24-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,सर्वोत्तम युग हे संगम युग आहे, यामध्ये तुम्ही आत्मे परमात्मा पित्याला
भेटता,हा खरा कुंभ आहे."
प्रश्न:-
कोणता पाठ
बाबाच शिकवितात, कोणी मनुष्य शिकवू शकत नाही?
उत्तर:-
आत्म अभिमानी बनण्याचा पाठ, एक बाबाच शिकवत आहेत. हा पाठ कोणी देहधारी शिकवू शकत
नाही. प्रथम तुम्हाला आत्म्याचे ज्ञान मिळत आहे. तुम्ही जाणता की आम्ही आत्मे
परमधाम मधून अभिनेता बणुून अभिनय करण्यासाठी आलो, आता नाटक पूर्ण होत आहे,हे नाटक
पूर्वापार बनलेले आहे, याला कोणी बनविलेले नाही, त्यामुळे त्याचा आधी आणि अंत पण
नाही.
गीत:-
जाग सजनी जाग....
ओम शांती।
मुलांनी हे गीत अनेक वेळा ऐकलेले आहे. साजन सजनी ना म्हणत आहेत. त्यांना साजन म्हटले
जाते, जेव्हा शरीरामध्ये येतात. नाहीतर ते पिता आहेत, तुम्ही मुले आहात.तुम्ही सर्व
भक्तीन आहात. भगवानाची आठवण करता. नवरी मुलगी नवऱ्याची आठवण करते. सर्वांचा माशुक
आहे पती(शिवबाबा) तो बसून मुलांना समजावत आहे. आता जागे व्हा,नवयुग येत आहे. नवीन
म्हणजे नवी दुनिया सतयुग ,जुनी दुनिया हे कलियुग. आता बाबा आले आहेत, तुम्हाला
स्वर्गवासी बनविण्यासाठी. कोणी मनुष्य असे म्हणू शकत नाही, की मी तुम्हाला
स्वर्गवासी बनवत आहे. संन्यासी तर स्वर्ग आणि नरकाला काहीच जाणत नाहीत.ज्याप्रमाणे
इतर धर्म आहेत त्याप्रमाणे संन्याशाचा पण एक वेगळा धर्म आहे. तो काही आदि सनातन देवी
देवता धर्म नाही. आदि सनातन देवी देवता धर्माची भगवान स्थापना करत आहेत.जे नर्क वासी
आहेत तेच मग स्वर्गवासी देवता बनत आहेत.आता तुम्ही नर्क वासी नाही, आता तुम्ही आहात
संगम युगावर. संगम असतो मध्ये. संगमावर तुम्ही स्वर्गवासी बनण्याचा पुरुषार्थ करत
आहात. त्यामुळे संगम युगाची महिमा आहे. कुंभमेळा पण वास्तवामध्ये हा आहे यालाच
पुरुषोत्तम म्हटले जाते. तुम्ही जाणता की आम्ही सर्व एका बाबांची मुले आहोत.बंधत्व
भाव म्हणतात ना.सर्व आत्मे आपसात भाऊ भाऊ आहेत.असे म्हणतात ही चिनी हिंदी भाऊ भाऊ.
सर्व धर्माच्या हिशोबाने तर भाऊ-भाऊ आहोत, हे ज्ञान तुम्हाला आता मिळाले आहे.बाबा
सांगतात की तुम्ही माझी मुले आहात.आता तुम्ही समोर ऐकत आहात.ते तर फक्त म्हणण्या
पुरते म्हणतात की सर्व आत्म्यांचा पिता एक आहे. त्या एकाचीच आठवण करावयाची आहे.
पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये ही आत्मा आहे. त्या हिशोबाने भाऊ-भाऊ आहोत,मग भाऊ-बहीण
त्यानंतर स्त्री-पुरुष होतात. तर बाबा येऊन मुलांना समजावत आहेत. गायनही केले जाते
की आत्मा आणि परमात्मा वेगळे राहिले फार काळ..... असे नाही म्हटले जात, की नदी आणि
सागर वेगळे राहिले फार काळ.... मोठमोठ्या नद्या तर सागराशी मिळून जातात. हे पण मुले
जाणतात की, नदी सागराची मुलगी आहे. सागरातुन पाणी निघते, ढगांद्वारे परत पाऊस पडतो
डोंगरावर, नंतर नद्या बनतात. त्यामुळे सर्व सागराची मुले आणि मुली आहेत. अनेकांना
हे पण माहीत नाही की पाणी कुठून येते. हे पण शिकविले जाते.तर आता मुलं जाणतात की
ज्ञानाचे सागर एक बाबा आहेत. हे पण समजावले जाते की,तुम्ही सर्व आत्मे आहात, पिता
एक आहे. आत्मा पण निराकार आहे,नंतर जेव्हा साकार मध्ये येते तेव्हा पुनर्जन्म घेते.
बाबा पण जेव्हा साकार मध्ये येतील तेव्हा भेटतात. बाबांचे भेटणे एकाच वेळेत होते.
यावेळी येऊन सर्वांना भेटतात. हे पण जाणतील की ते भगवान आहेत. गीतेमध्ये कृष्णाचे
नाव लिहले आहे, परंतु कृष्ण तर इथे येऊ शकत नाही. ते कसे शिव्या खातील? हे तुम्ही
मुले जाणता की, कृष्णाची आत्मा आता आहे. प्रथम तुम्हाला आत्म्याचे ज्ञान मिळाले आहे.
तुम्ही आत्मा आहात. आत्तापर्यंत स्वतःला शरीर समजून चाललो होतो, आता बाबा येऊन आत्म
अभिमानी बनवत आहेत.साधुसंत इत्यादी तुम्हाला कधी आत्म अभिमानी बनवत नाहीत. तुम्ही
मुलं आहात. तुम्हाला बेहद्द च्या पित्याकडून वारसा मिळत आहे.तुमच्या बुद्धीमध्ये आहे
की आम्ही परमधाम चे राहणारे आहोत,आम्ही येथे अभिनय करण्यासाठी आलो आहोत.आता हे नाटक
संपत आहे, हे नाटक कोणी बनवलेलं नाही. हे पूर्वापार चालत आलेलं नाटक आहे. तुम्हाला
विचारतात हे नाटक केव्हापासून सुरू झाले? तुम्ही सांगा हे तर अनादि नाटक आहे. याचा
आदि आणि अंत नाही. जुन्या पासून नवे, नव्या पासून जुने होते. हा पाठ तुम्हा मुलांना
पक्का आहे. तुम्ही जाणता की, नवीन दूनिया कधी बनते, मग जुनी कधी होते. हे पण
कोणाच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे नाही. तुम्ही जाणता की आता नाटक पूर्ण होत आहे परत
पुनरावृत्ती होईल. बरोबर आमची 84 जन्मांची भूमिका पूर्ण झाली.आता बाबा आम्हाला घेऊन
जाण्यासाठी आले आहेत. बाबा मार्गदर्शक पण आहेत ना.तुम्ही सर्व मार्गदर्शक आहात.
मार्गदर्शक(पंडे) लोक यात्रेकरूला घेऊन जातात. ते आहेत शरिराचे मार्गदर्शक,तुम्ही
आहात आत्मिक मार्गदर्शक. त्यामुळे तुमचे नाव पांडव सेना पण आहे, परंतु गुप्त. पांडव
कौरव यादव काय करत होते. या वेळेची गोष्ट आहे जेव्हा महाभारताच्या लढाईची वेळ आहे,
अनेक धर्म आहेत दुनिया पण तमोप्रधान आहे. अनेक धर्माचे झाड सारे जुने झाले आहे,
तुम्ही जाणता की या झाडाचा पहिला पहिला आधारस्तंभ आहे आदि सनातन देवी देवता धर्म.
सत युगा मधे थोडे असतात. नंतर वाढ होत राहते, हे कोणालाही माहीत नाही. तुमच्यामध्ये
पण नंबर वार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कोणी चांगला समजदार असतो, चांगली धारणा करतात
आणि इतरांना कळविण्याचा छंद राहतो. कुणीतरी चांगल्याप्रकारे धारणा करत आहेत, कुणी
मध्यम, कुणी तिसऱ्या नंबरने, कुणी चौथ्या क्रमांकाने. प्रदर्शनीमध्ये तर बारकाव्याने
समजावणारे पाहिजेत. अगोदर सांगा की दोन पिता आहेत. एक बेहद चे पारलौकिक पिता, दुसरे
आहेत हदचे लौकिक पिता. भारताला बेहद्द चा वारसा मिळाला आहे. भारत स्वर्ग होता, जो
आता नर्क बनला आहे. याला आसुरी राज्य म्हटले जाते. भक्ती पण प्रथम अव्यभिचारी असते.
एक शिव बाबांची आठवण करतात.
बाबा म्हणतात, की मुलांनो, पुरुषोत्तम म्हणायचं आहे तर ज्या कनिष्ठ बनविणार्या
गोष्टी आहेत त्या ऐकू नका, एका बाबांकडून ऐका, अव्यभिचारी ज्ञान ऐका. दुसऱ्या
कोणाकडून ऐकाल ते खोटे आहे. बाबा तुम्हाला पुरुषोत्तम बनवित आहेत. आसुरी गोष्टी
तुम्ही ऐकून ऐकून कनिष्ठ बनले आहात. प्रकाश आहे ब्रह्माचा दिवस, अंधार आहे ब्रम्हाची
रात्र. या सर्व गोष्टी धारण करायच्या आहेत.क्रमानुसार तर प्रत्येक गोष्टी मध्ये
आहेत ना. कुणी डॉक्टर एका शस्त्रक्रियेचे १०-२०हजार घेतात, कोणाला तर खायला ही मिळत
नाही. वकील पण असे आहेत. तुम्ही पण जेवढे शिकाल आणि शिकवाल तेवढे उंच पद प्राप्त
कराल. फरक तर आहे ना. दास-दासी मध्येही नंबर वार असतात. सारा आधार शिक्षणावर आहे.
स्वतःला विचारले पाहिजे आम्ही किती शिकत आहोत? भविष्य जन्मजन्मांतर काय बनू? जे
जन्मजन्मांतर बनाल तेच कल्प कल्पांतर बनाल. त्यामुळे अभ्यासावर पूर्ण लक्ष दिले
पाहिजे. विष पिणे तर एकदम सोडून दिले पाहिजे. सत्य युगामध्ये तर असे म्हणत नाहीत,
मुत पलीती कपडं धोए (बाबाच आत्मा आणि शरीर दोन्ही स्वच्छ करतात). यावेळी सर्वांचे
शरीर सडलेलं आहे. तमो प्रधान आहे ना.या पण समजण्याच्या गोष्टी आहेत. सर्वात जुने
शरीर कोणाचे आहे? यावेळी आमचे शरीर बदलत आहे. आत्मा पतित बनत जाते. शरीर पण पतित
जुने होत जाते. शरीर बदलत जाते, आत्मा तर बदलत नाही. शरीर वृद्ध झाले, मृत्यू झाला,
हे पण नाटक बनलेले आहे. सर्वांची भूमिका आहे, आत्मा अविनाशी आहे. आत्मा स्वतः म्हणते,
मी शरीर सोडत आहे.आत्म अभिमानी बनायचे आहे. मनुष्य सर्व देह अभिमानी आहेत. अर्धा
कल्प आहे देह अभिमानी अर्धा कल्प आहे आत्म अभिमानी.
आत्म अभिमानी बनल्यामुळे सतयुगी देवी-देवतांना मोहजीतचे नाव मिळाले आहे. कारण तेथे
समजतात, आम्ही आत्मा आहे. आता हे शरीर सोडून दुसरे घ्यावयाचे आहे. मोहजीत राजाची पण
कथा आहे ना. बाबा समजावतात की देवी-देवता मोह जीत होते. खुशीने एक शरीर सोडून दुसरे
घेतात. मुलांना सारे ज्ञान बाबांकडून मिळत आहे. तुम्हीपण चक्र पूर्ण करून आता परत
भेटले आहात. जे इतर धर्मांमध्ये धर्मांतरीत झाले आहेत, ते पण येऊन भेटतील. थोडासा
का होईना पण आपला वारसा घेतील. धर्मच बदलला गेला आहे. माहित नाही किती काळ त्या
धर्मांमध्ये राहिले. दोन-तीन जन्म घेतले असतील.कोणाला हिंदू पासून मुसलमान बनविले
तर त्या धर्मातून ते परत इकडे येतात. या पण आहेत सविस्तर गोष्टी. बाबांची आठवण करत
नाहीत. यामध्ये माया विसरायला लावते. तुम्हीपण पूर्वी मायेचे गुलाम होता, आता
ईश्वराचे बनले आहात. ही नाटकांमध्ये भूमिका आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
करायची आहे. जेव्हा तुम्ही आत्मा प्रथम शरीरामध्ये आले तेव्हा तुम्ही पवित्र होते,
नंतर पुनर्जन्म घेत- घेत पतित बनले आहात.आता परत बाबा म्हणतात नष्टोमोहा बना. या
शरीरामध्ये ही मोह ठेवू नका.
आता तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेपासून बेहद चे वैराग्य येत आहे, कारण या
दुनियेमध्ये सर्व एक - दुसऱ्याला दुःख देणारे आहेत. त्यामुळे या जुन्या दुनिया लाच
विसरून जा.आम्ही अशरीरी बनुन आलो होतो, परत आता अशरीरी होऊन जायचे आहे. आता ही
दुनियाच नष्ट होणार आहे. तमोप्रधान पासून सत्तो प्रधान बनण्यासाठी बाबा म्हणतात माझी
एकट्याची आठवण करा. कृष्ण तर असे म्हणू शकत नाहीत की माझी एकट्याची आठवण करा. कृष्ण
तर सत युगामध्ये असतो. बाबा पण म्हणतात की तुम्ही मला पतित-पावन पण म्हणता तर आता
माझी आठवण करा, मी युक्ती सांगत आहे. कल्प कल्पा साठी पावन बनवण्याची युक्ती सांगत
आहे. जेव्हा जुनी दुनिया होते तेव्हा भगवानाला यावे लागते. मनुष्यांनी विश्व नाटकाचा
कालावधी लांबलचक केला आहे. त्यामुळे मनुष्य विसरून गेले आहेत. आता तुम्ही जाणता की
हे संगम युग आहे. हे आहे पुरुषोत्तम बनण्याचे युग. मनुष्य तर घोर अंधारामध्ये पडले
आहेत. यावेळी सर्व आहेत तमो प्रधान.आता तुम्ही तमो प्रधान पासून सत्तो प्रधान बनत
आहात. तुम्हीच सर्वात जास्त भक्ती केली आहे. आता भक्तिमार्ग समाप्त होत आहे. भक्ति
मृत्यू लोकांमध्ये असते,नंतर अमर लोक येते. यावेळी तुम्ही ज्ञान घेत आहात नंतर
भक्तीचे लक्षण पण राहणार नाही. हे भगवान, हे राम, ही सर्व भक्ती मधील अक्षरे आहेत.
ज्ञानामध्ये काही आवाज करायचा नाही. बाबा ज्ञानाचे सागर आहेत, आवाज थोडेच करतात.
त्यांना म्हटलेच जाते सुख शांती चा सागर, ज्ञान सांगण्यासाठी त्यांना शरीर पाहिजे
ना. भगवाना ची भाषा कोणती आहे, हे कोणीच जाणत नाही. असे तर नाही की बाबा सर्व
भाषेमध्ये बोलतील, नाही, त्यांची भाषा आहे हिन्दी, बाबा एकाच भाषेमध्ये समजावत आहेत.
नंतर भाषांतर करून तुम्ही समजावत आहात. विदेशी इ. जे पण भेटतील. त्यांना बाबांचा
परिचय द्यायचा आहे. बाबा आदी सनातन देवता धर्माची स्थापना करत आहेत. त्रिमूर्ती वर
समजावले पाहिजे. प्रजापिता ब्रह्मा चे किती ब्रह्माकुमार कुमारी आहेत. कुणीही आले
तर प्रथम त्यांना विचारा कोणाजवळ आले आहात? बोर्ड तर लावलेला आहे, प्रजापिता.... ते
तर रचणारे आहेत, परंतु त्यांना भगवान म्हणत नाहीत. भगवान निराकाराला म्हटले जाते.
हे ब्रम्हा कुमार कुमारी ब्रम्हाची संतान आहेत. तुम्ही इथे कशासाठी आले आहेत? आमच्या
बाबांकडे तुमचे काय काम! बाबांकडे मुलांचे काम असेल ना. आम्ही बाबांना
चांगल्याप्रकारे ओळखतो. गायन पण करतात की, मुलगा पित्याला प्रसिद्ध करतो. आम्ही
त्यांची मुले आहोत. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. पुरुषोत्तम
बनण्यासाठी कनिष्ठ बनविणाऱ्या ज्या आसुरी गोष्टी आहेत, त्या ऐकू नका. एका बाबां
कडूनच अव्यभिचारी ज्ञान ऐकावयाचे आहे.
2. नष्टोमोहा
बनण्यासाठी आत्म अभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करावयाचा आहे. बुद्धी मध्ये ठेवा,
ही जुनी दुःख देणारी दुनिया आहे, याला विसरायचे आहे यासाठी बेहद्द चे वैराग्य पाहिजे.
वरदान:-
बाबांचे
अनुकरण करण्याच्या पाठा द्वारे अवघडला सोपे करणारे तीव्र पुरुषार्थी भव.
अवघडला सोपे बनविणे
किंवा शेवटी पुरुषार्था मध्ये विजय प्राप्त करण्यासाठी पहिला पाठ आहे, बाबांचे
अनुकरण. हा पहिला पाठच शेवटच्या अवस्थेला जवळ आणणारा आहे. या पाठा नेच बिनचूक, एकरस
आणि तीव्र पुरुषार्थी बनाल. कारण कोणतीही गोष्ट अवघड तेव्हा वाटते, जेव्हा अनुकरण
करण्याऐवजी आपली बुद्धी चालविता, त्यामुळे आपल्याच संकल्पाच्या जाळ्यात फसता, मग
वेळ पण लागतो आणि शक्ती पण लागते. जर अनुकरण करत जाल तर वेळ आणि शक्ती दोन्ही पण
वाचेल व जमा होईल.
बोधवाक्य:-
सत्यतेला, व
स्वच्छतेला धारण करण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा.