30-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो - तुम्हाला श्रीमतावर तत्त्वांसहित संपूर्ण दुनियेला पावन बनवण्याची सेवा करायची आहे,सर्वांना सुख आणि शांतीचा रस्ता सांगायचा आहे."

प्रश्न:-
तुम्ही मुले आपल्या देहाला पण विसरण्याचा पुरुषार्थ करता त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही?

उत्तर:-
चित्रांची.जेंव्हा हे चित्र (देह) पण विसरायचे आहे.तर त्या चित्रांची काय गरज आहे. स्वत:ला आत्मा समजा आणि विदेही पित्याची आणि मधुर घराची आठवण करा.ही चित्रे तर आहेत लहान मुलांसाठी अर्थात नवीनां साठी.तुम्हाला तर आठवणीत रहायचे आहे आणि सर्वांकडून आठवण करून घ्यायची आहे.धंदा इ.करत सतोप्रधान बनण्यासाठी आठवणीतच रहाण्याचा अभ्यास करा.

गीत:-

भाग्य उजळून आले आहे ......

ओम शांती।
गोड-गोड मुलांनी ही अक्षरे ऐकली आणि लगेच खुशीत शहारे उभे राहिले असतील.मुले जाणतात इथे आलो आहोत आपले सौभाग्य,स्वर्गाचे भाग्य घेण्यासाठी.असे अजून कुठेही म्हणत नाहीत.तुम्ही जाणता आम्ही पित्याकडून स्वर्गाचा वारसा घेत आहोत अर्थात स्वर्ग बनवण्याचा पुरुषार्थ करत आहे. फक्त स्वर्गवासी बनण्याचा नाही परंतु स्वर्गात उच्च ते उच्च पद मिळवण्याचा पुरुषार्थ करत आहे. स्वर्गाचा साक्षात्कार करवणारा पिता आम्हाला शिकवत आहे.हा पण मुलांना नशा चढायला हवा. भक्ती आता संपत आहे.म्हटले जाते भगवान भक्तांचा उध्दार करण्यासाठी येतो कारण रावणाच्या साखळीत फसलेले आहेत.अनेक मनुष्यांची अनेक मते आहेत.तुम्ही तर जाणले आहे.सृष्टीचे चक्र हा अनादि खेळ बनलेला आहे.हे पण भारतवासी समजतात,बरोबर आम्ही प्राचीन नव्या दुनियेचे निवासी होतो, आता जुन्या दुनियेचे निवासी बनलो आहे.पित्याने स्वर्ग नवी दुनिया बनवली,रावणाने परत नर्क बनवला आहे.बापदादांच्या मतावर तुम्ही आता आपल्यासाठी नवीन दुनिया बनवत आहात.नवीन दुनियेसाठी शिकत आहात.कोण शिकवत आहे? ज्ञानाचा सागर,पतित- पावन ज्याची महिमा आहे.एका शिवाय दुसऱ्या कोणाचीही महिमा गायली जात नाही.तोच पतित- पावन आहे.आपण सर्व पतित आहोत.पावन दूनियेची आठवण कोणालाच नाही.आता तुम्ही जाणता बरोबर 5 हजार वर्षांपूर्वी पावन दुनिया होती.हा भारतच होता.बाकी सर्व धर्म शांततेत होते.आपण भारतीय सुखधाम मध्ये होतो.मनुष्याला शांती पाहिजे पण इथे कोणी शांत राहू शकत नाही.हे काही शांतीधाम नाही.शांतीधाम आहे निराकारी दुनिया,जिथून आपण येतो.बाकी सतयुग आहे सुखधाम,त्याला शांतीधाम म्हणत नाही.जिथे तुम्ही पवित्रता-सुख-शांती मध्ये राहता. कोणतीही दंगल नसते.घरात मुले भांडण इ.करतात तर त्यांना सांगितले जाते शांत रहा.तर बाबा म्हणतात तुम्ही आत्मे त्या शांती देशाचे होते.आता भांडखोर देशामध्ये येऊन बसले आहात.ही गोष्ट तुमच्या बुद्धिमधे आहे.तुम्ही पित्याकडून परत उच्च ते उच्च पद मिळवण्याचा पुरुषार्थ करत आहात.ही शाळा कमी थोडीच आहे.ईश्वर पित्याचे विद्यापीठ आहे.संपूर्ण दुनियेत हे मोठ्यात मोठे विद्यापीठ आहे.यामधे सर्व पित्याकडून शांती आणि सुखाचा वारसा घेतात.एका पित्या शिवाय कोणाचीच महिमा नाही.ब्रह्माची महिमा थोडीच आहे.बाबाच यावेळी येऊन वारसा देतात.मग तर सुखच सुख आहे.सुख-शांती देणारे एक बाबा आहेत.त्यांचीच महिमा आहे.सतयुग-त्रेता मध्ये कोणाची महिमा होत नाही.तिथे तर राजधानी चालत राहते.तुम्ही वारसा प्राप्त करता,बाकी सगळे शांतीधाम मध्ये राहतात.महिमा कोणाची नाही.भले क्राइस्ट धर्म स्थापन करतो,तो तर करायचाच आहे.धर्म स्थापन करतात परत खाली उतरत जातात.महिमा काय झाली? महिमा फक्त एकाचीच आहे,ज्याला पतित- पावन मुक्तिदाता म्हणून बोलावतात.त्यांना क्राइस्ट बुद्ध इ.आठवणीत येतो असे नाही. तरीही आठवण एकाचीच करतात ओ परमपिता.सतयुगात तर कोणाची महिमा होत नाही.शेवटी हे धर्म सुरू होतात तर बाबांची महिमा गातात आणि भक्ती सुरू होते.नाटक कसे बनले आहे.कसे चक्र फिरते तर जे बाबांची मुले बनली आहेत,तेच जाणतात. बाबा आहे रचता.नवीन सृष्टी स्वर्ग रचतात.परंतु सर्व तर स्वर्गात येऊ शकत नाहीत.नाटकाचे रहस्य पण समजून घ्यायचे आहे.पित्याकडून सुखाचा वारसा मिळतो.यावेळी सर्व दु:खी आहेत.सगळ्यांना परत जायचे आहे परत सुखात येतील. तुम्हा मुलांना खूप चांगली भूमिका मिळाली आहे.ज्या पित्याची एवढी महिमा आहे ते आता येऊन समोरच बसले आहेत आणि मुलांना समजावत आहेत.सर्व मुले आहेत ना.बाबा तर सदाखुश आहेत.वास्तवामध्ये बाबांसाठी असे म्हणू शकत नाही.जर ते खुश बनले तर नाखूष पण बनावे लागेल.बाबा तर या सर्वातून न्यारा आहे.जी बाबांची महिमा आहे तीच यावेळी तुमची महिमा आहे परत भविष्यात तुमची महिमा वेगळी असेल.जसे बाबा ज्ञानाचे सागर आहेत,तुम्ही पण आहात.तुमच्या बुद्धिमधे सृष्टी चक्राचे ज्ञान आहे.जाणता बाबा सुखाचा सागर आहे,त्यांच्याकडून खूपच सुख मिळते.यावेळी तुम्ही बाबांकडून वारसा घेत आहात.बाबा मुलांना आता श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत.जसे हे लक्ष्मी-नारायण आहेत,यांनी अवश्य मागच्या जन्मी चांगले कर्म केले आहे ज्यामुळे हे पद मिळवले आहे.दूनियेत कोणी हे समजत नाही की यांनी हे पद कसे मिळवले आहे?

बाबा म्हणतात तुम्ही मुले आता असे बनत आहात.तुमच्या बुद्धिमधे हे येते आम्ही असे होतो परत हे बनत आहे.बाबा बसून कर्म-अकर्म-विकर्माची गति समजावत आहेत ज्यामुळे आपण असे बनतो.श्रीमत देतात तर श्रीमत जाणली पाहिजे ना.श्रीमताने सर्व दुनिया तत्त्व इ. सर्वांना श्रेष्ठ बनवतात.सतयुगात सर्व श्रेष्ठ होते.तिथे काही दंगल व वादळे इ.होत नाहीत.ना जास्त थंडी,ना गरमी.सदैव बहारी ऋतू असतो.तिथे तुम्ही किती सुखी असता.ते लोक गातातही खुदा बहिश्त किंवा हेविन(स्वर्ग) स्थापन करतात.तर त्यात उच्च पद मिळवण्याचा पुरूषार्थ केला पाहिजे.नेहमी गायले जाते मात- पित्याचे अनुकरण करा.बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील.आणि परत पित्या सोबत आम्ही आत्मे एकत्र जाऊ.श्रीमतावर चालून प्रत्येकाला रस्ता सांगायचा आहे. बेहदचा पिता स्वर्गाचा रचयिता आहे.आता तर नर्क आहे.अवश्य नरकामध्ये स्वर्गाचा वारसा दिला असेल.आता ८४ जन्म पूर्ण होत आहेत नंतर आपल्याला पहिला जन्म स्वर्गामध्ये घ्यायचा आहे. तुमचे एम आब्जेक्ट(उद्दीष्ट) समोर उभे आहे.हे बनायचे आहे. आम्ही सो लक्ष्मी-नारायण बनत आहे,वास्तवात या चित्रांची गरज नाही.जे कच्चे आहेत,सारखे- सारखे विसरून जातात,यामुळे चित्रे ठेवली जातात.कोणी कृष्णाचे चित्र ठेवतात.कृष्णाला पाहिल्या शिवाय आठवण करू शकत नाही.सर्वांच्या बुद्धीमध्ये चित्र तर राहते.तुम्हाला काही चित्र लावायची गरज नाही.तुम्ही स्वतःला आत्मा समजता, तुम्हाला स्वतःचे चित्र पण विसरायचे आहे.देहा सहित सर्व संबंध विसरायचे आहेत.बाबा म्हणतात तुम्ही आहे आशिक, एका माशूकचे.माशुक (प्रियकर) बाबा म्हणतात माझी आठवण करत रहा तर विकर्म विनाश होतील.अशी अवस्था राहो जेंव्हा शरीर ज्या क्षणी सुटेल तर समजतील आम्ही या जुन्या दुनियेला सोडून आता बाबांकडे जात आहे.८४ जन्म पूर्ण झाले आता जायचे आहे.बाबांनी आदेश दिला आहे माझी आठवण करा. बस बाबा आणि गोड घराची आठवण करा.बुद्धीमध्ये आहे की मी आत्मा शरीराविना होते परत इथे भूमिका बजावण्यासाठी शरीर धारण केले आहे.भूमिका बजावता-बजावता पतित बनलो आहे.हे शरीर तर जुनी चप्पल आहे.आत्मा पवित्र होत आहे. पवित्र शरीर तर इथे मिळू शकत नाही.आता आपण आत्मे परत घरी जात आहे.पहिल्यांदा राजकुमार-कुमारी बनू नंतर स्वयंवरानंतर लक्ष्मी-नारायण बनणार आहे.मनुष्यांना हे माहीत नाही की राधे-कृष्ण कोण आहेत?दोघे वेगवेगळ्या राजधानीचे होते परत त्यांचे स्वयंवर होते.तुम्ही मुलांनी ध्यानात स्वयंवर पाहिले आहे. सुरूवातीला खूप साक्षात्कार होत होते कारण पाकिस्तानात तुम्हाला खुशीत ठेवायला हे सर्व अभिनय चालायचे.शेवटी तर आहेच मारामारी.भूकंप वगैरे खूप होतील.तुम्हाला साक्षात्कार होत राहतील.प्रत्येकाला माहित पडेल आम्ही कोणते पद मिळवणार आहे.परत जे कमी शिकले असतील ते खूप पश्चात्ताप करतील.बाबा म्हणतील तुम्ही शिकला नाही,ना दुसऱ्याला शिकवले,ना आठवणीत राहीलात.आठवणीनेच सतोप्रधान बनू शकता.पतित-पावन तर बाबाच आहेत.ते म्हणतात माझी आठवण करा तर तुमची खाद(कट)निघेल.आठवणीच्या यात्रेचा पुरूषार्थ करायचा आहे. धंदा इ.भले करा.कर्म तर करायचे आहे ना.परंतु बुद्धिचा योग तिथे राहो.तमोप्रधान पासून सतोप्रधान इथे बनायचे आहे.गृहस्थ व्यवहारात राहताना तुम्ही माझी आठवण करा तेंव्हाच तुम्ही नवीन दुनियेचे मालक बनाल.बाबा अजून काही त्रास देत नाही. तुम्हाला खूप सहज उपाय सांगत आहेत.सुखधामचे मालक बनण्यासाठी माझी आठवण करा.आता तुम्ही आठवण करा- बाबा पण तारा आहे.मनुष्य तर समजतात तो सर्वशक्तीमान आहे, खूप तेजस्वी आहे.बाबा म्हणतात मनुष्य सृष्टीचा चैतन्य बीजरुप आहे.बीज असल्याने सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतो. तुम्ही तर बीज नाही,मी बीज आहे त्यामुळे मला ज्ञान सागर म्हणतात.मनुष्य सृष्टीचा चैतन्य बीज आहे त्यांना अवश्य माहित असेल की हे सृष्टी चक्र कसे फिरते.ऋषी-मुनी कोणी रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत.मुलांनी जर जाणले तर त्यांच्याकडे जायला वेळ लागणार नाही.परंतु बाबांकडे जाण्याचा रस्ता कोणी जाणत नाही.पावन दुनियेमध्ये पतित जाऊच कसे शकतात यामुळेच बाबा म्हणतात काम महाशत्रूवर विजय मिळवा. हाच तुम्हाला आदि-मध्य-अंत दु:ख देतो.तुम्हा मुलांना किती चांगल्या रीतीने समजावतात. काही त्रास नाही.फक्त बाबा आणि वारसाची आठवण करायची आहे.बाबांची आठवण अर्थात योगाने पाप भस्म होतील. सेकंदात बाबां कडूनच बादशाही मिळते.मुले भले स्वर्गात तर येतील परंतु स्वर्गात पण उच्च पद मिळवणे याचा पुरूषार्थ करायचा आहे.स्वर्गात तर जायचे आहे. थोडेसे ऐकले तरी समजतील बाबा आले आहेत.तेच महाभारत युद्ध आहे.अवश्य बाबा पण असतील जे मुलांना राजयोग शिकवतात.तुम्ही सर्वांना जागवता.जे अनेकांना जागवतील ते उच्च पद मिळवतील.पुरूषार्थ करायचा आहे.सर्व एकसारखे पुरूषार्थी होऊ शकत नाही. शाळा खूप छान आहे.हे आहे विश्वविद्यापीठ.संपूर्ण दुनियेला सुखधाम आणि शांतीधाम बनवायचे आहे.असा शिक्षक कधी असतो का? विश्‍व साऱ्या दुनियेला म्हटले जाते.बाबाच संपूर्ण विश्वातील मनुष्यांना सतोप्रधान बनवतात अर्थात स्वर्ग बनवतात.

भक्ती मार्गात जे पण सण साजरे करतात ते सर्व आता संगमयुगाचे आहेत.सतयुग-त्रेता मध्ये कोणताही सण नसतो.तिथे तर प्रालब्ध भोगतात.सण सगळे इथे साजरे करतात.होळी आणि धूलिवंदन सर्व ज्ञानाच्या गोष्टी आहेत.भुतकाळात जे घडले त्याचे सर्व सण साजरे करत आले आहेत.सर्व यावेळेचे आहेत.होळी पण यावेळेची आहे.या १०० वर्षांत सर्व काम होऊन जाते. सृष्टी पण नवीन बनते.तुम्ही जाणता आपण अनेक वेळा सुखाचा वारसा घेतला आहे परत गमावला आहे.खुशी होते आपण परत बाबां कडून वारसा घेत आहे.इतरांनाही रस्ता सांगायचा आहे.नाटका अनुसार स्वर्गाची स्थापना अवश्य होणार आहे. जसे दिवसानंतर रात्र,रात्री नंतर दिवस होतो तसेच कलीयुगानंतर सतयुग अवश्य होईल.गोड-गोड मुलांच्या बुद्धिमधे खुशीचा नगारा वाजायला हवा.आता वेळ पूर्ण होत आहे,आम्ही शांतीधाम मधे जात आहे.हा शेवटचा जन्म आहे. कर्मभोगाची भोगना पण खुशीमधे हल्की होते.काही भोगनेने,काही योगबळाने हिसाब-किताब चुक्तू होतील.बाबा मुलांना धैर्य देतात, तुमचे सदा सुखाचे दिवस येत आहेत.धंदा इ.पण करायचा आहे. शरीर निर्वाहासाठी पैसे तर पाहिजेत ना.बाबांनी समजावले आहे धंदे वाले लोक दानधर्मासाठी पैसे बाजुला काढतात.समजतात जास्त धन एकत्र झाले तर खूप दान करु. इथे पण बाबा समजावतात कोणी दोन पैसे पण दिले तर त्यांना मोबदल्यात २१ जन्मांसाठी प्राप्ती मिळते.अगोदर साधू-संत इ.ना देत होते.आता तर तुम्ही जाणता हे सर्व संपणार आहे. आता मी समोर आलो आहे तर या कार्यामधे लावा.तर तुम्हाला २१ जन्मांसाठी वारसा मिळेल. आधी तुम्ही अप्रत्यक्षपणे देत होते,हे आहे प्रत्यक्षपणे.बाकी तर तुमचे सर्व नष्ट होऊन जाईल. बाबा म्हणतात-पैसे आहेत तर सेंटर खोला.अक्षर लिहा-खरी गीता पाठशाळा.भगवानुवाच मामेकम (माझी)आठवण करा आणि वारसाची आठवण करा. अच्छा.

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पित्यासमान योग्य बनण्यासाठी पित्याचे अनुकरण करायचे आहे.

२) हा शेवटचा जन्म आहे,आता घरी जायचे आहे त्यामुळे खुशीमधे मनातल्या मनात नगारे वाजत राहो.कर्मभोगाला कर्मयोगाने अर्थात बाबांच्या आठवणीने खुशी-खुशीने चुक्तू करायचे आहे.

वरदान:-
आपल्या स्मृतीच्या ज्योती ने ब्राह्मण कुळाचे नाव उजळवणारे कुल दिपक भव.

हे ब्राम्हण कुळ सर्वात मोठयात मोठे आहे,या कुळाचे तुम्ही सर्व दिपक आहात.कुळ दिपक अर्थात सदा आपल्या स्मृतीच्या ज्योतीने ब्राह्मण कुळाचे नाव उजळवणारे. अखंड ज्योती अर्थात सदैव स्मृती स्वरुप आणि समर्थ स्वरुप.जर आठवण राहीली की मी मास्टर सर्वशक्तीवान आहे तर समर्थ स्वरुप स्वतः राहतील.या अखंड ज्योतीचे प्रतीक तुमच्या जड़ चित्रांसमोर अखंड ज्योती जागवतात.

बोधवाक्य:-
जे सर्व आत्म्यांच्या प्रति शुद्ध संकल्प ठेवतात तेच वरदानी मूर्त आहेत.