ओम शांती:- गीतांचे बोल ऐकून तुम्हा मुलांच्या शरीरावर रोमांच उभे रहायला हवेत,कारण तुम्ही समोर बसलेले आहात ना. साऱ्या दुनियेमध्ये जरी किती तरी विद्वान,पंडित,आचार्य आहेत,पण कोणत्याही मनुष्याला हे माहित नाही की परमपिता परमात्मा दर ५००० वर्षानंतर येतात. हे मुलांनाच माहित आहे. मुलं म्हणतात की मी जो आहे, जसा आहे,तसा तुमचाच आहे. बाबा पण असेच म्हणतात, तुम्ही मुले जसे आहात तशी माझी मुले आहात. तुम्ही पण जाणता की ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत.सर्व बोलवत असतात. बाबा समजून सांगतात, पाहा रावणाचा किती प्रभाव आहे. एखाद्याच्या सुद्धा बुद्धीमध्ये येत नाही,ज्याला आम्ही परमपिता परमात्मा म्हणतो,परत पिता म्हणल्या मुळें खुशी का होत नाही,हे मुलं विसरलेली आहेत.हे बाबाच आम्हाला वारसा देतात.बाबा स्वतः समजावून सांगतात, की इतकी सहज गोष्ट कुणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. बाबा समजावून सांगतात की, ज्याला सारी दुनिया बोलवत आहे, हे परमपिता परमात्मा, हे राम, असे ओरडत,ओरडत प्राण सुद्धा सोडतात.येथे तर तेच परमात्मा तुम्हाला शिकवत आहेत.तुमची बुद्धी आता तिथे गेलेली आहे.बाबा कल्पा पूर्वीप्रमाणेच आले आहेत. कल्प कल्प बाबा येऊन पतीत आत्म्यांना पावन बनवून,दुर्गती मधून सद्गगतीमध्ये घेऊन जातात.गायन पण आहे सर्वांचे पतित पावन बाबा.आता तुम्ही मुले त्यांच्या समोर बसलेले आहात. तुम्ही अती प्रिय व गोड मुले आहात. भारत वासीयांची तर कथा आहे. बाबा सुद्धा भारतातच जन्म घेतात.बाबा म्हणतात, मी भारतातच जन्म घेतो,तर जरुर तेथील लोकच प्रिय वाटतील.आठवण पण सर्व त्यांचीच करतात.जे ज्या धर्माचे आहेत,ते आपल्या धर्म स्थापका ची आठवण करतात. भारतवासीच स्वतःला विसरून गेलेले आहेत की,तेच आदी सनातन धर्माचे होते. बाबा समजावून सांगतात,भारतच सर्वात प्राचीन देश आहे. तर,म्हणतात कोण म्हणतं,फक्त भारतच होता. अनेक अनेक गोष्टी ऐकतात,कोण काय म्हणतात,कोण काय.काही म्हणतात,कोण म्हणतं की गिता शिव परमात्म्याने सांगितली आहे. कृष्ण पण परमात्मा होते, त्यांनी सांगितली आहे. परमात्मा सर्वत्र आहे,त्याचाच सारा खेळ आहे. ईश्वराचीच ही सर्व रूपे आहेत. ईश्वरच अनेक रूपे धारण करून हा खेळ करतात. ईश्वराला जे हवे ते तो करू शकतो. आता तुम्हा मुलांना माहित आहे कि माया किती प्रबळ आहे. आज म्हणतात बाबा आम्ही वारसा जरूर घेणार, मनुष्यापासून देवता जरूर बनणार. उद्या असणार नाहीत. तुम्हाला माहित आहे कितीतरी मुले बाबांचा हात सोडून गेली आहेत. त्यांनी घटस्फोट घेतला. मम्माला गाडीतून घेऊन जात होते,ते आज दिसत नाही. अशाप्रकारे खूप चांगली चांगली मुले मायेच्या संपर्कात आल्यानेच एकदम पतीत बनतात. कल्पापूर्वी ज्यांनी समजून घेतलेले होते,तेच आता पण समजतील. आज कालच्या दुनिये मध्ये काय चालले आहे, आणि तुम्ही मुले स्वतःला काय बनवत आहात.गीत ऐकलं ना.बाबांच्या कडून आम्ही अशाप्रकारे वारसाहक्क घेतो की सार्या विश्वाचे मालक बनतो. तिथे कोणत्याही गोष्टीला मर्यादा असणार नाही. इथे प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत.असे म्हणतात,आमच्या हवाई मार्गात तुमचे विमान आल्यास उडवून देऊ. तिथे तर कोणती मर्यादाच नाही. हे गीत गातात, पण अर्थ थोडाच समजतात. तुम्ही तर जाणतात की बाबा आम्हाला पुन्हा विश्वाचे मालक बनवत आहेत. अनेक वेळा ८४ चे चक्र लावलेले आहे. थोडावेळ दुःख सहन करावं लागतं .परंतू सुख मात्र भरपूर मिळतं. म्हणूनच बाबा म्हणतात. तुम्हा मुलांना भरपूर सुख देतो. आता मायेवर विजय मिळवा. सर्वच मुले बाबांची आहेत. सर्वच काही गुणवान असत नाहीत. एखाद्याला पाच-सात मुले असतील तर त्यातील एक-दोन दुर्गुण असणारे असतील तर डोकंच फिरवतात . लाखो करोडो रुपये उधळतात. पिता एकदम सज्जन धर्मात्मा,तर मुलं दिवाळखोर. बाबांनी अशी खूप उदाहरणे पाहिलेली आहेत.
तुम्ही मुले जाणता की, साऱ्या दुनियेतील मुले विश्वपित्याची मुले आहेत. बाबा म्हणतात माझे जन्म ठिकाण भारत आहे. प्रत्येकाला आपली जन्मभूमी आवडत असते. एखाद्याने बाहेर शरीर सोडल्यास त्याच्या जन्मगावी घेऊन येतात. बाबासुद्धा भारतामध्येच येतात. तुम्हा भारतीयांना पुन्हा अमर्याद वारसाहक्क देतात. तुम्ही मुले म्हणता, आम्ही पुन्हा मनुष्यापासून देवता, विश्वाचे मालक बनत आहोत. आम्ही मालक होतो. आता पहा काय हाल झालेले आहेत. ?कुठून कुठे येऊन पडलेले आहोता. ८४ जन्म घेत घेत हे हाल झालेले आहेत. हे नाटक तर समजून घ्यायचे आहे ना. यालाच तर म्हणतात विजय आणि पराजयाचा खेळ. भारताचाच हा खेळ आहे ज्यामध्ये तुमची भुमिका आहे. तुम्हा ब्राह्मण मुलांची सर्वात श्रेष्ठ ते श्रेष्ठ भुमिका आहे. तुम्हीच साऱ्या विश्वाचे मालक बनता,भरपूर सुख उपभोगता. तुमच्या इतके सुख दुसरे कोणाला मिळत नाही. नावच आहे स्वर्ग. हा आहे नरक. येथील सूख कावळ्याच्या विष्टे प्रमाणे आहे. आज लखपती आहेत तर दुसऱ्या जन्मात काय बनतील, हे थोडेच माहित आहे.? ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया. तुम्ही पुण्य आत्मा बनत आहात तर तुमच्या हातून कधीच पाप व्हायला नको.बाबांच्या बरोबर नेहमी सरळ वागायला हवे.बाबा म्हणतात द्वापारपासून माझ्याबरोबर धर्मराज असतोच असतो. सत्तयुग त्रेता पासून माझ्याबरोबर धर्मराज असत नाही. व्दापारपासून तुम्ही मुले माझ्यासाठी दान पुण्य करत आहात. ईश्वर अर्पण म्हणतात ना. गितेमध्ये श्रीकृष्णाचे नाव लिहिल्यामुळे,श्रीकृष्ण अर्पणमं म्हणतात.मोबदला देणारे तर एकच परमात्मा आहे,म्हणून श्रीकृष्ण अर्पणं असं म्हणणं चुकीचं आहे. ईश्वर अर्पण म्हणणे बरोबर आहे. श्री गणेशाय: अर्पणं असे म्हणून काहीही मिळणार नाही. तरीसुद्धा भावनेचे भाडे म्हणून काही ना काही देत आलेलो आहे. मला तर कोणी ओळखतच नाही. आता तुम्ही मुलेच मला सर्व काही अर्पण करत आहात. बाबा सुद्धा म्हणतात,मी आलो आहे, तुम्हाला २१ जन्माचा वारसाहक्क देण्यासाठी.आता आहे उतरती कला.रावण राज्यांमध्ये जे काही दान पुण्य करतात, ते पाप आत्म्यानाच देतात. कला कमी होत जातात. थोड्या काळासाठी थोडं काही मिळतही असेल.आता तर
तुम्हाला २१ जन्मासाठी मिळत आहे, त्यालाच रामराज्य म्हणतात. असे म्हणता येणार नाही की तिथे ईश्वराचे राज्य आहे. राज्य तर देवी-देवतांचे आहे. बाबा म्हणतात मी राज्य करत नाही.तुमचा जो आदी सनातन देवी देवता धर्म होता,तो आता लोप पावलेला आहे.त्याचीच आता पुन्हा स्थापन होत आहे.बाबा तर कल्याणकारी आहेतच. त्यांना म्हटलं जातं खरे बाबा. तुम्हाला रचता आणि रचनेच्या आदी मध्य आंताचे खरे ज्ञान देत आहेत. बाबा तुम्हाला इतिहास, भूगोलाचे ज्ञान ऐकवतात. किती मोठी प्राप्ती आहे. तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. त्यांनी हिंसेचे चक्र दिलेले आहे. खरंतर हे आहे ज्ञानाच चक्र. परंतु हे ज्ञान लोप पावते. तुमची ही मुख्य चित्रं आहेत. एका बाजूला त्रिमूर्ती, दुसऱ्या बाजूला झाड आणि सृष्टिचक्र. बाबा समजावून सांगतात, शास्त्रांमध्ये तर कल्पाचा कालावधी लाखो वर्षे लिहिलेला आहे.साराच गोंधळ आहे. बाबांच्या शिवाय हा गुंथा कोणी सोडवू शकत नाही. बाबा स्वतःच समोर आलेले आहेत. बाबा म्हणतात मला पुर्वनियोजीत नाटकानुसार यावंच लागतं. मी या नाटकामध्ये भुमिका करण्यासाठी बांधला गेलेलो आहे. असं होऊ शकत नाही की, मी येणारच नाही.असे पण नाही की मी येऊन मेलेल्याला जिवंत करतो किंवा एखाद्याला आजारातून सोडवतो. बरीच मुले म्हणतात, बाबा आमच्यावर कृपा करा. परंतु इथे कृपा आदिची गोष्ट नाही. तुम्ही मुलांनी मला यासाठी थोडंच बोलावलं आहे की,तुम्हाला तोटा सहन करावा लागणार नाही असा आशीर्वाद, कृपा करा. तुम्ही मला बोलवताच, हे सुखकर्ता दुखहर्ता, पतित पावन बाबा. शरीराचे दुःख हरण करणारे तर डॉक्टर लोक पण असतात. मी यासाठी थोडेच येतो.तुम्ही म्हणता आम्हाला नवीन दुनिया स्वर्गाचे मालक बनवा,शांती द्या. असे तर म्हणत नाही ना की येऊन आम्हाला या आजारातून मुक्त करा. कायमसाठी कोणालाच शांती वा मुक्ती मिळू शकत नाही. प्रत्येकाला आपली भुमिका करावीच लागते. जे नंतर येणारे असतात, त्यांना शांती किती मिळते. आजपर्यंत सुद्धा येत राहतात.आत्तापर्यंत शांतीधाम मधेच राहिले ना ! वैश्विक नाटका नुसार ज्यांची भुमिका आहे तेच येतील.भुमिका बदलू शकत नाही.बाबा समजावून सांगतात. शांतीधाम मध्ये तर खूप आत्मे राहतात,जे सर्वात शेवटी येतात.हे पुर्व नियोजीत नाटक आहे.अंत काळात येणार्यांना शेवटी च यावे लागेल. हे झाड पण बनविलेले आहे .ही सर्व चित्रे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. पुढेही नवीन चित्रे येत राहतील. कल्पा पूर्वीप्रमाणेच येतील. ८४ जन्माचा विस्तार झाडांमध्ये पण आहे.सृष्टी चक्राच्या चित्रांमध्ये पण आहे. त्यानंतर पुढे सीडी आलेली आहे.मनुष्याला तर काहीच कळत नाही. जणूकाही मंदबुद्धी आहेत. आता तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहे,परमपिता परमात्मा जो ज्ञानाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे. तो आम्हाला या शरीराद्वारे शिकवत आहे.बाबा म्हणतात की, मी त्याच्याच शरीरात येतो, जो पहिला पहिला विश्वाचा मालक होता. तुम्हाला देखील माहित आहे. बरोबर, आम्ही देखील ब्रम्हा द्वारा ब्राह्मण बनतो. गीते मध्ये तर या गोष्टी नाहीतच. बाबा म्हणतात हा तर नारायणाचा भक्त होता. रेल्वेतून प्रवास करत असताना गीतेचा अभ्यास करत होता. मनुष्याला वाटेल की हा तर मोठा धर्मात्मा आहे. आता या सर्व गोष्टी विसरलेला आहे. तरीदेखील याने गीता वाचलेली आहे ना. बाबा म्हणतात मला या सर्व गोष्टी माहित आहेत. आता तुम्ही विचार करा की, आम्ही कोणाच्या समोर बसलेलो आहोत.जो तुम्हाला विश्वाचा मालक बनवितो, त्यांना क्षणाक्षणाला कसे काय विसरता ? बाबा म्हणतात तुम्हाला 16 तास फ्री दिले. बाकी आठ तास स्व सेवा करा. स्वतःची सेवा करता म्हणजे विश्वाची सेवा करता. इतका पुरुषार्थ करा जो कमीत कमी आठ तास बाबाच्या आठवणीमध्ये राहाल.आत्ता संपूर्ण दिवसात आठ तास बाबांची याद नाही करू शकणार.? अवस्था जेव्हा अशा प्रकारे असेल तेव्हाच समजावे हे खूप सेवा करतात. मी खूप सेवा करतो, असे स्वतःला कधीच समजू नका. भाषण खूप सुंदर करता पण योग बिलकुल नाही. बाबांची आठवण टिकून राहणे हीच खरी मुख्य गोष्ट आहे
बाबा म्हणतात तुमच्या डोक्यावर विकर्माचे ओझं खूप आहे. यासाठी पहाटे उठून बाबांची आठवण करा. दोन ते पाच या कालावधीमध्ये वातावरण खूप सुंदर असते. आत्मा रात्रीच्या वेळी आत्माभिमानी बनते. त्यालाच झोप असं म्हटलं जातं. यासाठी बाबा म्हणतात जितके शक्य आहे तितकी बाबांची आठवण करा. बाबा म्हणतात मन बुद्धी द्वारे माझी आठवण करा." मनमनाभव " हाच आहे. प्रगतीचा मंत्र. अच्छा .
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या गोड-गोड मुलांनो,मात पिता,बापदादांची स्नेहा पुर्वक
आठवण व सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) बाबासी सरळ व प्रामाणिकपणे राहायचं आहे. आपण कल्याणकारी बाबांची मुले असल्याने गुणवान बनून सर्वांचे कल्याण करायचे आहे.
- २) काम करत असताना देखील कमीत कमी आठ तास बाबांच्या आठवणी मध्ये जरूर राहायचे आहे. मुख्य आहे "आठवण" या द्वारेच विकर्म विनाश होणार आहेत.