे. ज्यावेळी त्याने चक्कर लावले त्यावेळी विमान इ. नव्हते. रेल्वे पण वाफेवर चालत होती. वीज वेगळी वस्तू आहे. आता बाबा म्हणतात कि, दुनिया तर एकच आहे. नविन पासून जुनी, जुन्या पासून नविन बनते. असे म्हणता येत नाही कि, स्थापना पालना विनाश. नाही, प्रथमस्थापना मग विनाश नंतर पालना, हे बरोबर अक्षर आहे. नंतर रावणाची पालना सुरु होते. ती खोटी विकारी पतित बनण्याची पालना आहे, ज्यामुळे सर्व दु:खी होत आहेत. बाबा तर कधी कोणाला दु:ख देत नाहीत. येथे तर तमोप्रधान बनल्यामुळे बाबाला सर्वव्यापी म्हणतात. पहा, काय बनले आहात. हे तर तुम्ही मुलांनी चालता फिरता बुध्दीत ठेवले पाहिजे. आहे तर फार सोपे. फक्त अल्फची गोष्ट आहे. मुसलमान लोक पण म्हणतात कि, उठून अल्लाहची आठवण करा. स्वत: पण पहाटे उठतात. ते म्हणतात अल्लाह किंवा खुदाची आठवण करा. तुम्ही म्हणता बाबांची आठवण करा. बाबा अक्षर फार गोड आहे. अल्लाह म्हटल्याने वारसा आठवणीत येत नाही. बाबा म्हटल्याने वारसा आठवणीत येतो, मुसलमान लोक बाबा म्हणत नाहीत. ते मग अल्लाह मिया म्हणतात. मिया-बीबी हे अक्षर भारतामध्येच आहेत. परमपिता परमात्मा म्हटल्यानेच शिवलिंगाची आठवण येते. युरोपवासी लोक गॉड फादर म्हणतात. भारतामध्ये तर दगड धोंड्याला पण भगवान समजतात. शिवलिंग पण दगडाचे आहे. समजतात कि या दगडामध्ये भगवान बसले आहेत. भगवानाची आठवण कराल तर दगडच समोर येतो. दगडाला भगवान समजून पुजा करतात. दगड कोठून येतो? डोंगरातून झऱ्यातून वाहत वाहत गोल गुळगुळीत बनतो. मग कसे नैसर्गिक आकाराचे बनून जातात. दैवी देवतांची मुर्ती अशी होत नाही. दगड कोरुन कोरुन कान, तोंड, नाक, डोळे इत्यादी किती सुंदर बनवतात. खर्च फार करतात. शिवबाबांच्या मुर्तीवर काहीच खर्च इत्यादीची गोष्ट नाही. आता तुम्ही मुले समजता कि आम्ही ते देवी देवता चैतन्यामध्ये स्वत: बनत आहे. चैतन्यामध्ये असता तेव्हा पुजा इत्यादी होत नाही. जेव्हा पत्थरबुध्दी बनतो तेव्हा दगडाची पुजा करता. चैतन्य आहात तर पुज्य आहात, मग पुजारी बनून जाता. तेथे तर ना कोणी पुजारी असतो, ना कोणत्या दगडाची मुर्ती असते. गरजच नसते. जे चैतन्य होते त्या आठवणीसाठी दगडाची बनवितात. आता या देवतांच्या गोष्टी तुम्हाला माहित झाल्या आहेत कि, या देवतांची जीवन कहानी काय होती? नंतर तीच पुनरावृत्त होत आहे. पुर्वी हे ज्ञानच नव्हते तर पत्थरबुध्दी होतो. आता बाबाद्वारे ज्ञान मिळाले आहे, ज्ञान तर एकच आहे, परंतू घेणारे क्रमवारीने आहेत.

तुमची रुद्रमाळा पण या धारणेनूसारच बनत आहे. एक आहे रुद्र माळा, दुसरी आहे. खंडमाळा. एक आहे भावाची, दुसरी आहे भाऊ आणि बहिणीची. हे तर बुध्दी मध्ये आले आहे कि, आम्ही आत्मे फार छोटी छोटी बिंदू सारखी आहोत. गायले पण जाते कि, भृकुटीच्या मध्ये चमकत आहे विलक्षण तारा. आता तुम्ही समजता कि आम्ही आत्मे चैतन्य आहोत. एक-एक छोट्या ताऱ्या सारखी आहेत, जेव्हा गर्भामध्ये येते तर छोटा पिंड असतो. नंतर मोठा होत जातो. तीच आत्मा स्वत:चे शरीराद्वारे अविनाशी भुमिका वठवित आहे. या शरीराचीच सर्व आठवण करत राहतात. हे शरीरच चांगले वाईट असल्यामुळे सर्वांना आकर्षित करते. सतयुगामध्ये असे म्हणत नाहीत कि आत्म अभिमानी बना, स्वत:ला आत्म समजा. हे ज्ञान तुम्हाला आताच मिळत आहे, कारण तुम्ही जाणता कि, आता आत्मा पतित बनली आहे. पतित झाल्यामुळे जे काम करत आहे ते सर्व उल्टे होऊन जाते. बाबा सुल्टे काम करवितात, माया उल्टे काम करविते. सर्वांत उल्टे काम आहे बाबाला सर्वव्यापी म्हणने. आत्मा जी भुमिका वठवते ती अविनाशी आहे. त्याला जाळले जात नाही, त्याची तर पुजा होते, शरीराला जाळले जाते. आत्मा जेव्हा शरीर सोडते तर शरीराला जाळले जाते. आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. आत्म्या शिवाय शरीर दोन चार दिवस पण ठेवू शकत नाहीत. कोणी तर मग शरीराला औषधे इत्यादी लावून पण ठेवतात. परंतू फायदा काय? ख्रिश्चनांचा एक सेंट, जेवीयर आहे, म्हणतात कि त्यांचे शरीर आता पण ठेवलेले आहे. त्यांचे जसे की मंदीर बनलेले आहे. कोणाला दाखवत नाहीत, फक्त त्यांचे पाय दाखवितात. म्हणतात कि कोणी पायाला शिवले तर आजारी पडत नाही. पाय शिवल्याने आजारापासून दूर होतात, तर समजतात कि त्यांची कृपा. बाबा म्हणतात कि भावनेचे भाडे मिळते. निश्चयबुध्दी झाल्याने काही फायदा होतो. बाकी तसे झाले तर अनेकानेक तेथे जातील. मेळा लागेल. बाबा पण येथे येतात तरी पण एवढे येत नाहीत. अनेकांनी येण्यासारखे ठिकाण पण नाही. जेव्हा अनेक जण येण्याची वेळ येईल, तेव्हा विनाश होऊन जाईल. हे पण नाटक बनलेले आहे. याचा आरंभ आणि अंत नाही. फक्त, झाडाची जीर्ण जीर्ण अवस्था होते, म्हणजे तमोप्रधान बनतात. तर हे झाड बदलून नविन होते. किती हे अमर्यादीत मोठे, झाड आहे. प्रथम ते येतील ज्यांना प्रथम क्रमाने जायचे आहे. क्रमाक्रमाने येतील ना? सर्व सुर्यवंशी तर एकदाच येणार नाहीत. चंद्रवंशी पण एकत्र येणार नाहीत. नंबरानुसारच येतील. कलाकार सर्व एकत्र कसे येतील. खेळच बिगडून जाईल. हा खेळ फार बिनचुक बनलेला आहे, यामध्ये कोणता बदल होऊ शकत नाही.

गोड गोड मुले जेव्हा येथे बसतात तर बुध्दीत बिनचुक हेच राहिले पाहिजे. इतर सतसंगात तर कोणती ना कोणती गोष्ट बुध्दीत येते. हे तर एकच शिक्षण आहे, ज्याद्वारे तुमची कमाई होते. ते शास्त्र इत्यादी वाचल्याने काही कमाई होत नाही, परंतू काही ना काही चांगले गुण येतात. ग्रंथ वाचण्यासाठी बसतात तर असे नाही कि सर्व निर्विकारी असतात. बाबा सांगतात कि, या दुनियेमध्ये सर्व भ्रष्टाचाराने जन्म घेतात. तुम्हा मुलांना कोणी विचारतात कि, तेथे जन्म कसा होतो? सांगा तेथे तर 5 विकाराच नसतात, योगबळाने मुले जन्म घेतात. अगोदरच साक्षात्कार होतो कि, मुलगा जन्म घेणार आहे. तेथे विकाराची गोष्ट नसते. येथे तर मुलांना माया खाली पाडते. कोणी कोणी तर बाबाला येऊन सांगतात पण, सांगणार नाहीत तर शंभर गुणा दंड पडेल. बाबा तर सर्व मुलांना सांगतात कि, कोणते पाप कर्म झाले तर बाबाला त्वरीत सांगितले पाहिजे. बाबा अविनाशी वैद्य आहेत. सर्जनला सांगितल्यामुळेतुम्ही मोकळे होऊन जाल. जो पर्यंत संगमयुग आहे तो पर्यंत बाबांकडून काही लपवावयाचे नाही. कोणी लपवितात तर बाबांच्या ह्दयाला जिंकू शकत नाहीत. सारा आधार पुरुषार्थावर आहे.पाठशाळेत जाणारच नाहीत तर चरित्र कसे सुधारेल? यावेळी सर्वांचे चरित्र खराब आहे. विकारात जाणे हे प्रथम नंबरचे खराब आहे, त्यामुळे बाबा म्हणतता कि, मुलांनो, काम विकार तुमचा महाशत्रु आहे. पुर्वी पण हे गीतेचे ज्ञान ऐकले होते, तर या सर्व गोष्टी बुध्दीमध्ये येत नव्हत्या. आता बाबा प्रत्यक्ष गीता सांगत आहेत. आता बाबांनी तुम्हा मुलांना दिव्य बुध्दी दिली आहे, तर भक्तीचे नाव ऐकून. हसू येते कि, काय काय करत होतो. आता तर बाबा शिक्षण देत आहेत, यामध्ये दया, कृपा, आशिर्वादाची गोष्टच नाही. स्वत:वरच दया. कृपा आशिर्वाद करावयाचा आहे. बाबा तर प्रत्येक मुलांकडून पुरुषार्थ करवित आहेत. कोणी तर पुरुषार्थ करुन बाबांच्या ह्दयाला जिंकतात, कोणी तर पुरुषार्थ करत करत मरुन पण जातता. बाबा तर प्रत्येक मुलाला एकसारखेच शिकवित आहेत, काही वेळा अशा गुह्य गोष्टी निघतात, त्यामुळे संशय पण निघून जातो, मग उभे होतात, त्यामुळे बाबांची मुरली कधी बुडवायचे नाही. मुख्य आहे बाबांची आठवण. दैवीगुण पण धारण करावयाचे आहेत. कोणी काही छी छी बोलले तर ऐकून न ऐकल्यासारखे केले पाहिजे. वाईट ऐकू नका----उंच पद प्राप्त करावयाचे आहे तर मान-अपमान, दु:ख सुख, जय-पराजय, सर्व सहन जरुर करावयाचे आहे. बाबा किती युक्त्या सांगत आहेत. तरी पण मुलं बाबाचे पण ऐकून न ऐकल्यासारखे करत आहेत, तर ते काय पद प्राप्त करतील? बाबा सांगतात कि, जोपर्यंत अशरीरी बनत नाहीत, तो पर्यंत मायेची कोणती ना कोणती ठेच लागत राहते. बाबाचे ऐकत नाहीत तर बाबाचा अवमान करतात. तरी पण बाबा म्हणतात कि, मुलांनो, नेहमी विजयी बना, आणि माझी आठवण करुन उंच पद प्राप्त करा. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. कोणी उल्टे सुल्टे बोलेले तर ऐकून न ऐकले सारखे करा. वाईट ऐकू नका. दु:ख सुख, मान अपमान सर्व काही सहन करावयाचे आहे.

2. बाबा जे सांगत आहेत, ते कधी ऐकून न ऐकल्यासारखे करुन, बाबाचा अवमान करु नका. मायेच्या आधारापासून वाचण्यासाठी, अशरीरी राहण्याचा अभ्यास जरुर केला पाहिजे.

वरदान:-
मर्यादीत इच्छेपासून, मुक्त राहून सेवा करणारे नि:स्वार्थ सेवाधारी भव

जसे ब्रहमा बाबांनी कर्म बंधनापासून मुक्त, वेगळे राहण्याचा पुरावा दिला. शिवाय सेवेच्या स्नेहाचेच बंधन होते. सेवेमध्ये ज्या मर्यादीत इच्छा निर्माण होतात, त्या पण हिसाब किताबाच्या बंधनात बांधतात, खरे सेवाधारी या हिसाब-किताबापासून पण मुक्त राहतात. जसे देहाचे बंधन, देहाच्या संबंधाचे बंधन, तसेच सेवेमध्ये स्वार्थ हे पण बंधन आहे. या बंधनापासून किंवा उच्च हिसाब किताबापासून पण मुक्त राहून नि:स्वार्थ सेवाधारी बना.

बोधवाक्य:-
जे वायदे केले आहेत ते फाईलमध्ये न ठेवता, अंतिम (फायनल)करुन टाका.