31-01-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   25.10.87  ओम शान्ति   मधुबन


चार गोष्टींपासून अनासक्त बना


आज बापदादा आपल्या सर्व कमल-आसनधारी श्रेष्ठ मुलांना पाहत आहेत.कमळ-आसन ब्राह्मण आत्म्यांच्या श्रेष्ठ स्थितीची निशाणी आहे.आसन स्थिर होण्याचे साधन आहे . ब्राह्मण कमल-स्थिती मधे स्थिर राहतात,म्हणून कमल-आसनधारी म्हणले जातात.जसे ब्राह्मण पासून देवता बनतात,तसे आसनधारी पासून सिंहासनधारी बनतात,जितका वेळ खूप काळासाठी किंवा अल्प काळासाठी आसनधारी बनतात तेवढाच वेळ खूप काळ किंवा अल्प काळ राज्य सिंहासनधारी बनतात. कमल आसन विशेष ब्रह्मा बाबां समान अति निराळे आणि अति प्रेमळ स्थितीचे प्रतीक(चिन्ह)आहे.तुम्ही ब्राह्मण मुले पित्याचे अनुकरण करणारे आहात,म्हणून पित्यासमान कमळ-आसनधारी आहात.अनासक्तची खुण आहे -ते पिता आणि सर्व परिवाराचे अति प्रिय बनतील.निराळेपण म्हणजे चारही बाजूंनी अनासक्त

1) आपल्या देहभानापासुन वेगळे.जसे साधारण दुनियातील आत्म्यांना चालता-फिरता,प्रत्येक कर्म करताना स्वतः चे आणि सदैव देहाचे भान राहते,मेहनत करावी लागत नाही,कि मी देह आहे,इच्छा नसतानाही सहज स्मृतीमध्ये राहते.असे कमल आसनधारी ब्राह्मण आत्म्यानी देखील या देहभानातून स्वतःअसे वेगळे राहावे,जसे अज्ञानी आत्मे आत्म-अभिमाना पासून वेगळे आहेत. शरीराचे भान आपल्याकडे आकर्षित होता कामा नये.जसे ब्रह्मा बाबाना पाहिले, चालता-फिरता फरिश्ता-रूप किंवा देवता-रूप स्वतः स्मृतीमध्ये राहिले.अशी नैसर्गिक देही- अभिमानी स्थिती सदैव ठेवा- यालाच म्हणतात देहभानाहुन निराळे.देहभानातून निराळा राहणाराच परमात्म प्रिय बनतो.

2) या देहाचे जे सर्व संबंध आहेत,दृष्टीने,वृत्तीने,कृतीने-त्या सगळ्यातून वेगळा.देहाचे संबंधी पाहतानाच स्वतःआत्मिक,देही संबंध स्मृतीमध्ये रहावा त्यामुळे दिवाळीनंतर भाऊबीज साजरी केली जाते ना.जेव्हा चमकणारा तारा किंवा झगमगणारा अविनाशी दीपक बनता,तेव्हा भावा-भावाचा संबंध तयार होतो. आत्म्याच्या नात्याने भावा- भावाचा संबंध आणि साकार ब्रह्मावंशी ब्राह्मण या नात्याने भाऊ-बहिणीचे श्रेष्ठ शुद्ध संबंध स्वतःहून स्मृतीमध्ये राहतात,तर न्यारेपण म्हणजे देह आणि देहाच्या सर्व संबंधातून वेगळेपण.

3) देहाच्या विनाशी पदार्थांमध्येही अनासक्त,जर एखादा पदार्थ कोणत्याही कर्मेंद्रियास विचलित करत असेल अर्थात आसक्ती- भाव उत्पन्न होत असेल तर ते अनासक्त राहत नाही.संबंधात वेगळेपणा सहज येतो परंतु सर्व पदार्थांच्या आसक्तीतुन न्यारे- 'अनासक्त' बनण्यासाठी श्रेष्ठ रूपाची आसक्ती राहते.सांगितलं होतं की आसक्तीचे स्पष्ट रूप इच्छा आहे,याच इच्छेचे सूक्ष्म, महिन रूप आहे-चांगलं वाटणे! इच्छा नाही परंतु चांगले वाटते- हेच महिन रुप 'चांगल्या' च्या बदल्यात 'इच्छेचे' रूप घेऊ शकते.तर त्याची चांगल्या प्रकारे तपासणी करा की,हा पदार्थ अर्थात अल्प काळाची सुख साधने आकर्षित तर करत नाही ना?कोणतेही साधन योग्य वेळेत प्राप्त न झाल्यास साधनेत किंवा सहजयोगाची स्थिती डगमगत तर नाही ना?कोणत्याही साधनाच्या वशीभूत अथवा सवयीचे गूलाम तर होत नाही ना?कारण हे सर्व पदार्थ अर्थात साधने प्रकृतीची साधने आहेत.तर तुम्ही प्रकृती जीत अर्थात प्रकृतीच्या आधारापासून कमल-आसनधारी ब्राह्मण आहात.मायाजीत सोबत प्रकृतीजीत देखील बनत आहात. मायाजीत बनताच,माया वारंवार भिन्नभिन्न रुपात प्रयत्न करते कि माझे सहकारी माया जीत बनताहेत,तर ती भिन्न-भिन्न पेपर घेत असते.प्रकृतीचा पेपर आहे- साधनांद्वारे तुम्हा सर्वांना हालचालीत आणणे.जसे-पाणी.आता ही काही मोठी परीक्षा आलेली नाही.परंतु पाण्याने बनलेली साधने,अग्नीने बनलेली साधने,अशा प्रत्येक प्रकृतीच्या तत्वा द्वारे बनलेले साधन मनुष्य आत्म्याच्या जीवनातील अल्पकाळ सुखाचा आधार आहे. तर हे सर्व तत्व परीक्षा घेतील. आता तर फक्त पाण्याची कमी आहे परंतु पाण्याद्वारे बनलेले पदार्थ जेव्हा प्राप्त होणार नाहीत तेव्हा खरी परीक्षा त्यावेळी होईल.या प्रकृती द्वारे येणाऱ्या परीक्षा वेळेप्रमाणे येणारच आहेत ,त्यामुळे देहाच्या या पदार्थांची आसक्ती किंवा आधाराहुन निराधार 'अनासक्त' व्हायचे आहे.आता तर सर्व साधने सहज प्राप्त होतात,काहीच कमी नाही.परंतु साधने असताना, साधनांना प्रयोगात आणताना, योगाची स्थिती डगमगू देऊ नका. योगी बनुन प्रयोग करणे-यालाच अनासक्त म्हणतात.काही नसेलच, तर त्याला अनासक्त म्हणता येणार नाही.असतानाही निमित्तमात्र,अनासक्त रूपात प्रयोग करणे,इच्छा किंवा चांगले होईल म्हणून तर वापरु नका-ही तपासणी जरूर करावयाची आहे. जेथे इच्छा असेल,मग कितीही मेहनत करा परंतु इच्छा,अच्छा (चांगले)बनू देणार नाही.पेपरच्या वेळी मेहनत करण्यातच वेळ जाईल,तुम्ही साधनेत राहण्याचा प्रयत्न कराल आणि साधन त्याच्यांकडे आकर्षित करून घेईल.तुम्ही संघर्ष करून,मेहनत करून साधनांच्या आकर्षणा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करात रहाल तेव्हा युद्धाच्या रणधुमाळी मध्ये परीक्षेची वेळ निघून जाईल.तेव्हा परिणाम काय होईल?प्रयोग करणाऱ्यांना साधने सहज योगाच्या स्थितीत अस्थिर करतील.प्रकृतीची परीक्षा आता तर अजून वेगाने येणार आहे त्यामुळे,अगोदरच पदार्थांचे विशेष आधार-खाणे,पिणे,कपडे घालने,चालणे,राहणे आणि संपर्कात येणे-या सर्वांची तपासणी करायची आहे की कोणतीच गोष्ट विघ्न रूप तर बनत नाही ना?आतापासूनच हा प्रयत्न करा.ज्यावेळी परीक्षा येईल त्यावेळी प्रयत्न करू नका, अन्यथा नापास होण्याची शक्यता आहे.

योग्य स्थिती अर्थात प्रयोग करतानाही निराळेपणाची स्थिती. सहज योगाची साधना म्हणजे साधनांवर अर्थात प्रकृतीवर विजयी होणे.असे नाही की त्याशिवाय चालू शकते परंतु या शिवाय राहू शकत नाही,म्हणून स्थिती अस्थिर झाली....याला न्यारे जीवन म्हणता येणार नाही. अशी सिद्धी प्राप्त करा की तुमच्या सिद्धी द्वारे अप्राप्ती देखील प्राप्तीचा अनुभव करेल. ज्याप्रमाणे स्थापनेच्या आरंभी आसक्ती आहे की नाही,हे पाहण्यासाठी मधुन-मधुन जाणून-बुजून कार्यक्रम ठेवले जात होते.जसे,15 दिवस फक्त ढोढा(बाजरीची भाकरी)आणि ताक खायला दिले.गहू असतानाही हा प्रयत्न केला गेला. आजारी लोकांना देखील 15 दिवस हेच जेवण दिले गेले, कुणीही आजारी पडला नाही.दम्याचा आजार असणारेही ठीक झाले.नशा होता कि बाप दादांनी हा कार्यक्रम दिला आहे.जेव्हा भक्तीमध्ये म्हणत होते 'विषदेखील अमृत झाले', हे तर ताक होते! नशा आणि निश्चय कोणत्याही परिस्थितीत विजयी बनवतो.तर अशीही परीक्षा येईल- कोरडी भाकरी खावी लागेल. आता तर साधने आहेत. म्हणतील-दात चालत नाहीत, पचन होत नाही.परंतु त्यावेळी काय कराल?जेव्हा निश्चय,नशा, योगाच्या सिद्धीची शक्ती असते , तेव्हा कोरडी भाकरी देखील नरम भाकरीचे काम करेल.कोणतीही ही समस्या येणार नाही.तुम्ही सिद्धी स्वरूपाच्या शान मधे असाल तर कुणीही त्रास देऊ शकत नाही.जर हटयोग्यां समोर वाघ पण मांजर बनतो,साप खेळणे बनतो,तर तुम्हा सहज राजयोगी, सिद्धी स्वरूप आत्म्यासाठी ही काही विशेष गोष्ट नाही.आहे तर वापर करा परंतु वेळेला धोका देणार नाही-हे देखील तपासून पहा.परिस्थिती,स्थितीला खाली घेऊन जाऊ नये.देहाच्या संबंधांपासून न्यारे होणे सहज आहे परंतु देहाच्या पदार्थांपासून न्यारे होणे-यासाठी खूप चांगले ध्यान ठेवले पाहिजे.

4) जुन्या स्वभाव,संस्कारांपासून वेगळे बनायचे आहे.जुन्या देहाचे स्वभाव आणि संस्कार देखील खूप कडक असतात.मायाजीत बनताना हे खूप विघ्नरूप बनतात.अनेक वेळा बापदादा पाहतात-जुना स्वभाव संस्कार रुपी साप जळतो परंतु सुंभ तसाच राहतो जो वेळ येताच पुन्हा-पुन्हा धोका देतो.हे कडक स्वभाव आणि संस्कार इतके मायेच्या वशीभूत बनवतात की चुकीला चुकीचे समजत नाहीत. 'जाणीवेची-शक्ती' समाप्त होऊन जाते.यापासून न्यारे होणे-याची देखील चांगली तपासणी करा. जेंव्हा जाणीवेची-शक्ती समाप्त होते तेंव्हा अजूनच एका खोट्या मागे हजार खोटे स्वतःला सिद्ध करताना बोलावे लागते.इतके परवश होतात! स्वतःला सिद्ध करणे-ही देखील जुन्या संस्काराच्या वशीभूत आहात याची निशाणी आहे.एक आहे योग्य गोष्ट स्पष्ट करणे,दुसरे - स्वतःला जिद्दीने सिद्ध करणे.तर जिद्दीने सिद्ध करणारे कधी सिद्धी स्वरूप बनु शकत नाहीत.हे देखील तपासा की एखादा जुना स्वभाव,संस्कार अंशमात्र कुठे लपलेल्या रूपामध्ये राहीलेला तर नाही?समजलं?

या चारही गोष्टींपासून जो वेगळा आहे त्यालाच म्हणतात बाबांचा प्रिय,परिवाराचा प्रिय.असे कमल आसनधारी बनले आहात? त्यांनाच पित्याचे अनुकरण करणारे म्हणतात.ब्रह्मा बाबा देखील कमल-आसनधारी बनले तेव्हाच क्रमांक एक बाबांचे प्रिय बनले,ब्राह्मणांचे प्रिय बनले.मग व्यक्तरूपामधे अथवा अव्यक्त रूपात असो.आजही प्रत्येक ब्राह्मणाच्या मनातून काय निघते? आपला ब्रह्मा बाबा. हा अनुभव करत नाहीत की,आम्ही तर ब्रह्मा बाबांना प्रत्यक्षात पाहिले नाही. परंतु डोळ्यांनी नाही,मनाने पाहिले आहे,बुद्धीच्या दिव्य नेत्रांनी पहिले आहे,असा अनुभव केला म्हणून,प्रत्येक ब्राह्मण मनापासून म्हणतो-"माझे ब्रह्मा बाबा".हीच निराळेपणाची निशाणी आहे.चारही बाजूच्या न्यारेपणा मुळे विश्वाचे प्रिय बनवले.समजले?

गुजरात जवळ आहे त्यामुळे अनुकरण करण्यात देखील जवळ आहेत.स्थान आणि स्थिती दोन्हीमध्ये जवळ असणे-ही विशेषता आहे.बापदादा तर मुलांना पाहून हर्षित होत आहेत. अच्छा.

चारी बाजूचे कमल-आसानधारी, अनासक्त आणि बाबांच्या प्रिय मुलांना,सदैव मायाजीत,प्रकृतीजीत, विशेष आत्म्यांना,सदैव बाबांचे अनुकरण करणाऱ्या,प्रामाणिक मुलांना बापदादांची स्नेहसंपन्न आठवण प्रेम आणि नमस्ते.

मधुबन मध्ये आलेल्या सेवाधारी भाऊ बहिणीं सोबत अव्यक्त बाप दादांची मुलाखत
जितका वेळ मधुबन मध्ये सेवा केली तितका वेळ निरंतर योगाचा अनुभव केला का?योग अभ्यास खंडित तर झाला नाही ना? मधुबन मध्ये सेवाधारी बनणे अर्थात निरंतर योगी, सहज योगीचे अनुभवी बनणे.हा थोड्या वेळाचा अनुभव सदैव आठवणीत राहील ना.कधी काही परिस्थिती आल्यास मनाने मधुबन मध्ये या. तर मधुबन निवासी बनल्याने परीस्थिती किंवा समस्या संपून जाईल आणि सहजयोगी बनाल. सदैव या अनुभवास बरोबर ठेवा, त्याची आठवण केल्यास शक्ती येईल.सेवेचा मेवा अविनाशी आहे.अच्छा.ही संधी मिळणे देखील काही कमी नाही ,खूप मोठी संधी मिळाली आहे.

सेवाधारी म्हणजे सदैव बाबां समान निमित्त बनणारे, निर्मान(नम्र) राहणारे.निर्मानताच सर्वात श्रेष्ठ सफलतेचे साधन आहे. कोणत्याही सेवेमध्ये सफलतेचे साधन नम्रता भाव आहे,निमित्त भाव आहे.तर याच विशेषतांनी सेवा केली का?अशा सेवेत नेहमी सफलता आणि आनंद आहे . संगमयुगावर आनंद घेतल्याने सेवा,सेवा आहे असे वाटले नाही. जसे एखादा पहिलवान त्याच्या खेळाचा आनंद घेतो तेव्हा त्यात थकवा किंवा वेदना नसतात, कारण मनोरंजन समजून आनंद घेतला जातो,तेव्हा नेहमी असे वाटेल की जशी सेवा नसून खेळ खेळत आहे.कोणतीही सेवा मिळाल्यास या दोन विशेषतांनी सफलता प्राप्त करा.त्यामुळे सफलता-स्वरूप बनाल.अच्छा.

2-खरी तपस्या कायमस्वरूपी खरे सोने बनवेल.ज्यामध्ये थोडीही भेसळ नसेल.तपस्या सदैव प्रत्येकाला असे योग्य बनवते की ज्यामुळे प्रवृत्ती मध्ये देखील सफल आणि प्रारब्ध प्राप्त करण्यामध्ये ही सफल.असे तपस्वी बनलात का?तपस्या करणाऱ्यांना राजयोगी म्हणतात. तर तुम्ही सर्व राजयोगी आहात. कधी कोणत्या परिस्थितीत विचलित होणारे तर नाही ना ? तर नेहमी स्वतःला या पद्धतीने तपासा आणि त्यानंतर स्वतःमधे बदल करा.फक्त स्वतःला तपासल्याने नाराज व्हाल.विचार कराल की आपल्यात ही कमजोरी आहे,हे सुद्धा आहे, माहित नाही ठीक होईल की नाही.तेव्हा तपासून ही पहा आणि त्या सोबत बदलही करा.समजा, कमजोर बनलात,वेळ निघून गेली,परंतु समया प्रमाणे कर्तव्य करणाऱ्यांचा सदैव विजय होतो, तेव्हा सर्व सदैव विजयी,श्रेष्ठ आत्मे आहात?सर्व श्रेष्ठ आहात की क्रमवार ?जर क्रमांक विचारला की कोणत्या क्रमांकाचे आहात तर सर्वजण क्रमांक एक सांगाल.परंतु ते क्रमांक किती असतील?एक की अनेक? पहिला क्रमांक तर सगळ्यांनाच मिळणार नाही परंतु पहिल्या विभागात(राजधानीमध्ये)येऊ शकतात.पहिला क्रमांक एकच असेल परंतु पहिल्या विभागात अनेक असतील त्यामुळे पहिल्या क्रमांकाचे बनू शकता. राजगादीवर तर एक बसेल परंतु इतरही सोबत असतील ना.तर रॉयल कुटुंबामध्ये येणे सुद्धा राज्य अधिकारी बनणे आहे.प्रथम विभाग म्हणजेच प्रथम क्रमांकामध्ये येण्याचा पुरुषार्थ करा.आतापर्यंत कोणतीही सीट दोन ते तीन सोडून निश्चित झालेली नाही.आता ज्याला वाटेल तेवढा पुरुषार्थ करू शकतात,बापदादांनी सांगितले आहे की आता उशीर झाला आहे परंतु अति उशीर नाही त्यामुळे सगळ्यांना पुढे जाण्याची संधी आहे.विजयी होऊन पहिल्या क्रमांकात येण्याची संधी आहे, सर्व सफल करून प्रथम क्रमांक मध्ये येण्याची संधी आहे.तेव्हा सदैव उमंग उत्साहात राहा,असे नाही-कुणीही पहिल्या क्रमांकाचे बना,मी दुसऱ्या क्रमांकावर योग्य आहे.याला म्हणतात कमजोर पुरुषार्थ.तुम्ही सर्व तीव्र पुरुषार्थी आहात ना?अच्छा.

वरदान:-
समजदार बनून तीन प्रकारची सेवा सोबतच करणारे सफलता मूर्त भव.

वर्तमान वेळेनुसार मन्सा-वाचा आणि कर्मणा तीनही प्रकारची सेवा सोबतच पाहिजे.वाणी आणि कर्मा सोबत मनाने शुभ संकल्प किंवा श्रेष्ठ वृत्ती द्वारे सेवा करत राहिलात तर फळ मिळेल, कारण वाणीमध्ये शक्ती तेंव्हा येते जेव्हा मनाने शक्तिशाली असाल, नाही तर बोलणार्‍या पंडिता समान बनाल,कारण पोपटा प्रमाणे रटत राहाल.ज्ञानी अर्थात समजदार तीनही प्रकारच्या सेवा बरोबरीने करून आणि सफलतेचे वरदान प्राप्त करणारे असतात.

सुविचार:-
आपले शब्द,कर्म आणि दृष्टीने शांती,शक्ती व आनंदाचा अनुभव करवणे हीच महान आत्म्यांची महानता आहे.