25-07-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो ,देहअभिमान सोडून, देहीअभिमानी बना,देहीअभिमानीलाच ईश्वरीय संप्रदाय,
म्हटले जाते"
प्रश्न:-
तुम्ही मुले
आता जो सत्संग करत आहात,तो दुसऱ्या सत्संगा पासून वेगळा कसा आहे?
उत्तर:-
हा एकच सत्संग आहे, ज्यामध्ये तुम्ही आत्मे, परमात्म्याचे ज्ञान ऐकत आहात.येथे
अभ्यास केला जातो. मुख्य लक्ष्य पण समोर आहे. दुसऱ्या सत्संगा मध्ये तर न शिक्षण
असते, ना कोणते मुख्य लक्ष्य असते.
ओम शांती।
आत्मिक मुलांसाठी आत्मिक पिता समजावत आहेत. आत्मिक मुले ऐकत आहेत. पहिल्या प्रथम
बाबा सांगत आहेत की, जेव्हा पण इथे बसाल,तर स्वतःला आत्मा समजून बसा.देह समजू नका.
देहअभिमानीला असूरी संप्रदाय म्हटले जाते.देहीअभिमानी ना, ईश्वरी संप्रदाय म्हटले
जाते. ईश्वराला देह नाही . ते नेहमी आत्माभिमानी आहेत. ते आहेत सर्वोच्च आत्मा,
सर्व आत्म्याचे पिता.परमात्मा म्हणजे उंच ते उंच. मनुष्य जेव्हा,उंच ते उंच, भगवान
म्हणतात, त्यावेळी बुद्धीमध्ये येते की, ते निराकार लिंग रूप आहेत. निराकार लिंगाची
पूजा पण होते. ते आहेत परमात्मा म्हणजे सर्व आत्म्यापासून उंच आहेत. ते पण आत्माच
आहेत, परंतु उंच आत्मा आहेत. ते जन्म,मरण मध्ये येत नाहीत. बाकी सर्व पुनर्जन्मा
घेत आहेत,आणि सर्व रचना आहेत. रचता तर एकच शिवबाबा आहेत.ब्रह्मा, विष्णू ,शंकर पण
रचना आहेत. मनुष्य सृष्टी पण सारी रचना आहे . रचनाकार बाबांना म्हटले जाते. पुरुषाला
पण रचनाकार म्हटले जाते . स्त्री ला दत्तक घेतात मग तिच्याद्वारे रचना रचतात,पालना
करतात,फक्त विनाश करत नाहीत .इतर जे पण धर्मसंस्थापक आहेत,ते पण रचना निर्माण करतात,
मग त्यांची पालना करतात. विनाश कोणीही करत नाहीत.बेहद्दचे बाबा ज्यांना परमात्मा
म्हटले जाते.जसे तुम्हा आत्म्याचे स्वरूप बिंदू आहे,तसे परमपिता परमात्म्याचे रूप
पण बिंदू आहे. बाकी एवढे मोठे लिंग जे बनवत आहेत, ते सर्व भक्ती मार्गा मध्ये पूजा
करण्यासाठी. बिंदूची पूजा कशी करणार ? भारतामध्ये रुद्र यज्ञ रचतात, तर मातीचे
शिवलिंग आणि शालिग्राम बनवून,मग त्याची पूजा करतात. त्याला रुद्र यज्ञ म्हटले जाते,
खरेतर मूळ नाव आहे अश्वमेघ अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ. जे शास्त्रांमध्ये पण
लिहिले आहे. आता बाबा तुम्हा मुलाला म्हणतात की, स्वतःला आत्मा समजा. इतर जे पण
सत्संग आहेत,त्यामध्ये आत्मा व परमात्म्याचे ज्ञान तर कोणा मध्ये नाही, आणि कोणी
देऊ शकत नाही. तेथे तर कोणते मुख्य लक्ष्य पण नसते. तुम्ही मुले तर आता शिक्षण घेत
आहात. तुम्ही जाणता की, आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते. आत्मा अविनाशी आहे, शरीर तर
विनाशी आहे. शरीरा व्दारे भूमिका बजावत आहे. आत्मा तर अशरीरी आहे ना. म्हणतात पण
की, नंगे आलो आहे, नंगे जायचे आहे . शरीर धारण केले मग शरीर सोडून नंगे जायचे आहे.
हे बाबा तुम्हा मुलांना सन्मुख समजावत आहेत. हे पण मुले जाणतात की, भारतामध्ये
सतयुग होते, तर देवी-देवतांचे राज्य होते, एकच धर्म होता. हे पण भारतवासी जाणत
नाहीत. बाबाला ज्यांनी ओळखले नाही, त्यांनी कांही पण ओळखले नाही. प्राचीन ऋषी-मुनी
पण म्हणतात की, आम्ही रचनाकार आणि रचनेला ओळखत नाही. बाबा आहेत रचनाकार, तेच
रचनेच्या आदि, मध्य,आणि अंता ला जाणत आहेत. आदि म्हटले जाते सुरुवातीला, मध्य,
मध्याला म्हटले जाते. आदि आहे सतयुग,त्याला दिवस म्हटले जाते, नंतर मध्य पासून अंता
पर्यत रात्र आहे. दिवस सतयुग,त्रेता आहे. स्वर्ग आहे आश्चर्यकारक जग. भारत स्वर्ग
होता,त्यामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, हे भारतवासी ओळखत नाहीत. बाबा आता
स्वर्गाची स्थापना करत आहेत. बाबा म्हणतात की, तुम्ही स्वतःला आत्मा समजा.आम्ही अति
उत्तम आत्मा आहोत. या वेळेत मनुष्यमात्र सर्व देह-अभिमानी आहेत. बाबा आत्म-अभिमानी
बनवत आहेत. आत्मा काय वस्तू आहे, हे पण बाबा सांगत आहेत. मनुष्य कांही पण समजत
नाहीत. जरी म्हणतात पण की, भृकुटी च्या मध्ये चमकत आहे एक अजब सितारा, परंतु कशी
त्यामध्ये भूमिका भरलेले आहे,ते काहीच ओळखत नाहीत. आता तुम्हाला बाबांनी समजावले
आहे.तुम्हा भारतवासीयांना ८४ जन्माची भूमिका वठवावयाची आहे. भारतच ऊंच खंड आहे,जे
पण मनुष्यमात्र आहेत, त्यांचे ते तीर्थ आहे.सर्वांची सद्गती करणारे बाबा इथे आले
आहेत. रावण राज्यापासून मुक्त करून , मार्गदर्शक बनवून घेऊन जात आहेत. मनुष्य तर
असेच म्हणतात, अर्थ तर कांही पण ओळखत नाहीत.भारता मध्ये प्रथम देवी-देवता होते.
त्यांनाच मग पुनर्जन्म घ्यावे लागतात. भारतवासी जे देवी-देवता होते,परत
क्षत्रिय,वैश्य,क्षुद्र बनतात. पुर्नजन्म घेतात ना. या ज्ञानाला पूर्ण रीतीने
समजण्यासाठी सात दिवस लागतात. पतीत बुद्धीला पावन बनायचे आहे. हे लक्ष्मी नारायण
पावन दुनिया मध्ये राज्य करत होते. त्यांचे राज्य भारतामध्ये होते,दुसरा कोणता धर्म
नव्हता. एकच राज्य होते. भारत किती धनवान होता.हिरे-जवाहरातांचे महल होते,परत रावण
राज्यां मध्ये पुजारी बनले आहात. नंतर भक्ती मार्गा मध्ये हे मंदिर इत्यादी बनवतात.
सोमनाथ चे मंदिर होते ना. एक मंदिर तर नसेल ना. इथे पण शिवाच्या मंदिरां मध्ये एवढे
हिरे जवाहर होते,जो मुहंमद गझनी ऊंट भर-भरून घेऊन गेला. एवढा माल होता, ऊंट तर काय
लाखो ऊंट घेऊन आले, तरी भरून घेऊन जावू शकणार नाहीत. सतयुगा मध्ये सोने हिरे
जवाहराताचे अनेक महल होते. मुहंमद गझनी तर आता आले. व्दापर मध्ये पण किती महल
इत्यादी होते.ते मग भूकंपा मध्ये जमिनी मध्ये गेले. रावणा ची काय सोन्याची लंका
नव्हती. रावण राज्यां मध्ये तर भारताचे हे हाल झाले आहेत. 100% अधार्मिक,
असत्य,कंगाल, पतित, विकारी बनले आहेत.नवीन दुनियेला म्हटले जाते निर्विकारी. भारत
शिवालय होता.ज्याला जगातील एक आश्चर्य म्हटले जाते. फार थोडे मनुष्य तेथे होते. आता
तर करोडो मनुष्य आहेत. विचार केला पाहिजे ना.आता तुम्हा मुलासाठी हे पुरुषोत्तम
संगमयुग आहे.जेव्हा बाबा तुम्हाला पुरुषोत्तम, पारस बुद्धी बनवत आहेत. बाबा मनुष्या
पासून देवता बनविण्यासाठी तुम्हाला सद्बुद्धी देत आहेत. बाबाच्या मतासाठी गायले जाते
की, तुमची गत मत न्यारी. . . याचा पण अर्थ कोणी समजत नाही. बाबा समजावतात की, मी अशी
श्रेष्ठ मत देतो कि, ज्यामुळे तुम्ही देवता बनता.आता कलियुग संपत आले आहे.जुन्या
दुनियेचा विनाश समोर उभा आहे. मनुष्य फारच घोर आंधारांत कुंभकर्णाच्या निंद्रे मध्ये
झोपले आहेत, कारण शास्त्रांमध्ये लिहिले आहे,कलियुग तर आता लहान आहे,आणखीन ४० हजार
वर्षे पडली आहेत. ८४ लाख योनी समजल्या मुळे कल्पाचे आयुष्य लांबलचक केले आहे. खरेतर
५००० वर्ष आहे. बाबा समजावतात की, तुम्ही ८४जन्म घेता, ना की ८४ लाख. बेहद्द चे बाबा,
या शास्त्र इत्यादी ला जाणातात, त्यामुळे म्हणतात की, हे सर्व आहे,भक्तिमार्गाचे,
जे अर्धाकल्प चालत आहे. याद्वारे कोणी मला भेटत नाही. ही पण विचार करण्याची गोष्ट
आहे की, जर कल्पा चे आयुष्य लाखो वर्षे आहे, तर लोकसंख्या खूप झाली पाहिजे. जेंव्हा
खिश्चनां ची संख्या २ हजार वर्षांमध्ये एवढी झाली आहे. भारताचा मूळ धर्म देवी देवता
आहे,तो चालत आला पाहिजे,परंतु आदि सनातन देवी देवता धर्माला विसरून गेल्यामुळे
म्हणतात,आमचा हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म तर आसतच नाही. भारत किती उंच होता. आदि
सनातन देवी देवता धर्म होता, तर विष्णुपुरी होती. आता ही रावणपुरी आहे.तेच
देवी-देवता ८४ जन्मा नंतर काय बनले आहेत. देवतांना निर्विकारी समजतात आणि स्वतःला
विकारी समजून त्यांची पूजा करतात. सत्ययुगा मध्ये भारत निर्विकार होता, नवीन दुनिया
होती. ज्याला नवा भारत म्हटले जाते. हा जुना भारत आहे .नवीन भारत काय होता,जुना
भारत काय आहे,नवीन दुनिये मध्ये भारत नवा होता,आता जुन्या दुनियेमध्ये भारत पण जुना
आहे.काय गती झाली आहे.भारत च स्वर्ग होता, आता नर्क झाला आहे. भारत अति धनवान होता,
भारतच अती कंगाल झाला आहे् सर्वांकडूना भीक मागत आहे. प्रजे कडून सुद्धा भीक मागत
आहे.या तर समाजण्याच्या गोष्टी आहेत.आजच्या देहाभीमानी मनुष्यांना थोडा पैसा मिळाला,
तर समजतात की, आम्ही स्वर्गा मध्ये बसलो आहोत. सुखधाम,स्वर्गाला तर बिल्कुल ओळखतच
नाहीत, कारण पत्थर बुद्धी आहेत.आता त्यांना पारस बुद्धी बनवण्यासाठी ७ दिवसाच्या
भट्टी मध्ये ठेवले पाहिजे, कारण पतित आहेत ना.पतितांना तर इथे बसवले जात नाही. इथे
पावनच राहतात. पतितांना परवानगी दिली जात नाही.
तुम्ही आता, पुरुषोत्तम संगमयुगावर बसले आहात.तुम्ही जाणत आहात की,बाबा आम्हाला असे
पुरुषोत्तम बनवत आहेत. ही खरी सत्य नारायणाची गोष्ट आहे. सत्य बाबा, तुम्हाला
नरापासून नारायण बनवण्यासाठी,राजयोग शिकवीत आहेत,ज्ञान फक्त एका बाबा जवळ आहे.
ज्यांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते. शांतीचा सागर, पवित्रतेचा सागर, ही त्या एकाची
महिमा आहे. दुसऱ्या कोणाचीही महिमा होऊ शकत नाही. देवतांची महिमा वेगळी आहे. परमपिता
परमात्मा शिवाची महिमा वेगळी आहे.ते आहेत पिता. कृष्णाला पिता म्हणू शकत नाहीत.आता
भगवान कोण आहेत? आता तर भारतवासी मनुष्यांना माहित नाही. कृष्ण भगवानुवाच म्हणतात.
ते तर पूर्ण ८४ जन्म घेतात. सूर्यवंशी पासून चंद्रवंशी, तेच वैश्यवंशी . . . मनुष्य
हम सो चा अर्थ पण समजत नाहीत.आम्ही आत्माच परमात्मा आहोत, असे म्हणतात.किती चूक
आहे.आता तुम्ही समजता की भारताची चढती कला, आणि उतरती कला कशी होत आहे. हे आहे
ज्ञान,ती सर्व भक्ती आहे. सतयुगा मध्ये सर्व पावन होते, राजा राणी चे राज्य चालत
होते. तेथे वजीर पण नसतात,कारण राजा राणी स्वतः मालक आहेत. बाबा कडून वारसा मिळाला
आहे, त्यामध्ये अक्कल आहे. लक्ष्मी नारायणा ला कोणाकडून मदत घेण्याची गरज पडत नाही.
तेथे वजीर नसतात.भारता सारखा पवित्र देश कोणता नसतो.महान पवित्र देश होता. नावच होते
स्वर्ग.आता आहे नरक. नरकाला परत स्वर्ग बनवत आहेत. अच्छा.
गोड गोड, फार वर्षांनी , भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता, बापदादाची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) एका
बाबाच्या श्रीमता वर चालून, मनुष्या पासून देवता बनायचे आहे.या श्रेष्ठ संगमयुगा वर,
स्वतःला पुरुषोत्तम,पारस बुद्धी बनवायचे आहे.
(२) ७ दिवसाच्या भट्टीमध्ये बसून, पतित बुद्धीला पावन बनवायचे आहे. सत्य बाबा कडून
सत्य नारायणाची खरी कथा ऐकून नरापासून नारायण बनायचे आहे
वरदान:-
फरिश्ते
पणाच्या स्थिती द्वारे,बाबाच्या स्नेहाचा परतावा देणारे, समाधान स्वरुप भव:
फरिश्ते पणाच्या
स्थितीमध्ये स्थित होणे- हेच बाबाच्या, स्नेहाचा परतावा देणेआहे. असा परतावा देणारे,
समाधान स्वरूप बनतात. समाधान स्वरुप बनल्याने,स्वतःची वा इतर आत्म्याच्या समस्या
स्वतः समाप्त होऊन जातात. तर आता अशी सेवा करण्याची वेळ आहे. घेण्याबरोबर देण्याची
वेळ आहे. त्यामुळे आता बाबा सारखे उपकारी बनवून, पुकार ऐकून, स्वतःच्या फरिश्ता रूपा
द्वारे त्या आत्म्यां जवळ जावा आणि समस्ये द्वारे थकलेल्या, आत्म्यांचा थकवा नाहीसा
करा.
बोधवाक्य:-
व्यर्थ पासून
बेपरवाह बना,मर्यादे मध्ये नाही.