31-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- तुमचे कर्तव्य आहे, सर्वांना स्थायी सुख आणि शांती चा रस्ता सांगणे,शांती मध्ये राहा आणि शांतीचे बक्षीस द्या"

प्रश्न:-
कोणते गुढ रहस्य समजण्यासाठी बेहदची बुद्धी पाहिजे?

उत्तर:-
नाटकामध्ये जे दृश्य ज्यावेळेस चालणार आहे,त्याच वेळेमध्ये चालणार आहे.याचे अचूक आयुष्य आहे,बाबाही आपल्या अचूक वेळेवर येतात, यामध्ये एका सेकंदाचा ही फरक पडू शकत नाही.पूर्ण पाच हजार वर्षानंतर बाबा येऊन प्रवेश करतात.हे गूढ रहस्य समजण्यासाठी बेहदची बुद्धी पाहिजे.

गीत:-
बदल जाये दुनिया न बदलेंगे हम........

ओम शांती।
आत्मिक मुलांच्या प्रति आत्मिक पिता बसून समजावत आहेत.मुलांना शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता सांगत आहेत.यावेळी सर्व मनुष्य विश्वामध्ये शांती मागत आहेत. प्रत्येक जण व्यक्तिगत ही मागत आहे आणि विश्वामध्ये शांतीही मागत आहे.प्रत्येक जण म्हणते मनाची शांती हवी आहे.आता ती कुठून मिळू शकते.शांतीचा सागर तर बाबाच आहेत,ज्यांच्याकडून वारसा मिळू शकतो.व्यक्तिगत ही मिळतो आणि होलसेल ही मिळतो.म्हणजेच सर्वांना मिळतो.जी मुले शिकत आहेत,समजू शकतात आम्ही शांतीचा वारसा घेण्यासाठी आपला पुरुषार्थ करत आहोत,इतरांना ही रस्ता सांगत आहोत. कोणी वारसा घेण्यासाठी येवो किंवा न येवो विश्वामध्ये शांति तर होणारच आहे.मुलांचे कर्तव्य आहे,सर्व मुलांना शांती द्यायची आहे.2-4 जणांना वारसा मिळून काय होणार,हे समजू शकत नाहीत.कोणाला रस्ता सांगितला जातो परंतु निश्चय बुद्धी नसल्यामुळे दुसऱ्यांना आपसमान बनवू शकत नाहीत.जे निश्चय बुद्धी आहेत ते समजू शकतात, बाबांकडून आम्हाला आशीर्वाद मिळत आहे.वरदान देतात ना-आयुष्यमान भव,धनवान भव असेही म्हणतात.फक्त बोलल्याने तर आशीर्वाद मिळू शकत नाही.आशीर्वाद मागितल्यानंतर त्यांना समजावले जाते तुम्हाला शांती हवी असेल तर असा पुरुषार्थ करा.मेहनत केल्याने सर्व काही मिळेल.भक्ती मार्गामध्ये किती आशीर्वाद घेतात.आई, वडील,शिक्षक,गुरु इ.सर्वांकडून आम्ही सुखी आणि शांत राहावे यासाठी आशीर्वाद मागतात.परंतु राहू शकत नाहीत कारण की एवढे भरपूर मनुष्य आहेत त्यांना सुख शांती कशी मिळू शकते.आम्हाला शांती दे असे गात राहतात.बुद्धीमध्ये येते-हे परमपिता परमात्मा आम्हाला शांती चे बक्षीस द्या.खरेतर जी वस्तू आपोआप मिळते त्याला बक्षीस म्हटले जाते.म्हणतात हे तुला बक्षीस मिळाले आहे इनाम आहे.बाबा म्हणतात कोणी कितीही बक्षीस देऊ शकते धनाचे,घराचे,कपडे इ.चे ही देतात ते झाले अल्पकाळासाठी दान पूण्य.मनुष्य मनुष्याला देतात. सावकार गरिबाला किंवा साहुकार साहुकाराला देत आले आहेत. परंतु इथे तर आहे स्थायी शांती आणि सुख.इथे तर कोणी एका जन्मासाठी ही सुख शांती देऊ शकत नाही कारण की त्यांच्या जवळच नाही.देणारा एकच पिता आहे.त्याला सुख शांती पवित्रतेचा सागर असे म्हटले जाते.उच्च ते उच्च ईश्वराची महिमा गायली जाते.समजतात त्यांच्याकडूनच शांती मिळेल.नंतर ते साधुसंत इ. जवळ जातात कारण की भक्ती मार्ग आहे ना त्यामुळे फिरत राहतात.तो सर्व पुरुषार्थ अल्पकाळासाठी आहे.तुम्हा मुलांचे आता ते सर्व बंद झाले आहे.तुम्ही लिहिता बेहद च्या पित्याकडून 100% पवित्रता, सुख,शांती चा वारसा प्राप्त करू शकता.इथे 100% अपवित्रता, दुःख,अशांती आहे.परंतु समजत नाही.म्हणतात ऋषीमुनी इ.तर पवित्र आहेत.परंतु जन्मतर विकारापासून होतो ना.मुख्य गोष्ट, ही आहे.रावण राज्यामध्ये पवित्रता असू शकत नाही. पवित्रता,सुख इ.सर्वांचा सागर एक पिताच आहेत.

तुम्ही जाणत आहात आम्हाला शिवबाबांकडून २१ जन्म अर्थात अर्धाकल्प २५०० वर्षासाठी वारसा मिळत आहे.ही तर खात्री आहे.अर्धाकल्प सुखधाम अर्धाकल्प आहे दुःखधाम.सृष्टीचे दोन भाग आहेत-एक नवी,एक जुनी.परंतु नवी केव्हा,जुनी केव्हा असते,हे ही जाणत नाहीत. झाडाचे अचूक आयुष्य किती आहे हे सांगू शकत नाहीत.आता बाबांच्या द्वारे तुम्ही या झाडाला जाणले आहे.हे 5 हजार वर्षाचे जुने झाड आहे,याचे अचूक आयुष्य तुम्हाला माहित आहे,इतर जे झाड असतात त्यांच्या आयुष्याबद्दल कोणाला माहित नसते,अंदाजे सांगतात.वादळ आले,झाड पडले,आयुष्य पूर्ण झाले.मनुष्यांनाही अचानक मरण येत राहते.या बेहदच्या झाडाचे आयुष्य पूर्ण 5 हजार वर्ष आहे. यामध्ये एक दिवसही कमी जास्त होऊ शकत नाही.हे पुर्वनियोजीत (अविरत)झाड आहे. यामध्ये फरक पडू शकत नाही. नाटकामध्ये जे दृश्य ज्या वेळेवर चालले आहे त्या वेळेवरच चालणार आहे.हुबेहूब पुनरावृत्त होणार आहे.आयुष्य ही अचूक आहे.बाबांनाही नव्या दुनियेची स्थापना करण्यासाठी यायचे आहे.अचूक वेळेवर येतात. त्यामध्ये एका सेकंदाचा ही फरक पडू शकत नाही.ही सुद्धा तुमची आता बेहद ची बुद्धी झाली. तुम्हीच समजू शकता.पूर्ण 5 हजार वर्षानंतर बाबा येऊन प्रवेश करतात,म्हणून शिवरात्री असे म्हणतात.कृष्णासाठी जन्माष्टमी म्हणतात.शिवाची जन्माष्टमी म्हणत नाहीत,शिवाची रात्री म्हणतात कारण की जर जन्म झाला तर मृत्यूही होईल. मनुष्यांचा जन्मदिवस म्हणतात. शिवा साठी नेहमी शिवरात्री म्हणतात.दुनियेमध्ये या गोष्टींबद्दल कोणालाही माहीत नाही.शिवरात्री असे का म्हणतात जन्माष्टमी का म्हणत नाही,हे तुम्ही समजू शकता.त्यांचा जन्म दिव्य अलौकिक आहे,जो इतर कोणाचाही होऊ शकत नाही. शिवबाबा कधी,कसे आले हे कोणीही जाणत नाहीत.शिवरात्रीचा अर्थ काय आहे,हे तुम्हीच जाणता.ही बेहद ची रात्र आहे.भक्तीची रात्र पूर्ण होऊन दिवस होतो.ब्रह्माची रात्र आणि दिवस आहे तर ब्राह्मणांचा ही आहे. एकट्या ब्रह्माचा खेळ थोडीच चालतो.आता तुम्ही जाणत आहात,आता दिवस सुरू होणार आहे.शिकता-शिकता जाऊन आपल्या घरी पोहोचतील नंतर दिवसांमध्ये(सतयुगामध्ये)येतील. अर्धाकल्प दिवस आणि अर्धाकल्प रात्र गायली जाते परंतु कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. ते लोक तर म्हणतात कलियुगाचे आयुष्य अजून 40 हजार वर्ष बाकी आहे.सतयुगाची लाखो वर्ष आहेत नंतर अर्ध्या-अर्ध्या चा हिशोब उरत नाही.कल्पाच्या आयुष्याला कोणीही जाणत नाही.तुम्ही साऱ्या विश्वाच्या आदि-मध्य-अंताला जाणता.ही सृष्टी 5 हजार वर्षांनंतर चक्र लावत असते.विश्व तर आहेच, त्यामध्ये अभिनय करता-करता मनुष्य त्रासून जातात.हे काय आवागमन(पुनर्जन्माचे चक्र) आहे.जर 84 लाख जन्माचे आवागमन असते तर माहित नाही काय झाले असते.न जाणल्यामुळे कल्पाचे आयुष्य वाढवले आहे.आता तुम्ही मुले बाबांच्या समोर बसून शिकत आहात.मनामध्ये जाणीव होते- आम्ही प्रत्यक्षात बसलो आहे. पुरुषोत्तम संगमयुगालाही अवश्य यायचे आहे.कधी येते,केव्हा येते हे कुणीही जाणत नाही.तुम्ही मुले जाणता तर तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे.तुम्ही कल्प-कल्प बाबांकडून वारसा घेत आले आहात अर्थात मायेवर जीत प्राप्त करून पुन्हा हरले आहात.ही बेहदची हार आणि जीत आहे. त्या राजांची तर खूप वेळा हार-जीत होत राहते.अनेक युद्ध होत राहतात.छोटेसे युद्ध झाले तर म्हणतात आता आम्ही जिंकलो.काय जिंकले?छोट्याशा तुकड्याला जिंकले.मोठ्या युद्धामध्ये हरल्यानंतर झेंडा खाली पाडतात.सुरुवातीला तर एक राजा असतो नंतर वाढत जातात. सुरुवातीला या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते नंतर इतर राजे यायला सुरुवात झाली.ज्याप्रमाणे पोप दाखवले आहेत.सुरुवातीला एक होते नंतर क्रमवार इतर पोप ही बसत गेले.कोणाच्या मृत्यूचा भरोसा तर नाही ना.

तुम्ही मुले जाणत आहात आम्हाला बाबा अमर बनवत आहेत.अमरपुरी चे मालक बनवत आहेत,किती खुशी व्हायला पाहिजे.हा आहे मृत्युलोक,तो आहे अमरलोक.या गोष्टींना नवीन कोणी समजू शकत नाही.जेवढा आनंद जुन्यांना येतो, तेवढा नव्यांना येणार नाही. दिवसेंदिवस वृद्धि होत राहते. निश्चय पक्का होतो.यामध्ये सहनशीलता ही खूप असायला पाहिजे.ही तर आसुरी दुनिया आहे,दुःख द्यायला उशीर करत नाहीत.तुमची आत्मा म्हणते आम्ही आता बाबांच्या श्रीमतावर चालत आहोत.आम्ही संगमयुगावर आहोत.बाकी सर्वजण कलियुगामध्ये आहेत. आम्ही आता पुरुषोत्तम बनत आहोत.पुरुषांमध्ये उत्तम पुरुष शिक्षणाने बनतात.शिक्षणानेच मोठे न्यायाधीश इ.बनतात ना. तुम्हाला बाबा शिकवत आहेत.या शिक्षणाने आपल्या पुरुषार्था नुसार पद प्राप्त करत आहात.जे जेवढे शिकतील तेवढा उच्च दर्जा मिळेल.इथे राजाईचा दर्जा आहे. तसे त्या शिक्षणामध्ये राजाईचा दर्जा मिळत नाही.तुम्ही जाणत आहात आम्ही राजांचाही राजा बनत आहोत.तर मनामध्ये किती खुशी व्हायला पाहिजे.आम्ही डबल सिरताज खूप उंच बनत आहोत.ईश्वर पिता आम्हाला शिकवत आहे.कधी कोणी समजू शकणार नाही की निराकार पिता कसे येऊन शिकवत आहेत.मनुष्य बोलावतात ही हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा. तरीही पावन बनत नाहीत.बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे. तुम्ही एका बाजूला बोलावता-की पतितपावन ये, आता मी आलो आहे सांगत आहे मुलांनो पतीत पणा सोडून द्या,तरीही तुम्ही का सोडत नाही?असं थोडीच आहे बाबा तुम्हाला पावन बनवतील आणि तुम्ही पतित बनत राहायचे. असे पतित बनतात.कोणी खरे सांगतात,बाबा आमच्याकडून ही चूक झाली.बाबा म्हणतात कोणतेही पाप कर्म झाले तर लगेच सांगा.कोणी खरे,कोणी खोटे बोलत राहते.कोण विचारत आहे?मी थोडीच एका एकाच्या मनामध्ये काय चालले आहे ते बसून जाणू शकतो,हे तर होऊ शकत नाही.मी फक्त मत देण्यासाठी येतो.पावन नाही बनलात तर तुमचेच नुकसान आहे.मेहनत करून पावन पासून पतित बनाल तर केलेली कमाई नष्ट होऊन जाईल.लाज वाटेल आम्ही स्वतः पतित बनलो आहे तर दुसऱ्याला पावन बना असे कसे म्हणू शकतो.मन खात राहील की आम्ही किती आज्ञेचे उल्लंघन केले आहे.इथे तुम्ही डायरेक्ट बाबांजवळ प्रतिज्ञा करता,जाणत आहात बाबा आम्हाला सुखधाम-शांतीधाम चे मालक बनवत आहेत.तो हाजीर नाजिर आहे,आम्ही त्याच्यासमोर बसलो आहे.सुरुवातीला याच्यामध्ये हे ज्ञान थोडीच होते. ना कोणी गुरु होता-ज्यांनी हे ज्ञान दिले.जर गुरु असता तर फक्त एकालाच ज्ञान देईल का.गुरूंचे अनुयायी तर अनेक असतात ना. एक थोडीच असेल.या समजण्याच्या गोष्टी आहेत ना. सतगुरू एक आहे.तो आम्हाला रस्ता सांगत आहे.आम्ही नंतर दुसऱ्यांना सांगत आहे.तुम्ही सर्वांना सांगत आहात-बाबांची आठवण करा.बस.उच्च ते उच्च पित्याची आठवण केल्याने उच्च पद मिळेल.तुम्ही राजांचाही राजा बनता.तुमच्याजवळ अनगिनत धन असेल.तुम्ही आपली झोळी भरत आहात ना.तुम्ही जाणत आहात बाबा आमची झोळी खूप भरत आहेत.कुबेरा जवळ खूप धन होते असे म्हणतात.खरे पाहता तुम्ही प्रत्येक जण कुबेर आहात.तुम्हाला वैकुंठ रूपी खजाना मिळत आहे.खुदा दोस्त ची गोष्ट ही आहे.त्याला जो प्रथम भेटत होता त्याला एका दिवसाची बादशाही देत होता.ही सर्व उदाहरणे आहेत.अल्लाह म्हणजे पिता,तो अवलदीन रचनाकार आहेत. नंतर साक्षात्कार होतो.तुम्ही जाणत आहात बरोबर आम्ही योगबळाने विश्वाची बादशाही घेत आहोत.अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. या आसुरी दुनियेमध्ये खूप खूप सहनशील बनवून राहायचे आहे.कोणी अपशब्द बोलले,दुःख दिले तरीही सहन करायचे आहे. बाबांचे श्रीमत कधीही सोडायचे नाही.

2. डायरेक्ट बाबांनी पावन बनण्याची आज्ञा दिली आहे म्हणून कधीही पतित बनायचे नाही.कधी कोणते पाप झाले तर लपवायचे नाही.

वरदान:-
परमात्म मिलना द्वारे आत्म संवादाचे योग्य प्रतिउत्तर प्राप्त करणारे पित्यासमान बहुरूपी भव

ज्याप्रमाणे पिता बहुरूपी आहेत, सेकंदामध्ये निराकारी पासून आकारी वस्त्र धारण करतात, अशाप्रकारे तुम्हीही या मातीच्या ड्रेस ला सोडून आकारी फरिश्ता ड्रेस,चमकणारा ड्रेस परिधान करा तर सहज मिलनही होईल आणि आत्म संवादाचे स्पष्ट प्रतिउत्तर समजेल कारण हा ड्रेस जुन्या दुनियेच्या वृत्ती आणि वातावरणापासून,मायेच्या पाण्यापासून किंवा आगीपासून सुरक्षित आहे,यामध्ये माया हस्तक्षेप करू शकत नाही.

बोधवाक्य:-
दृढता अशक्य गोष्टीलाही शक्य करवते.