14-02-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   02.11.87  ओम शान्ति   मधुबन


स्व परिवर्तनाचा आधार- खऱ्या मनापासून जाणीव


आज विश्व परिवर्तक, विश्व कल्याणकारी, बापदादा आपल्या स्नेही, सहयोगी, विश्व परिवर्तक मुलांना पाहत आहेत. प्रत्येक जन स्वपरिवर्तना द्वारे विश्व परिवर्तन करण्याच्या सेवे मध्ये लागले आहेत. सर्वांच्या मनामध्ये एकच उमंग उत्साह आहे कि, या विश्वाला परिवर्तन करायचेच आहे, आणि निश्चय पण आहे कि, परिवर्तन होणारच आहे किंवा असे पण म्हणतात कि, परिवर्तन झालेच आहे. फक्त निमित्त बापदादाच्या सहयोगी, सहजयोगी बनून वर्तमान आणि भविष्याला श्रेष्ठ बनवायचे आहे.

आज बापदादा चोहीकडच्या निमित्त विश्व परिवर्तक मुलांना पाहून, एक विशेष गोष्ट पाहात आहेत, सर्व एकाच कार्यासाठी निमित्त आहेत, धेय्य पण सर्वांचे स्व परिवर्तन आणि विश्व परिवर्तनाचे आहे, परंतु स्व परिवर्तन किंवा विश्व परिवर्तना मध्ये निमित्त असून पण क्रमवार का आहेत ? कांही मुले स्वपरिवर्तन फार सहज आणि त्वरित करतात आणि कांही आता परिवर्तनाचा संकल्प करतात परंतु स्वतःचे संस्कार किंवा माया आणि प्रकृती द्वारे येणारी परिस्थिती किंवा ब्राह्मण परिवाराद्वारे येणारा हिसाब किताब, स्व परिवर्तनाच्या उमंगाला कमजोर करतो आणि कांही मुले तर परिवर्तन होण्याच्या हिंमती मध्ये कमजोर आहेत. जिथे हिंमत नाही तिथे उमंग उत्साह नाही आणि स्व परिवर्तना शिवाय विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये मनासारखी सफलता मिळत नाही, कारण ही अलौकिक ईश्वरीय सेवा एकाच वेळी तीन प्रकारच्या सेवेची सिद्धी आहे. ती तीन प्रकारची सेवा एकत्र कोणती आहे? एक वृत्ती, दुसरे प्रकंपन, तिसरी वाणी. तिन्ही पण शक्तिशाली, निमित्त, निर्माण आणि निस्वार्थ या आधारावर आहेत, तेंव्हा मना सारखी सफलता मिळते. नाही तर फक्त सेवा होते, स्वतःला किंवा दुसऱ्याला थोड्यावेळे साठी सेवेच्या सफलतेने खुश करतात परंतु मना सारखी सफलता,जी बापदादा सांगत आहेत, ती मिळत नाही. बापदादा पण मुलांच्या खुशी मध्ये खुश होतात, परंतु दिलारामा च्या मनामध्ये यथाशक्ती निकाल स्पष्ट जरूर होतो. "शब्बास, शब्बास!" जरूर म्हणतात, परंतु बाबाची प्रत्येक मुलावर नेहमी वरदानाची दृष्टी आणि वृत्ती राहते कि, ही मुले आज नाहीतर उद्या सिद्धी स्वरूप बनणार आहेत, परंतु वरदाता बरोबर शिक्षक पण आहेत, त्यामुळे पुढील गोष्टी साठी लक्ष पण देत आहेत.

तर आज बापदादा विश्व परिवर्तनाच्या कार्याला आणि विश्वपरिवर्तक मुलांच्या निकाला ला पाहत होते. वृध्दी तर होत आहे, आवाज पण चोहीकडे पसरला आहे, प्रत्यक्षतेचा पडदा उघडण्यास पण आरंभ झाला आहे. चोहीकडच्या आत्म्यामध्ये आता इच्छा उत्पन्न होत आहे कि, जवळ जाऊन पहावे, ऐकलेल्या गोष्टी आता पाहण्यासाठी इच्छुक आहेत. हे सर्व परिवर्तन होत आहे. तरीपण विश्वनाटका नुसार आतापर्यंत बाबा आणि कांही निमित्त बनलेल्या श्रेष्ठ आत्मांच्या शक्तिशाली प्रभावाचा परिणाम पण दिसून येत आहे. जर बहुसंख्येने या विधीद्वारे सिद्धीला प्राप्त करतील तर फारच लवकर सर्व ब्राह्मण सिद्धी स्वरूपा मध्ये प्रत्यक्ष होऊन जातील. बापदादा पाहत होते, मनपसंद, लोकपसंद, बाप पसंद सफलतेचा आधार, स्व परिवर्तनाची आता कमतरता आहे आणि स्व परिवर्तनाची कमतरता कां आहे? त्याचा मूळ आधार एका विशेष शक्तीची कमी आहे, ती विशेष शक्ती जाणिवेची शक्ती आहे कोणत्या पण परिवर्तनाचा सहज आधार जाणिवेची शक्ती आहे. जोपर्यंत जाणिवेची शक्ती नाही तोपर्यंत अनुभूती होणार नाही आणि जोपर्यंत अनुभूती नाही तोपर्यंत ब्राह्मण जीवनाच्या विशेषतेचा पाया मजबूत होणार नाही. सुरूवाती पासून आपल्या ब्राह्मण जीवनाला समोर आणा.

पहिले परिवर्तन, मी आत्मा आहे, बाबा माझे आहेत, हे परिवर्तन कोणत्या आधाराने झाले? जेंव्हा जाणीव होते कि, होय, मी आत्मा आहे, हे माझे बाबा आहेत. तर जाणीव अनुभव करविते, तेंव्हाच परिवर्तन होते. जोपर्यंत जाणीव होत नाही, तोपर्यंत साधारण गतीने चालत राहता आणि ज्यावेळी जाणीवेची शक्ती अनुभवी बनविते, तेंव्हा तीव्र पुरुषार्थी बनतात.अशा ज्या पण परिवर्तनाच्या विशेष गोष्टी आहेत, मग रचियता साठी असोत, किंवा रचने साठी असोत, जोपर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये जाणीव होत नाही कि, होय, ही तिच वेळ आहे, तोच योग आहे, मी पण तिच श्रेष्ठ आत्मा आहे, तोपर्यंत उमंग उत्साहाची चाल राहात नाही. कोणत्या वातावरणाच्या प्रभावामुळे, थोड्या वेळेसाठी परिवर्तन होईल, परंतु नेहमी साठी होणार नाही. जाणीवेची शक्ती नेहमी साठी सहज परिवर्तन करते. त्यामुळे स्वपरिवर्तना मध्ये पण जोपर्यंत जाणीवेची शक्ती नाही, तोपर्यंत सदाकाळा साठी श्रेष्ठ परिवर्तन होणार नाही. या मध्ये विशेष दोन गोष्टीची जाणीव पाहिजे. एक आपल्या कमजोरीची जाणीव, दुसरे जी परिस्थिती किंवा व्यक्ती निमित्त बनली आहे, त्यांची इच्छा आणि त्यांच्या मनाची भावना किंवा व्यक्तीची कमजोरी किंवा परवश स्थितीची जाणीव, परिस्थितीच्या पेपराच्या कारणाला जाणून, स्वतःला उत्तीर्ण होण्याच्या श्रेष्ठ स्वरूपाची जाणीव असावी कि, मी श्रेष्ठ आहे, स्वस्थिती श्रेष्ठ आहे, परस्थिती पेपर आहे. ही जाणीव सहज परिवर्तन करेल आणि उत्तीर्ण व्हाल. दुसऱ्याची इच्छा किंवा दुसऱ्याच्या स्व उन्नतीची जाणीव, स्वतःच्या उन्नतीचा आधार आहे. तर स्व परिवर्तन जाणीवे च्या शक्ती शिवाय होऊ शकत नाही. यामध्ये पण एक खऱ्या मनापासून जाणीव होणे, दुसरी चतुराईची जाणीव पण आहे, कारण ज्ञानसंपन्न फार बनले आहेत. तर वेळ पाहून आपले काम सिद्ध करण्यासाठी, स्वतःचे नाव चांगले होण्यासाठी, त्यावेळी जाणीव पण होते. परंतु त्या जाणिवे मध्ये शक्ती नसल्यामुळे परिवर्तन होत नाही. तर मना पासून ची जाणीव दिलारामाचे आशीर्वाद प्राप्त करविते, आणि चतुराईची जाणीव थोड्या वेळेसाठी, दुसऱ्याला पण खुश करते, आणि स्वतःला पण खुश करते.

तिसऱ्या प्रकारची जाणीव मनाला वाटते कि, हे ठिक नाही. विवेक आवाज देतो कि, हे यथार्थ नाही, परंतु बाहेर च्या रुपाने स्वतःला महारथी सिद्ध करण्यासाठी, स्वतःच्या नावाला, कोणत्याही प्रकारे परिवारा मध्ये कमजोर किंवा कमी न समजल्यामुळे विवेकाचा खून करतात. हा विवेकाचा खून करणे पण पाप आहे. जसे आपघात महापाप आहे, तसे हे पण पापाच्या खात्यामध्ये जमा होते, त्यामुळे बापदादा हसतात. आणि त्यांच्या मनातील आवाज पण ऐकत राहतात, फार सुंदर बोलणे असते. मूळ गोष्ट अशी जाणीव असणारे हे समजतात कि, कोणाला काय माहित पडत आहे, असे तर चालतच राहते. . . परंतु बाबाला प्रत्येक पानाचा पत्ता आहे. फक्त मुखाने सांगिल्याने माहित पडते असे नाही, परंतु माहित असून सुद्धा, बाबा अनोळखी बनून भोळेपणाने भोळेनाथच्या रूपा मध्ये मुलांना चालवितात. जरी जाणतात, परंतु भोळे कां बनतात? कारण दयाळू बाबा आहेत, आणि पापातून पाप वाढू नये. त्यामुळे दया करतात. समजले? अशी मुले चतुर सुजान बाबा बरोबर अथवा निमित्त आत्मा बरोबर फार चतुर बनून समोर येतात, त्यामुळे बाबा दयाळू, भोळेनाथ बनतात.

बापदादा जवळ प्रत्येक मुलांच्या कर्माचे, मनातील विचारांचे खाते, प्रत्येक वेळेचे स्पष्ट रूपात आहे. मनाला ओळखण्याची आवश्यकता नाही, परंतु प्रत्येक मुलांच्या मनातील प्रत्येक धडधडीचे चित्र स्पष्ट आहे, त्यामुळे म्हणतात कि, मी प्रत्येकाच्या मनातील जाणत नाही,कारण जाण्याची आवश्यकताच नाही, ते तर स्पष्टच आहे. प्रत्येक वेळेचा मनातील आवाज किंवा मनातील विचारांचा चार्ट बापदादा समोर आहे. सांगू पण शकतात, असे नाही कि, सांगू शकत नाहीत. तिथी, स्थान, वेळ आणि काय काय केले, सर्व सांगू शकतात. परंतु ओळखून पण अनोळखी बनतात. तर आज सारा चार्ट पाहिला.

स्वपरिवर्तन तीव्र गतीने न झाल्यामुळे "खाऱ्या मनातील जाणिवेची कमतरता आहे." जाणिवेची शक्ती फार गोड अनुभव करू शकते. हे तर समजतात ना. कधी स्वतःला बाबाचे नुरे रत्न आत्मा म्हणजे डोळ्यांमध्ये समावलेले श्रेष्ठ बिंदू अनुभव करा. डोळ्यांमध्ये तर बिंदूच सामावू शकतो, शरीर तर सामावू शकत नाही. कधी स्वतःला मस्तकावर चमकणारा मस्तक मणी, चमकणारा तारा अनुभव करा, कधी स्वतःला ब्रह्मा बाबाचे सहयोगी, उजवा हात, साकार ब्राह्मण रूपामध्ये ब्रह्माची भुजा अनुभव करा,अशी जाणीव व्हावी. कधी अव्यक्त फरिस्ता स्वरूपाची जाणीव करा. अशा जाणिवेच्या शक्तीने फार वेगळे, अलौकिक अनुभव करा. फक्त ज्ञानाचा रीतीने वर्णन करू नका, तर जाणीव करा. या जाणिवेच्या शक्तीला वाढवा तर दुसरी कडच्या कमजोरी ची जाणीव स्वतःच स्पष्ट होईल. शक्तिशाली आरशा समोर लहानसा दाग पण स्पष्ट दिसून येईल आणि परिवर्तन करू शकाल. तर समजले, स्व परिवर्तनाचा आधार जाणिवेची शक्ती आहे. शक्तीला कार्यामध्ये लावा, फक्त मोजणी करून खुश होऊ नका. होय, ही पण शक्ती आहे, ही पण शक्ती आहे. परंतु स्वतःसाठी, सर्वासाठी, सेवेसाठी नेहमी प्रत्येक कार्यामध्ये लावा. समजले? कांही मुले समजतात कि, बाबा हेच काम करत आहेत काय? परंतु बाबा काय करणार, बरोबर तर घेऊन जायचे आहे ना. जेंव्हा बरोबर जायचे आहे तर साथी पण तसे पाहिजेत ना. त्यामुळे पाहत राहतात आणि समाचार सांगतात कि, साथी सारखे बनावेत. मागेमागे येणार्‍यांची तर गोष्टच नाही, ते तर अनेकानेक असतील, परंतु साथी तर समान पाहिजेत ना. तुम्हीं साथी आहात कां वराती आहात? वरात तर फार मोठी असेल, त्यामुळे शिवाची वरात प्रसिध्द आहे. वरात तर वेगळी असेल परंतु साथी तर तसे पाहिजेत ना.

हा पूर्वेकडील झोन आहे. पूर्वेकडील झोन काय करत आहे? प्रत्यक्षतेचा सूर्य कुठून उदय होणार? बाबाची प्रत्यक्षता झाली, ही गोष्ट आता जुनी झाली आहे. परंतु आता काय कराल? जुनी गादी आहे, हा तर नशा चांगला आहे, परंतु आता काय करणार? आता कोणत्या नवीनतेचा सूर्य उदय करणार, जे सर्वांच्या मुखातून निघेल कि, या पूर्वेकडील झोन मुळे नवीनतेचा सूर्य प्रगट झाला. जे काम आतापर्यंत कोणी केले नाही ते आता करून दाखवा. कार्यक्रम, कार्यशाळा केल्या, विशेष व्यक्तींची सेवा केली, वर्तमानपत्रांमध्ये छापले, हे तर सर्व करतात, परंतु आता नवीनतेची कांही झलक दाखवा. समजले,

बाबाचे घर ते आपले घर आहे. आरामा मध्ये सर्व पोहोचले आहेत. मनाचा आराम, स्थूल आराम पण देत आहे. मनाला आराम नसेल तर आरामाचे साधन असून पण बेआराम होतात. मनाचा आराम आहे म्हणजे मना मध्ये नेहमी राम बरोबर आहेत, त्यामुळे कोणत्या पण परिस्थिती मध्ये आराम अनुभव करता. आराम आहे ना, कां, येणे-जाणे बेआराम वाटते? तरी पण गोड विश्वनाटकातील भविष्य समजा, मेळा तर साजरा करत आहात, बाबाला भेटणे, परिवाराला भेटणे हा मेळा साजरा करण्याची पण गोड भावी आहे.

सर्व शक्तिशाली श्रेष्ठ आत्म्याना, प्रत्येक शक्तीला वेळेवर कार्यामध्ये आणणाऱ्या सर्व तीव्र पुरुषार्थी मुलांना, नेहमी स्व परिवर्तना द्वारे सेवेमध्ये दिलपसंत सफलता प्राप्त करणाऱ्या दिलखुश मुलांना, नेहमी दिलाराम बाबा समोर खऱ्या मनाने स्पष्ट राहणाऱ्या सफलता स्वरूप श्रेष्ठ आत्म्यांना दिलाराम बापदादाचा हृदयापासून प्रेमळ आठवण आणि नमस्ते.

पार्टी बरोबर अव्यक्त बापदादा ची मुलाखत:-

नेहमी स्वतःला बापदादाच्या छत्रछाये मध्ये राहणारे विशेष आत्मा अनुभव करता? जिथे बाबाची छत्रछाया आहे, तिथे नेहमी माये पासून सुरक्षित राहाल. छत्रछायेच्या आत माया येऊ शकत नाही. मेहनतीने स्वतःच दूर राहाल. नेहमी मौज मध्ये राहाल, कारण जेंव्हा कष्ट होते,तर कष्टाने मौजेचा अनुभव होत नाही. जेंव्हा मुलांचा अभ्यास असतो तर अभ्यासा मध्ये मेहनत असते ना. जेंव्हा परीक्षेचे दिवस असतात तेंव्हा फार कष्ट करतात.आनंदाने खेळत पण नाहीत. आणि जेंव्हा कष्ट नाहीसे होते, परीक्षा संपते, तर मौज करतात. तर जिथे कष्ट आहे तिथे मौज नाही. जिथे मौज आहे तिथे मेहनत नाही. छत्रछाये मध्ये राहणारे म्हणजे नेहमी मौज मध्ये राहणारे. कारण हे उच शिक्षण शिकतात, परंतु उच्च शिक्षण असून पण निश्चय आहे कि, आम्ही विजयी आहोत. पास होणारच आहोत, त्यामुळे मौज मध्ये राहता. कल्प कल्पाचे शिक्षण आहे, नवीन गोष्ट नाही, तर नेहमी मौज मध्ये राहा आणि दुसऱ्याना पण मौज मध्ये राहण्याचा संदेश देत राहा. सेवा करत राहा कारण सेवेचे फळ यावेळी पण आणि भविष्या मध्ये पण मिळत राहते. सेवा कराल तेव्हा तर फळ मिळेल.

जाण्याच्या वेळी मुख्य बंधू-भगिनी बरोबर:-

बापदादा सर्व मुलांना समान बनविण्याच्या शुभभावनेतून उंच उडवू पाहतात. निमित्त बनलेले सेवाधारी, बाबा सारखे बनणारच आहेत, कसे पण करुन बाबाला बनवायचे आहे कारण असल्या तसल्याला तर बरोबर घेऊन जाणार नाहीत. बाबाची पण शान आहे ना. बाबा संपन्न आहेत आणि साथी लुळे लंगडे आहेत तर शोभणार नाहीत. लुळे लंगडे वराती असतील, साथी नाहीत, त्यामुळे शिवाच्या वरातीत नेहमी लुळे लंगडे दाखवितात कारण कांही कमजोर आत्मे धर्मराजपुरी मधून जाऊनच लायक बनतील. अच्छा.

वरदान:-
सेवेच्या रंगमंचावर सामावून घेण्याच्या शक्तीद्वारे, सफलता मूर्त बनणारे मास्टर सागर भव

जेंव्हा सेवेच्या रंगमंचावर येता तर अनेक प्रकारच्या गोष्टी समोर येतात, त्या गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेतले तर सफलतामूर्त बनाल. सामावणे म्हणजे संकल्प रूपामध्ये पण कोणत्या पण व्यक्त गोष्टीला आणि भावनेला आंशिक रूपाने पण सामावणे नसावे. अकल्याणकारी बोल कल्याणा मध्ये असे बदलून टाका जसे अकल्याणाचे बोल नव्हतेच. अवगुणाला गुणां मध्ये,निंदेला स्तुती मध्ये बदलून टाका, तेंव्हाच मास्टर सागर म्हटले जाईल.

सुविचार:-
विस्ताराला न पाहता सार पाहणारे किंवा स्वतःमध्ये सामावून घेणारेच तीव्र पुरुषार्थी आहेत.