27-09-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
27.03.86 ओम शान्ति
मधुबन
सदैव स्नेही बना
आज स्नेहाचे सागर बाबा
आपल्या स्नेही मुलांना भेटण्यासाठी आलेले आहेत. हा आत्मिक स्नेह प्रत्येक मुलाला
सहज योगी बनवतो. हा स्नेह सर्व विश्वाला सहज विसरून जाण्याचे साधन आहे. हा स्नेह
आपल्याला बाबांचा बनवण्यासाठी एकमात्र शक्तिशाली साधन आहे. स्नेह ब्राह्मण जीवनाचा
पाया आहे. स्नेह शक्तिशाली जीवन बनवण्याचा आणि पालनेचा आधार आहे. जे सर्व आत्मे
बाबांच्या समोर पोहोचलेले आहेत त्या सर्वांचा पोहोचण्याचा आधार देखील स्नेहच आहे.
स्नेहाच्या पंखाने उडत येऊन मधुबनवासी बनतात. बापदादा सर्व स्नेही मुलांना पाहत होते
की, स्नेही तर सर्वच मुले आहेत परंतु त्यांच्यात फरक काय आहे?क्रमांक एकचे का
बनतात?कारण, स्नेही सर्वच आहेत परंतु कोणी सदैव आहे आणि कोणी फक्त स्नेही आणि तिसरे
आहेत वेळेनुसार स्नेह देणारे. बापदादांनी तीनही प्रकारचे स्नेही मुलं पाहिलेली आहेत.
जे सदैव स्नेही आहेत ते तल्लीन असल्याने मेहनत आणि अडचणी पासून दूर राहतात. त्यांना
मेहेनत करावी लागत नाही, ना अडचणींचा अनुभव येतो, कारण सदैव स्नेही असल्यामुळे
त्यांच्यासमोर प्रकृती आणि माया दोन्ही दासी बनतात. अर्थात सदैव स्नेही आत्मा मालक
बनते, तेंव्हा प्रकृती आणि माया स्वतःदासी रूपात हजर होतात. सदैव स्नेहींचा वेळ आणि
संकल्प आपल्याकडे ओढून घेण्याची हिम्मत प्रकृती आणि मायेत नाही. सदैव स्नेही
आत्म्यांचा प्रत्येक क्षण, प्रत्येक संकल्प बाबांच्या आठवणीत असल्याने मायेला देखील
माहित आहे, अशी मुले आपल्या अधीन होऊ शकत नाही. अशी मुले सर्व शक्तींचे अधिकारी
आहेत. अशाच मुलांचे गायन केले जाते. एक बाबा दुसरा न कोणी. बाबाच संसार आहे. दुसऱ्या
क्रमांकाची- स्नेही आत्मे स्नेहा मध्ये राहतात, परंतु सदा स्नेही न होण्याच्या
कारणांनी कधीकधी दुसरीकडे स्नेह जातो. फार थोडा काळ स्वतःला परिवर्तन करत असल्याने
कधी मेहनत तर कधी अडचणींचा अनुभव करावा लागतो. परंतु खूप थोडासा, जेंव्हा प्रकृती व
मायेचा सूक्ष्म आघात होतो त्याच वेळी स्नेहाच्या कारणांने खूप लवकर स्वतःला
परिवर्तन करतात. परंतु थोडासा वेळ व संकल्प मेहनत आणि अडचणींमध्ये जातो. परंतु खूप
वेळ व्यर्थ संकल्पात जात नाहीत, म्हणून स्नेही आहेत, परंतु सदा स्नेही न होण्याच्या
कारणाने दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
तिसरे आहेत - वेळे नुसार स्नेह देणारे. असे आत्मे समजतात की खरा स्नेह बाबा शिवाय
कुणाकडून मिळू शकत नाही, आणि हाच स्नेह सदा सर्वदा श्रेष्ठ बनविणारा आहे. ज्ञान
म्हणजे समज!आणि हेच स्नेही जीवन सर्व प्रिय असते!, परंतु काही मुले देह आकर्षणाच्या
संस्काराने किंवा विशेष जुन्या संस्कारांनी किंवा कोणत्या व्यक्ती वा वस्तूच्या
संस्काराने किंवा व्यर्थ संकल्पाच्या संस्काराने वशीभूत होऊन नियंत्रण शक्ती न
होण्याच्या कारणांनी व्यर्थ संकल्पनांचा ओझे निर्माण करतात, किंवा संघटनेची शक्ती
कमी होण्याच्या कारणांनी संघटनेत सफल होत नाहीत. संघटनेची परिस्थिती स्नेहाला
समाप्त करून आपल्याकडे ओढून घेते, आणि काही मुलं सदैव लवकरच नाराज होतात. आता-आता
उडती कलेमध्ये तर लगेचच नाराज होतात. हे स्वतः नाराज होण्याचे संस्कार सदैव स्नेही
बनू देत नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारचा संस्कार परिस्थितीकडे, प्रकृतीकडे
आकर्षित करतो, आणि हलचल मध्ये येतात, तेंव्हा स्नेहाचा अनुभव असल्या कारणाने स्नेही
जीवन प्रिय वाटते, कारण बाबांची आठवण येते. प्रयत्न करतात की आता बाबांच्या स्नेहा
मध्ये सामावून जावे. तर वेळे नुसार परिस्थिती नुसार अस्थिर बनण्याच्या कारणामुळे
बाबांचीआठवण करतात. कधी मायेशी युद्ध करतात. जास्त वेळ युद्ध केल्याने आणि स्नेहात
सामावून जाण्याची वेळ कमी असल्याने तिसऱ्या क्रमांकात येतात. परंतु तरीदेखील
विश्वातील सर्व आत्म्यांसाठी तिसरा क्रमांक हा अति श्रेष्ठ आहे, कारण बाबांची ओळख,
बाबांचे बनणे आणि ब्राह्मण परिवाराचे सदस्य होणे कमी नाही. ऊंच ब्राह्मण होणारेच
ब्रह्माकुमार-कुमारी म्हणवले जातात. दुनियेच्या तुलनेत तेच श्रेष्ठ आत्मे आहेत.
परंतु संपूर्णतेच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर स्नेही सर्वच आहेत परंतु
क्रमवार!नंबरवन सदा स्नेही आत्मे सदैव कमलपुष्पा समान न्यारे आणि बाबांचे
प्यारे(लाडके) असतील. स्नेही आत्मे प्यारे आहेत परंतु बाबां समान शक्तिशाली विजय
नाहीत . लवलीन नाहीत परंतू स्नेही आहेत. त्यांचे विशेष स्लोगन हेच आहे की तुझे
आहोत!तुझेच राहू! सदैव हेच गीत गात राहतात. स्नेही असल्याने 80 टक्के सुरक्षित
राहतात, परंतु तरीदेखील कधी-कधी शब्द येत राहतो . सदैव शब्द येत नाही. आणि तिसऱ्या
क्रमांकाचे आत्मे वारंवार स्नेहाच्या कारणांनी प्रतिज्ञा देखील स्नेहानेच करत असतात.
बास!आता असे बनवायचे आहे. आताच हे करणार आहोत!! कारण फरक जाणून असतात. प्रतिज्ञा
करतात पुरुषार्थ ही करतात परंतु कोणता ना कोणता विशेष जुना संस्कार मग्न होऊ देत
नाही. विघ्न अवस्थेला खाली घेऊन येतो म्हणून सदैव शब्द येऊ शकत नाही. परंतु कधी कसे
कधी तसे होण्याच्या कारणाने कोणती न कोणती विशेष कमजोरी राहून जाते. असे आत्मे
बापदादा समोर आत्मिक देवाण-घेवाण खूप गोड पद्धतीने करतात. खूप तर्कवितर्क करतात.
म्हणतात बाबा तुम्ही आम्हाला डायरेक्शन देतात परंतु आमच्या वतीने तुम्हीच सर्व काही
करा मात्र फळ आम्हाला मिळू द्या. प्रेमाने भांडतात जर तुम्ही आम्हाला आपले बनवले आहे
तर तुम्हीच सगळं काही जाणून घ्या. बाबा म्हणतात मी जाणून घेईलही परंतु तुम्ही मान्य
तरी केले पाहिजे. परंतु मुलं बाबांशी वाद घालतात, आम्ही मानो न मानो तुम्हाला
मानावचं लागेल, त्यामुळे बाबांना मुलांची दया येते. आहेत तर ब्राह्मणच त्यामुळे
स्वतः निमित्त बनून इतर आत्म्यांना शक्ती देत असतात. परंतु कोणी शक्ती घेऊन बदलतात
देखील, आणि कोणी शक्ती मिळताच आपल्या संस्कारांमध्ये मस्त होण्याच्या कारणांनी शक्ती
धारण करत नाहीत. ज्याप्रमाणे शक्तिशाली वस्तू बाबा खाऊ घालतात परंतु मुलं खात नसतील
तर काय करणार?
बाबा विशेष शक्ती देतही असतात आणि कुणी हळू हळू शक्तिशाली बनुन तिसऱ्या क्रमांका
वरून दुसऱ्या क्रमांका वर येतात, परंतु कोणी कोणी खूप आळशी असल्या कारणाने जेवढे
घ्यावयास हवे तेवढे घेत नाहीत. तीन प्रकारचे स्नेही मुल आहेत. सर्वांना टायटल एकच
आहे परंतु क्रमवार. आज जर्मनी वाल्यांचा टर्न आहे. सर्व ग्रुपच क्रमांक एक आहे.
क्रमांक एकचे जवळचे रत्न आहेत, कारण जे समान असतात तीच समीप राहतात . शरीर जरी
कितीही दूर असो परंतु हृदयाच्या जवळ आहेत. जे बाबांच्या हृदयसिंहासनावर असतात
त्यांच्या हृदयात बाबा स्वतःअसतात. कारण ब्राह्मण जीवनामध्ये बाबांनी हृदयाचा
व्यवहार केला आहे. हृदय दिलं आणि घेतलं. मनापासून बाबांच्या सोबत राहतात. शरीराने
कोणी कुठे कोणी कुठे आहेत सर्वांना इथे ठेवलं तर काय होईल. सेवेसाठी मधुबन वासियांना
देखील बाहेर पाठवावे लागले, नाहीतर विश्वाची सेवा कशी झाली असती. बाबांवर प्रेम आहे
परंतु सेवेवर देखील प्रेम केले पाहिजे . त्यामुळे ड्रामा नुसार भिन्नभिन्न
स्थानांवर पोहोचलेले आहेत आणि तेथे सेवेचे निमित्त बनले आहेत. नाटकामधे नोंद आहे.
आपल्या बंधूं सोबत सेवेसाठी निमित्त बनले आहेत. जर्मनी वाले सदा आनंदी राहणारे आहेत.
जर बाबांकडून सहजपणे वारसा मिळत असेल तर लौकिक वारसा का घ्यावा?दाता देत आहे तर
घेणाऱ्यांनीही का कमी घ्यावे? त्यामुळे सदैव आनंदाच्या झोक्यात झुलत रहा. सदैव
मायाजीत, प्रकृती जीत, विजयी बनून विजयाचा नगाडा विश्वा समोर जोरात वाजवायचा आहे.
आजचे आत्मे विनाशाच्या साधनांमध्ये खूप मग्न आहेत किंवा दुःख अशांतीने थकलेले आहेत,
त्यामुळे ते गाढ झोपलेले आहेत. त्यामुळे ते छोट्या आवाजाने उठणार नाहीत. जे नशेत
मदमस्त आहेत त्यांना हलवावे लागते. गाढ झोपणाऱ्यांना देखील हलवूनच उठवावे लागेल.
हैमबर्ग वाले काय करतात? खूपच शक्तिशाली ग्रुप आहे. सगळ्यांचे बाबा आणि ज्ञानावर वर
प्रेम आहे. ज्यांचे मुरलीवर प्रेम आहे ते शक्तिशाली असतात. आणि मुरलीधरावर प्रेम
करणारे मुरलीवर प्रेम करतात. काही म्हणतात आमचे बाबांवर प्रेम आहे परंतु मुरली साठी
वेळ नाही. बाबांना हे मान्य नाही जेथे लगन आहे तेथे विघ्न थांबू शकत नाही. विघ्ने
स्वतः समाप्त होतील. योग आणि मुरलीवर प्रेम करणारे विघ्नांना सहज पार करतील. उडती
कलेद्वारे स्वतः उंच होतील आणि विघ्ने खाली राहतील . उडती कला असणाऱ्यांसाठी पर्वत
देखील दगडा समान आहे . मुरलीवर प्रेम करणाऱ्यांसाठी बहाना कधीच नसतो. प्रेमच अवघडाला
सहज करते. मुरली, पढाई आणि परिवारावर प्रेम असेल तर एक किल्लाच बनतो. किल्ल्यात
राहणारे नेहमी सुरक्षित असतात. या ग्रुपला या दोन्ही विशेषता पुढे घेऊन जातील .
पढाई आणि परिवाराचे प्रेम एकमेकांना जवळ आणतात. स्नेह भाषेला ओळखत नाही . स्नेहाची
भाषा सर्व भाषांहून श्रेष्ठ आहे . बाप दादा चांगल्या प्रकारे प्रत्यक्ष प्रमाण पाहत
आहेत . सेवेची वृद्धी होत आहे. जेवढी सेवेची वृद्धि कराल तेवढेच पुण्य आत्मा बनालआणि
आशीर्वाद प्राप्त कराल. पुण्य आत्माच पूज्य आत्मा बनते. आत्ता पुण्यात्मा नाही
बनलात तर भविष्यात पूज्य आत्मा बनू शकणार नाहीत. पुण्यात्मा आत्ताच बनणे आवश्यक आहे.
अच्छा
अव्यक्त
मुरलीतून निवडक प्रश्न आणि उत्तरे
प्रश्न :-
ब्राह्मण जीवनाचा
विशेष गुण, शृंगार आणि खजाना कोणता आहे?
उत्तर-
संतुष्टता. जसे एखादी प्रिय वस्तु असेल तर तिला टाकून दिले जात नाही. संतुष्टता ही
एक विशेषता आहे. ब्राह्मण जीवनाच्या परिवर्तनाचा आरसा आहे. जेथे संतुष्टता आहे तेथे
आनंद आहे. जर ब्राह्मण जीवनात संतुष्टता नसेल तर ते जीवन साधारण आहे.
प्रश्न -
संतुष्टमणी आत्म्यांची
विशेषता काय असेल?
उत्तर -
संतुष्टमणी आत्मा कधीच कोणत्याही कारणाने स्वतःवर, अन्य आत्म्यापासून,
संस्कारांपासून, वातावरणाच्या प्रभावामुळे असंतुष्ट होणार नाही . ते असे कधीच
म्हणणार नाहीत की, आम्ही संतुष्ट आहोत परंतु दुसरे आत्मे असंतुष्ट करतात. काही झाले
तरी हे आत्मे आपल्या या विशेषतेला कधीच सोडत नाहीत.
प्रश्न-
जे नेहमी संतुष्ट
राहतात त्यांची लक्षणे काय असतील?
उत्तर -
1) जे नेहमी संतुष्ट
राहतात त्यांच्याविषयी इतरांनाही स्नेह असतो कारण संतुष्टता ब्राह्मण परिवाराला
स्नेही बनवते.
2) संतुष्ट आत्म्याला सर्व स्वतः जवळ आणण्याचा किंवा प्रत्येक श्रेष्ठ कार्यामध्ये
सहयोगी बनवून घेण्याचा प्रयत्न करतील.
3) संतुष्टतेची विशेषता स्वतःच प्रत्येकाला प्रत्येक कार्यात सुवर्ण संधी देत असते
त्यांना सांगण्याची किंवा विचार करण्याची गरज पडत नाही.
4) संतुष्टता नेहमी सर्वांच्या स्वभावाला समजून घेत असते. संतुष्टता कधीच कोणाच्या
स्वभाव संस्काराला घाबरत नाही.
5) अशी विशेषता असणार्यांवर सर्व प्रेम करतात. ते प्रेम घेण्यासाठी अथवा
मिळविण्यासाठी पात्र असतात. संतुष्टता हीच त्या आत्म्याची ओळख असते. प्रत्येकाला अशा
आत्म्या सोबत बोलावयास आवडते.
6) संतुष्ट आत्मा नेहमीच मायाजीत असतात. कारण ते आज्ञाकारी असतात. सदैव मर्यादेच्या
रेषेमध्ये राहतात. मायेला दुरूनच ओळखतात.
प्रश्न-
जर वेळेत मायेला ओळखत नसतील वारंवार धोखा खात असतील तर त्याचे कारण काय?
उत्तर -
ओळखत नसल्याचे कारण
आहे, सदैव बाबांच्या श्रेष्ठ मतावर चालत नाहीत. काही चालतात काही नाही, काही
थोडावेळ आठवण करतात काही नाही. कोणी वेळेनुसार उमंग उत्साहात राहतात, तर कोणी नाही.
नेहमी आज्ञेच्या लक्ष्मण रेषेत राहत नसल्याने माया धोका देते मायेत ओळखण्याची शक्ती
असते. माया पाहते की यावेळी हा कमजोर आहे तर त्या कमजोरी द्वारे ती आपल्याकडे ओढून
घेते. मायेचा येण्याचा रस्ताच कमजोरी आहे.
प्रश्न -
मायाजीत बनण्याचे सहज
साधन कोणते आहे?
उत्तर-
सदैव बाबांसोबत रहा, सोबत राहणे अर्थात स्वतः मर्यादेच्या लक्ष्मण रेषेत राहणे. मग
एक एक विकारांवर विजयी बनुन कष्टा पासून मुक्त व्हाल. सोबत रहाल तर, जसा बाप तशी
मुलं! संगाचा रंग स्वतः लागेल, त्यामुळे बीजाला सोडून फांद्या कापण्याची मेहनत करू
नका. आज कामजित बनलात तर उद्या क्रोधजीत बनाल!नाही!सदा विजयी, फक्त बीज रूपाला सोबत
ठेवाल तर मायेचे बीज असे भस्म होईल की परत त्यातून कधीच अंश निर्माण होणार नाही.
वरदान:-
प्रत्येक
आत्म्याला हिंमत, उत्साह देणारे, दयाळू, विश्व कल्याणकारी भव.
कधीच ब्राह्मण
परिवारात कोणत्याही कमजोर आत्म्याला तू कमजोर आहेस असे म्हणू नका. तुम्हां दयाळू,
विश्व कल्याणकारी मुलांच्या मुखातून सदैव प्रत्येक आत्म्याच्या प्रती शुभ बोल काढले
पाहिजेत. निराश होणारे नाही. भले कोणी कितीही कमजोर असो त्याला चेतावनी किंवा
शिक्षाही द्यायचीे असेल तर अगोदर त्याला समर्थ बनवून मग शिक्षा द्या. पहिल्यांदा
धरनीवर हिंमत आणि उत्साहाचा नांगर चालवा मग बीज टाका, तर सहज प्रत्येक बीज फळ देईल,
त्यामुळे विश्वकल्याणाची सेवा अधिक तीव्र होईल.
सुविचार:-
बाबांचा आशिर्वाद
घेताना नेहमी संपुर्णतेचा अनुभव करा.