29-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, अविनाशी ज्ञान रत्न धारण करून आता तुम्हाला फकीरा पासून श्रीमंत बनायचे
आहे, तुम्ही आत्मे रूप बसंत आहात"
प्रश्न:-
कोणती शुभ
भावना ठेवून पुरुषार्था मध्ये सदैव तत्पर राहायचे आहे?
उत्तर:-
सदैव हीच शुभ भावना ठेवायची आहे की,मी आत्मा सतोप्रधान होते,आम्हीच बाबांकडून
शक्तीचा वारसा घेतला होता आता पुन्हा घेत आहोत. याच शुभ भावनेने पुरुषार्थ करून
सतोप्रधान बनायचे आहे.असा विचार करू नका की सर्वजण सतोप्रधान थोडीच बनणार
आहेत.नाही,आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे,सेवा करून ताकत
घ्यायची आहे.
गीत:-
या पापाच्या
दुनियेतून दूर घेऊन चल,जिथे सुख चैन असेल....
ओम शांती।
हे शिक्षण आहे.प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे,इतर जे सत्संग इ.आहेत,ते सर्व
भक्तीचे आहेत.भक्ती करता-करता गरिब बनले आहेत.ते गरीब फकीर वेगळे आहेत,तुम्हीं
वेगळ्या प्रकारचे गरीब आहात.तुम्हीं अमीर होता आता फकीर बनले आहात.हे कोणालाही
माहीत नाही की आम्हीं अमीर होतो,तुम्ही ब्राह्मण जाणत आहात- आम्ही विश्वाचे मालक
अमीर होतो.अमीरचंद पासून फकीरचंद बनलो आहोत.आता हे आहे शिक्षण,जे चांगल्या प्रकारे
शिकायचे आहे,धारण करायचे आहे आणि धारण करवण्याचा प्रयत्न करायचा आहे.अविनाशी ज्ञान
रत्न धारण करायचे आहेत. आत्मा रूप बसंत आहे ना. आत्माच धारण करते,शरीर तर विनाशी
आहे.जी वस्तू कामाची नाही,ती जाळून टाकली जाते. शरीरही कामाचे राहत नाही तेंव्हा
त्याला अग्नी मध्ये जाळुन टाकतात.आत्म्याला जाळू शकत नाही.आम्ही आत्मा आहोत, जेंव्हा
पासून रावण राज्य सुरू झाले आहे तेंव्हापासून मनुष्य देह-अभिमाना मध्ये आला आहे. मी
शरीर आहे,हेच पक्के झाले आहे.आत्मा तर अमर आहे. अमरनाथ बाबा येऊन आत्म्यांना अमर
बनवतात.तिथे तर आपल्या वेळेवर आपल्या मर्जीने एक शरीर सोडून दुसरे घेतात कारण की
आत्मा मालक आहे.जेव्हां पाहिजे तेव्हां शरीर सोडते.तिथे शरीराचे आयुष्य मोठे असते.
सर्पाचे उदाहरण आहे.आता तुम्हीं जाणत आहात हे तुमच्या खूप जन्मांच्या शेवटच्या जन्मा
मधले जुने शरीर आहे.पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत.काहींचे ६०-७० जन्म आहेत,काहींचे ५०
आहेत,त्रेतायुगामध्ये जरुर आयुष्य काही ना काही कमी होते.सतयुगामध्ये संपूर्ण
आयुष्य असते.आता यासाठी पुरुषार्थ करायचा आहे की आम्हीं प्रथम सतयुगामध्ये यावे.तिथे
ताकत असल्यामुळे अवकाळी मृत्यू होत नाही.ताकत कमी झाल्यामुळे नंतर आयुष्यही कमी होत
जाते. आता ज्याप्रमाणे बाबा सर्वशक्तिमान आहेत,तुमच्या आत्म्यालाही शक्तिमान बनवत
आहेत.एक तर पवित्र बनायचे आहे आणि आठवणी मध्ये राहायचे आहे तेंव्हा शक्ती मिळते.
बाबांकडून शक्तीचा वारसा घेत आहात.पाप आत्मा तर शक्ती घेऊ शकत नाही.पुण्यात्मा
बनल्यानंतर शक्ती मिळते.हा विचार करा-आम्ही आत्मे सतोप्रधान होतो.नेहमी शुभ भावना
ठेवायला पाहिजे.असे नाही की सर्व थोडेच सतोप्रधान बनणार आहेत.काही जण तर सतोही
असतील ना,असे नाही.स्वतःला समजायचे आहे आम्हीं ही सुरुवातीला सतोप्रधान होतो.
निश्चयामुळेच सतोप्रधान बनाल. असे नाही की आम्ही कसे सतोप्रधान बनू शकतो.नंतर
घसरतात.आठवणीची यात्रा करत नाहीत.जेवढे होईल तेवढा पुरुषार्थ केला पाहिजे.स्वतःला
आत्मा समजून सतोप्रधान बनायचे आहे.यावेळी सर्व मनुष्य आत्मे तमोप्रधान आहेत.तुमची
आत्माच तमोप्रधान आहे. आत्म्याला आता बाबांच्या आठवणीने सतोप्रधान बनवायचे
आहे.त्यासोबत सेवाही केल्यानंतर ताकत मिळेल. समजा कोणी सेंटर सुरू करतात तर अनेकांचे
आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर राहतात.मनुष्य यासाठी धर्मशाळा बनवतात की कोणीही आले
तर त्यांना आराम मिळावा.आत्मा खुश होते ना.तिथे राहायला मिळाल्यानंतर आराम मिळतो
तेंव्हा त्यांचा आशीर्वाद धर्मशाळा बनविणाऱ्याला मिळतो.याचा परिणाम काय होतो?दुसऱ्या
जन्मामध्ये तो सुखी राहतो.घर चांगले मिळते. घराचे सुख मिळते.असे नाही की कधी आजारी
पडणार नाही. फक्त घर चांगले मिळेल. हॉस्पिटल उघडले असेल तर आरोग्य चांगले
भेटेल.विद्यालय सुरु केले असेल तर शिक्षणामध्ये बुद्धी चांगली राहील.स्वर्गामध्ये
तर अशी हॉस्पिटल इ.नसतात. इथे तुम्ही पुरुषार्थाने २१ जन्मांसाठी प्रारब्ध बनवत
आहात.बाकी तिथे हॉस्पिटल, कोर्ट,पोलीस इ.काहीच नसेल. आता तुम्ही सुखधाम मध्ये जात
आहात.तिथे वजीर ही नसतात.उंच ते उंच स्वतः महाराजा-महाराणी,ते वजीरा चा सल्ला थोडीच
घेतील.सल्ला तेंव्हा घ्यावा लागतो जेंव्हा बुद्धिमत्ता कमी होते,जेंव्हा विकारी
बनतात.रावण राज्यांमध्ये एकदमच बेअक्कल, तुच्छ बुद्धी बनतात त्यामुळे विनाशाचा रस्ता
शोधत राहतात.स्वतः समजतात आम्ही विश्वाला खूप उच्च बनवत आहोत परंतु ते अजूनच खाली
घसरत जातात.आता विनाश समोर उभा आहे.
तुम्ही मुले जाणत आहात आम्हांला घरी जायचे आहे.आम्ही भारताची सेवा करून दैवी राज्य
स्थापन करत आहोत.नंतर आम्ही राज्य करू.पित्याचे अनुकरण करा असे गायन आहे. वडील
मुलाची प्रत्यक्षता करतात, मुलगा वडिलांची प्रत्यक्षता करतो.मुले जाणत आहेत यावेळी
शिवबाबा ब्रह्माच्या तना मध्ये येऊन आम्हाला शिकवत आहेत. असे समजवायचे आहे.आम्हीं
ब्रह्माला भगवान किंवा देवता इ. मानत नाही.हे तर पतित होते, बाबांनी पतित शरीरामध्ये
प्रवेश केला आहे.झाडामध्ये पहा वरती शेंड्या मध्ये उभा आहे ना.पतित आहे नंतर खाली
पावन बनण्यासाठी तपस्या करून पुन्हा देवता बनत आहेत.तपस्या करणारे ब्राह्मण
आहेत.तुम्हीं ब्रह्माकुमार-कुमारी सर्वजण राजयोग शिकत आहात.किती स्पष्ट आहे.यामध्ये
योग खूप चांगला असायला पाहिजे. आठवणी मध्ये राहिले नाही तर मुरली मध्ये ही ती ताकत
येणार नाही.ताकत मिळते शिवबाबांच्या आठवणीने.आठवणीनेच सतोप्रधान बनाल,नाहीतर सजा
खाऊन कमी पद मिळेल. आठवण मुख्य गोष्ट आहे,ज्यालाच भारताचा प्राचीन योग असे म्हटले
जाते.ज्ञान कोणालाही माहित नाही. सुरुवातीला ऋषीमुनी म्हणत होते- रचयिता आणि
रचनेच्या आदि-मध्य-अंताला आम्ही जाणत नाही.तुम्हांलाही अगोदर काहीच माहीत नव्हते.या
५ विकारांनी तुम्हांला एकदम कवडी तुल्य बनवले आहे.आता ही जुनी दुनिया जळून एकदम
नष्ट होणार आहे.काहीही राहणार नाही.तुम्ही सर्वजण क्रम वार पुरुषार्था नुसार भारताला
स्वर्ग बनविण्याची तन-मन-धनाने सेवा करत आहात.प्रदर्शनीमध्ये ही तुम्हांला विचारतात
तेंव्हा सांगा आम्हीं बी. के.आपल्याच तन-मन-धनाने श्रीमतावर सेवा करून रामराज्य
स्थापन करत आहोत.गांधीजी तर असे म्हणत नव्हते की श्रीमतावर आम्हीं रामराज्य स्थापन
करत आहोत.इथे तर यांच्यामध्ये श्री श्री १०८बाबा बसले आहेत.१०८ ची माळा ही बनवतात
ना.माळा तर मोठी बनविली जाते.त्यामध्ये ८-१०८ चांगली मेहनत करतात. क्रमानुसार तर
खूप आहेत,जे चांगल्याप्रकारे मेहनत करतात. रुद्र यज्ञ केला जातो तेंव्हा शाळीग्राम
चीही पूजा केली जाते.जरूर काहीतरी सेवा केली आहे त्यामुळेच पूजा होते.तुम्हीं
ब्राह्मण आत्मिक सेवाधारी आहात.सर्वांच्या आत्म्याला जागे करणारे आहात.मी आत्मा आहे,
हे विसरल्यामुळे देह-अभिमान येतो.समजतात मी आमका आहे. कोणाला हे थोडीच माहित आहे-
मी आत्मा आहे,हे नाव माझ्या शरीराचे आहे.मी आत्मा कुठून येते-हा जराही कोणाला विचार
येत नाही.इथे अभिनय करता- करता शरीराचे भान पक्के झाले आहे.बाबा समजावत
आहेत-मुलांनो,आता चुका करणे सोडा.माया खूप जबरदस्त आहे, तुम्ही युद्धाच्या
मैदानामध्ये आहात.तुम्हीं आत्म-अभिमानी बना.आत्मा आणि परमात्म्याचा हा मेळा
आहे.गायन आहे आत्मा-परमात्मा वेगळे राहिले खूप काळ.याचाही अर्थ ते जाणत नाहीत.तुम्ही
आता जाणत आहात-आम्ही आत्मे बाबांसोबत राहणारे आहोत.ते आत्म्यांचे घर आहे ना.बाबाही
तिथे आहेत, त्यांचे नाव आहे शिव. शिवजयंतीचे ही गायन आहे, दुसरे कोणते नाव द्यायला
नको. बाबा म्हणतात-माझे खरे नाव आहे कल्याणकारी शिव. कल्याणकारी रुद्र म्हटले जात
नाही.कल्याणकारी शिव असे म्हणतात.काशी मध्येही शिवाचे मंदिर आहे ना.तिथे जाऊन साधू
लोक मंत्रोच्चार करतात.शिव काशी विश्वनाथ गंगा.आता बाबा समजावतात शिव जो काशीच्या
मंदिरामध्ये आहे,त्याला विश्वनाथ असे म्हणतात.आता मी तर विश्व-नाथ नाही.विश्वाचे
नाथ तुम्ही बनत आहात,मी बनत नाही.ब्रह्म तत्त्वाचे नाथ ही तुम्हीच बनता.तुमचे ते घर
आहे.ती राजधानी आहे.माझे घर तर एकच ब्रह्मतत्व आहे.मी स्वर्गामध्ये येत नाही.न मी
कधी नाथ बनतो.मला तर शिवबाबा म्हणतात.माझा अभिनय आहे पतीतांना पावन बनविण्याचा.शिख
लोकही म्हणतात मुत पलीती कपड धोए.....परंतु अर्थ समजत नाही.महिमा गातात एकओंकार.....अजोनि
म्हणजे जन्म-मरण रहीत.मी तर ८४ जन्म घेत नाही.मी यांच्या मध्ये प्रवेश करतो.मनुष्य
८४ जन्म घेतात.यांची आत्मा जाणत आहे- बाबा माझ्या सोबत एकत्र बसले आहेत तरीही सतत
आठवण विसरून जाते.या दादांची आत्मा म्हणते मला खूप मेहनत करावी लागते.असे नाही की
माझ्यासोबत बसले आहेत तर आठवण चांगली राहते.नाही. एकदम एकत्र आहोत.माहित आहे
माझ्याजवळ आहेत. या शरीराचा जसे की तो मालक आहे.तरीही विसरून जातो. बाबांना हे घर (शरीर)
राहण्यासाठी दिले आहे.बाकी मी एका कोपर्यात बसलो आहे. मोठा माणूस आहे ना.विचार
करतो,माझ्या बाजूला मालक बसला आहे.हा रथ त्यांचा आहे. ते याची सांभाळ करतात.मला
शिवबाबा खाऊ पण घालतात.मी त्यांचा रथ आहे.काहीतरी काळजी घेणारच ना.याच खुशी मधे
जेवण करतो.दोन-चार मिनिटानंतर विसरून जातो,तेंव्हा मला समजते मुलांना किती मेहनत
घ्यावी लागत असेल म्हणूनच बाबा समजावत राहतात-जेवढे होईल तेवढी बाबांची आठवण
करा.खूप-खूप फायदा आहे.इथे तर छोट्याशा गोष्टींमध्ये ही वैतागून जातात आणि शिक्षण
सोडून देतात.बाबा-बाबा म्हणतात आणि सोडून जातात.बाबांना आपले बनवतात,ज्ञान ऐकवतात,
दिव्य दृष्टीने स्वर्ग पाहतात,रास करतात,अहो मम माया मला सोडून देतात,जे विश्वाचे
मालक बनवतात त्यांना सोडून जातात. मोठे-मोठे नावाजलेले ही मला सोडून जातात.
आता तुम्हाला रस्ता दाखवला जातो.असे नाही हाताला पकडून घेऊन जातात.या डोळ्याने तर
आंधळे नाहीत.हा ज्ञानाचा तिसरा डोळा तुम्हांला मिळतो.तुम्हीं सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताला जाणत आहात.हे 84 चे चक्र बुद्धीमध्ये फिरायला हवे.तुमचे नाव आहे
स्वदर्शन चक्रधारी.एक बाबांचीच आठवण करायची आहे.दुसऱ्या कुणाची आठवण यायला नको.शेवटी
ही अवस्था व्हावी.ज्याप्रमाणे स्त्रीचे पुरुषावर प्रेम राहते.त्यांचे आहे शारीरिक
प्रेम,इथे तुमचे आहे आत्मिक प्रेम. तुम्हाला उठता-बसता,पतींचा ही पती,पित्याच्याही
पित्याची आठवण करायची आहे. दुनियेमध्ये अशी ही घरे आहेत जिथे स्त्री-पुरुष किंवा
परिवार एकत्र खूप प्रेमाने राहतात. घरामध्ये जसे की स्वर्गच असतो.५-६ मुले एकत्र
राहतात,सकाळी लवकर उठून पूजेमध्ये बसतात,घरामध्ये कोणाशी भांडण इ.करत नाहीत.एकजुटीने
राहतात.काही ठिकाणी तर एकाच घरामध्ये कुणी राधा स्वामी चे शिष्य असतात तर कुणी
धर्मालाच मानत नाहीत.छोट्याश्या गोष्टीवरून नाराज होतात.तर बाबा म्हणतात या शेवटच्या
जन्मांमध्ये पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे.आपला पैसाही सफल करून आपले कल्याण करा.तरच
भारताचेही कल्याण होईल.तुम्ही जाणत आहात-आम्हीं आपली राजधानी श्रीमतावर पुन्हा एकदा
स्थापन करत आहोत.आठवणीच्या यात्रेमुळे आणि आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणल्या
मुळेच आम्हीं चक्रवर्ती राजा बनून जाऊ नंतर उतरणे सुरू होईल. नंतर शेवटी बाबां जवळच
येणार आहोत.श्रीमतावर चालल्याने उच्चपद प्राप्त करू.बाबा काही फाशीवर चढवत नाहीत.
म्हणतात एक तर पवित्र बना आणि बाबांची आठवण करा. सतयुगामध्ये मध्ये कोणीही पतित
नसते.देवी-देवता ही खूप थोडेच राहतात.नंतर हळूहळू वाढ होत जाते.देवतांचे आहे छोटेसे
झाड. नंतर किती वृद्धी होत जाते.सर्व आत्मे येत राहतात,हा पूर्वापार खेळ आहे. अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति माता-पिता बापदादांची प्रेम पूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. आत्मिक
सेवाधारी बनून आत्म्यांना जागे करण्याची सेवा करायची आहे.तन-मन-धनाने सेवा करून
श्रीमतावर रामराज्याच्या स्थापनेचे निमित्त बनायचे आहे.
2. स्वदर्शन चक्रधारी बनून 84 चे चक्र बुद्धीमध्ये फिरवायचे आहे.एक बाबांचीच आठवण
करायची आहे.दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको.कधी कोणत्याही गोष्टींमध्ये वैतागून
शिक्षण(मुरली)सोडायचे नाही.
वरदान:-
बाबा आणि
प्राप्तीच्या स्मृतीने सदैव हिम्मत उल्लासामधे राहणारे एकरस, अचल भव
बाबांच्या द्वारे
जन्मताच ज्या प्राप्ती मिळाल्या आहे त्यांची लिस्ट सदैव समोर ठेवा.जेंव्हा प्राप्ती
अटल अचल आहे तर हिम्मत आणि उल्हासही अचल असायला हवा.अचलच्या बदल्यात जर मन कधी
अस्थिर होऊन जाते किंवा स्थितीमध्ये अस्थिरता येते तर याचे कारण आहे की पिता आणि
प्राप्तीला सदैव समोर ठेवत नाहीत.सर्व प्राप्तीचा अनुभव सदैव समोर किंवा स्मृतीमध्ये
राहिला तरच सर्व विघ्न नष्ट होऊन जातील, सदैव नवा उमंग,नवा उल्हास राहील.अवस्था
एकरस आणि अचल राहील.
बोधवाक्य:-
कोणत्याही
प्रकारच्या सेवेमध्ये सदैव संतुष्ट राहणे म्हणजेच चांगले गुण घेणे आहे.