31-05-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.01.86  ओम शान्ति   मधुबन


मनशक्ती तसेच निर्भयतेची शक्ती


आज वृक्ष पती आपल्या नवीन वृक्षाच्या फाऊंडेशनला पाहत आहेत.वृक्ष पती आपल्या वृक्षांच्या मुळ्यांना पाहत आहेत. सर्व वृक्ष पतीच्या पालनेत पालन झालेले श्रेष्ठ फलस्वरूप मुलांना पाहत आहेत.आदीदेव आपल्या आदी रत्नांना पाहत आहेत.प्रत्येक रत्नाची महानता विशेषता ज्याची त्याची असते परंतु सर्व नवीन रचनेच्या रचनेसाठी निमित्त बनलेले आहेत,कारण बाबांना ओळखण्यात बाबांच्या कार्यात सहयोगी बनवण्यात निमित्त बनलेले आणि अनेकांसमोर आदर्श बनले आहेत. दुनियेला न पाहता नवीन दुनिया बनवणाऱ्याला पाहणारे आहेत,अटळ आहेत आणि हिम्मत याचे प्रमाण दुनिया समोर ठेवलेले आहे म्हणून सर्व विशेष आत्मे आहात.विशेष आत्म्यांना विशेष रूपात संघटित झालेले पाहून बाप दादा हर्षित होत आहेत आणि अशा मुलांची महिमा गात आहेत.बाबांना ओळखलत आणि बाबांनी जो जसा असेल तसा पसंद केला कारण दिलाराम बाबांना चांगल्या मनाची मुलं आवडतात.विश्वाची बुद्धी नसेलही परंतु बाबांना बाबांच्या विश्वाची बुद्धी असणारे खऱ्या मनाची मुलं आवडतात.बाबा बुद्धी इतकी देतात की त्याद्वारे विश्वाच्या आदी मध्य आणि अंताचे ज्ञान मिळवतात.त्यामुळे बाबा मनापासून मुलांना पसंत करतात,खऱ्या स्वच्छ मनाच्या आधारे क्रमानुसार बनतात. सेवेच्या आधारे नाही.सेवेतही मनापासून सेवा केल्यास किंवा बुद्धीच्या आधारे सेवा केली तर मनाचा आवाज मनापर्यंत व बुद्धीचा आवाज बुद्धी पर्यंत पोहोचतो.

आज बाप दादा बाबांवर प्रेम करणाऱ्या मुलांची यादी पाहत होते. बुद्धिवादी नाव मिळवतात तर प्रेम करणारे आर्शिवाद मिळवतात.तर दोन माळा बनत आहेत कारण आज वतन मध्ये यापुर्वी गेलेले आत्मे उपस्थित होते. हे विशेष आत्मे आत्मसंवाद करत होते.मुख्य आत्मसंवाद काय असेल?आपणही विशेष आत्म्यांना अनुभवलेलं असेल? वतन मध्ये देखील आत्मसंवाद होत होता की वेळ आणि संपूर्णता दोन्हींमध्ये किती अंतर बाकी आहे? किती जण तयार आहेत की तयार होत आहेत? नंबरवार सर्व रंगमंचावर येत आहेत. एडव्हान्स पार्टी विचारत आहे की आम्ही आमचे कार्य करत आहोत परंतु आमचे सोबती आमच्या कार्यात काय योगदान देत आहेत? ते देखील माळ बनवत आहेत. कोणती माळ बनवत आहेत? कुणा कुणाचा नवीन दुनियेच्या वेळी जन्म होणार आहे हे निश्चित होणार आहे त्यांनाही त्यांच्या कार्यात सूक्ष्म शक्तीचा विशेष सहयोग हवा आहे .जे स्थापनेच्या निमित्त आत्मेआहेत ते पावन आहेत परंतु वायुमंडळ व प्रकृती तमोप्रधान आहे.आता अती तमोगुणी मध्ये अल्प सत्वगुणी कमलपुष्प समान आहेत त्यामुळेच आज आत्मिक संवादात सर्व श्रेष्ठ आत्मे हसून बोलत होते की,आपल्या या साथीदारांना आपल्या सेवेची स्मृती आहे की सेंटर किंवा झोन मध्येच दंग झालेले आहेत?

इतके सर्व प्रकृती परिवर्तनाचे कार्य,इतक्या तमोगुणी आत्म्यांचा विनाश अनेक विधीद्वारे होईल परंतु अचानक मृत्यु,अकाली मृत्यू,समूह मृत्यू तर त्या आत्म्यांचा प्रभाव किती तमोगुणी असेल,त्यांचे परिवर्तन करणे आणि स्वतःलाही अशा रक्त रंजीत प्रभावात सुरक्षित ठेवणे आणि त्या आत्म्यांना सहयोग देणे, या विशाल कार्याची तयारी करत आहात का? की फक्त कुणी आला, समजवल,भोजन केले, यामध्येच वेळ तर जात नाही ना? हे विचारत होते .आज बाप दादा त्यांचा संदेश ऐकवत आहेत.इतक्या मोठ्या कार्यासाठी कोण निमित्त आहेत? जेव्हा सुरुवातीला निमित्त झाले, तसे अंतिम वेळेत या कार्यासाठी निमित्त बनायचे आहे. जसे म्हणतात शेवटी केले त्याने सर्व केले. गर्भ महल देखील करावयाचे आहेत.तरच नवी रचना व योग बलाचा आरंभ होईल. योग बलासाठी मनन शक्तीची आवश्यकता आहे. आपल्या सुरक्षेसाठी देखील मननशक्ती साधन बनेल. मननशक्ती द्वारेच स्वतःचा अंत सुखद बनवता येईल.नाहीतर साकार सहयोग परिस्थितीनुसार प्राप्त होणार नाही.त्यावेळी श्रेष्ठ संकल्पशक्ती, एक बाबा बरोबर लाईन स्पष्ट नसल्यास आपल्या कमजोरी पश्चातापाच्या रुपात भूतां प्रमाणे अनुभवयास मिळतील कारण कमजोरी स्मृतीमध्ये आल्यास भय भुतां प्रमाणे अनुभव होईल.आता कसेही चालवून घेतात परंतु अंत वेळेत भय अनुभव होईल त्यामुळे आत्ताच सेवेसाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी मनसा शक्ती व निर्भयतेची शक्ती जमा करा. तरच अंत सुखद आणि या बेहदच्या कार्यात सहयोगी बनून विश्वाचे राज्य अधिकारी बनाल. आता आपले जोडीदार आपल्या या सहयोगाची वाट पाहत आहेत.जरी कार्य वेगवेगळे आहेत परंतु परिवर्तनासाठी निमित्त आहात. ते त्यांचा परिणाम ऐकवत होते. एडव्हान्स पार्टी वाले स्वतः श्रेष्ठ आत्म्यांना आवाहन करण्यासाठी तयार आहेत.तर काही तयारी करत आहेत. त्यांच्या कडे सेवेचे साधन आहे मित्रता आणि समीपतेचे संबंध. ज्यांच्यामध्ये प्रत्यक्ष रुपात ज्ञानाची चर्चा होत नाही परंतु ज्ञानी आत्म्याचे संस्कार असल्यामुळे एकमेकांचे श्रेष्ठ संस्कार,श्रेष्ठ प्रकंपन, पवित्रता, आनंद ,आनंदी चेहरा एकमेकांना प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे. जरी वेगवेगळ्या परिवारातील असतील परंतु कोणते ना कोणते संबंध,मित्रता या आधारावर एकमेकांच्या संपर्कात येऊन आत्मा ज्ञान युक्त असल्याने अनुभूती होते की हे सर्व आपल्या जवळचे आहेत. या आपले पणाच्या आधारावरच एकमेकांना ओळखतात.आता विनाश जवळ आल्याने एडव्हान्स पार्टी चे कार्य अधिक वेगाने होत आहे. असा संवाद वतन मध्ये होत होता.जगदंबा सर्व मुलां प्रती दोन मधुर बोल बोलत होत्या त्यातून ही स्मृति झाली की सफलतेचा आधार सदैव सहनशक्ती आणि सामावून घेण्याची शक्ती आहे आहे .या विषेशता द्वारे सफलता सहज आणि श्रेष्ठ अनुभवण्यास येईल. दुसर्यांचेहि ऐकवू का ? आज संवादाचा दिवस असल्याने प्रत्येक जण स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करत आहे . अच्छा, कोणाचे आहे ? काल (विश्व किशोर भाऊ )यांचे .तसेही ते खूप कमी बोलतात परंतु जे बोलतात हे शक्तिशाली असते.त्यांच्या मते सफलते साठी 'अटळ निश्चय आणि ज्ञानाचा नशा' असला पाहिजे. इच्छा असेल तर अनुभव स्वतः येतो आणि नशा सफलता मिळवून देते. जसे ब्रम्हा बाबा सत्ययुगातील विश्व महाराज असतील. तसे विश्व किशोर दादांना मी पहिल्या विश्व महाराजाचा मुलगा असेल हा नशा आहे.हा नशा वर्तमान आणि भविष्यात अटळ असेल.

अच्छा, दीदी म्हणतात ,सर्वांना विना सूचना का बोलवलं ? अगोदर सांगितलं असतं तर सुट्टी घेऊन आलो असतो .बाप दादा सर्व मुलांना सांगतात देह आणि देहाचे संबंधी , देहाचे संस्कार हे लौकीक नसून अलौकिक आहेत. अलौकिक संबंधाने देह, संस्कार यापासून

नष्टमोहा बनण्याची विधी नोंदलेली आहे.ज्याची पुर्नाव्रत्ती होत राहते. आपल्या मेहनती द्वारे , तर काही बाबा आणि ड्रामा यामुळे कर्म बंधन मुक्त होण्यासाठी मदत मिळवत असतात .जी मुलं बाबांची खूप जुनी आहेत त्यांना बाबा विशेष सहयोग देतात.ज्यामुळे ते या मुख्य विषयात पास होत आहेत .अशी कर्मातीत अवस्थेला पोहोचलेली मुलं विशेष सहयोग देत असल्यामुळे अंतिम वेळेत आपल्याला पास विथ ओनर करण्यासाठी मदत करतात. ते गुप्त असल्याने अनेक प्रश्न निर्माण केले जातात परंतु हे त्यांच्याच सहयोगाचे मुख्य फळ आहे. जशी एक म्हण आहे की, 'गरजेच्या वेळी कामास येतो' जे मनापासून सहयोगी असतील त्यांना अंतिम वेळेत जास्त गुण प्राप्त होतील. समजलं का या रहस्याला? त्यामुळे नष्टोमोहाच्या विधीने अवांतर गुणांचे बक्षीस प्राप्त केले पाहिजे. बाप दादा आज आत्मिक संवाद ऐकवत आहेत. दीदी सांगत होत्या, सदैव बापदादांचे बोट पकडा किंवा बोट द्या. वाटल्यास मुलं बणुन बोट पकडा किंवा बाप बणवनू बोट द्या,या दोन्ही रूपांनी अनुभव केल्यास सफलता मिळेल.

एडव्हान्स पार्टी त्यांचे काम करत आहे .आपण एडव्हान्स शक्ती भरली पाहिजे. ज्यामध्ये परिवर्तनाचे कार्य समाप्त होईल. फाउंडेशनवाले बेहदचे सेवाधारी बनुन बेहद पित्याला प्रत्यक्ष करतील.प्रत्यक्ष तेचा नगाडा लवकरच या धरेवर वाजताना ऐकाल. चारही दिशेने एकच नगाडा वाजेल .बाबा मिळाले !बाबा आले ! अजून तर खूप काम पडलेले आहे .आता तर फक्त वाणी द्वारे बदलण्याचे कार्य चाललेले आहे .अजून वृत्ती द्वारे वृत्ती बदलण्याचा आणि संकल्प़ाद्वारे संकल्प बदलण्याचा कार्यक्रम सुरू झालेला नाही. या सूक्ष्म सेवा स्वतःलाच अनेक कमजोरीना पार करतील. ज्यांना वाटते हे कसे होईल? ते जेव्हा या सेवेमध्ये व्यस्त होतील तेव्हा स्वतः वायुमंडळ असे बनेल की ज्यामुळे स्वतःच्या कमजोरी स्पष्ट अनुभव करतील आणि वायु मंडळाच्या कारणांनी स्वतःलाच लज्जित होऊन परिवर्तित होतील, सांगण्याची गरज नाही . तेव्हा आता असे नियोजन करा.जिज्ञासू खूप वाढतील, मदोगरी देखील वाढेल, घरं मिळतील याची चिंता करू नका,सर्व सिद्ध होईल आणि सिद्धी स्वरूप बनाल. शक्ती स्वरूपा खूप आहात. सुरुवातीला शक्तीच निमित्त बनल्या.सुर्वण जयंती मध्ये देखील शक्तिच अधिक होत्या. पांडव कमी आहेत. हिमतीने सहन करणारे आदी रत्न आहेत. विघ्नविनाशक बणुन निमित्त बनणारी आणि निमित्त बनवणारे अमर राहतात म्हणून बाप दादा यांना देखील अविनाशी आणि अमर भव, वरदानी मुलेच सदा प्रिय असतात. त्यामुळेच बापदादा अशा मुलांना त्यांचे प्रतिफळ निश्चितच देत असतात त्यामुळे ते या अविनाश नाटकात अवांतर बक्षिसाचे अधिकारी आहेत. मातांनी थेंबाथेंबाने हे स्थापनेचे कार्य सुरू करून आज यशाच्या खूपच जवळ पोहोचले आहेत. मातांची ही हृदयाची कमाई आहे, व्यवसायाची नाही . हृदयाची कमाई एक हजारांच्या बरोबरीने आहे. त्यांनी स्नेहाचे बीज टाकलेले आहे.त्यामुळेच आज त्याचे फळ मिळत आहे .पांडव देखील बरोबर आहेत परंतु त्यांची संख्या कमी आहे म्हणून पांडव पाच दाखवलेले आहेत. पांडवांनी प्रवृत्तीला निभावताना न्यारा आणि बाबांचा प्यारा बनून हिम्मत आणि उत्साह दाखविल्यामुळे पांडव देखील कमी नाहीत. म्हणून शक्तींना सर्वशक्तिमान तर पांडवांना पांडवपती म्हटलेले आहे. म्हणून जसे निमित्त बनलेले आहात तसे निमित्त भाव सदा लक्षात ठेवून पुढे चालत रहा. अच्छा!

सदा पद्मापदम भाग्याचे अधिकारी ,सदा सफलतेचे अधिकारी, सदा स्वतःला श्रेष्ठ आधार मूर्त समजून सर्वांचा उद्धार करणारे,श्रेष्ठ मुलांना बाप दादांचा याद प्यार आणि नमस्ते.

वरदान:-
अनुभवांच्या गुह्यतेच्या प्रयोगशाळेत राहून नवीन संशोधन करणारे अंतर्मुखी भव.

जेव्हा स्वतः मध्ये प्रथम सर्व अनुभव प्रत्यक्ष होतील तेव्हा प्रत्यक्षता होईल. त्यासाठी अंतर्मुखी बनून आठवणींची यात्रा व प्रत्येक प्राप्तीच्या रहस्या मध्ये जाऊन संशोधन करा.संकल्प धारण करा आणि आणि मग त्याचा परिणाम किंवा सिद्धी पहा की जो संकल्प केला तो फलश्रुत झाला की नाही? अशा अनुभवांच्या रहस्या च्या प्रयोगशाळेत राहून अनुभव करा की हे सर्व या संसाराहुन भिन्न आहे. कर्म करताना योगाची पावरफूल स्थिती मध्ये राहण्याचा अभ्यास वाढवा. जसे वाणी मध्ये येण्याचा अभ्यास आहे तसे आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास वाढवा.

सुविचार:-
संतुष्टतेच्या खुर्चीवर बसून परिस्थितीचा खेळ पाहणारेच संतुष्ट मनी आहेत.