06-12-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   20.02.87  ओम शान्ति   मधुबन


आठवण पवित्रता आणि खऱ्या सेवाधारीच्या तीन रेषा


आज सर्व स्नेही विश्व सेवाधारी बाबा आपल्या नेहमी सेवेत तत्पर राहणाऱ्या सेवाधारी मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. सेवाधारी बापदादांना समान सेवाधारी मुलं नेहमी प्रिय आहेत. आज विशेष सर्व सेवाधारी मुलांच्या मस्तकावरती चमकणाऱ्या विशेष तीन रेषा पाहत आहे.प्रत्येकाचे मस्तक त्रिमूर्ती तिलक सारखे चमकत आहे.या तीन रेषा कोणती लक्षणं आहेत.या तीन प्रकाराच्या रेषा द्वारे प्रत्येक मुलांचे वर्तमान परिणामाला पाहत आहेत.एक संपूर्ण योगी जीवनाची रेषा, दुसरी पवित्रतेची रेषा आणि तिसरी खऱ्या सेवाधारीची रेषा आहे. तीन रेषांमध्ये प्रत्येक मुलांचा परिणाम पाहत आहेत.आठवणीची रेषा सर्वांची क्रमानुसार चमकत आहे. कोणाची रेषा सुरुवातीपासून आज पर्यंत अव्यभिचारी आठवण,नेहमी एकाच्या लगन मध्ये मग्न राहणारी आहे.दुसरी गोष्ट नेहमी अतूट राहिली आहे. नेहमी सरळ रेषा म्हणजे प्रत्यक्ष बाबासोबत सर्व संबंधाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे किंवा कोणत्या निमित्त आत्म्या द्वारे बाबांशी संबंध जोडण्याचे अनुभवी आहात.प्रत्यक्ष बाबांचा आधार आहे की, कोणत्या आत्म्याच्या आधारा द्वारे बाबांचा आधार आहे.एक आहे सरळ रेषा, दुसरी आहे,मध्ये मध्ये थोडी वाकडी रेषा असणारे.या आठवणीच्या रेषांच्या विशेषता आहेत.

दुसरी म्हणजे संपूर्ण पवित्रतेची रेषा. यामध्ये पण क्रमानुसार आहेत.एक ब्राह्मण जीवनाची पालना घेताच, ब्राह्मण जीवनाचे,विशेष बाबाचे वरदान प्राप्त करून नेहमी आणि सहज या वरदानाला जीवनामध्ये अनुभव करणारे आहेत.त्यांची रेषा सुरुवातीपासून आतापर्यंत सरळ आहे.दुसरे म्हणजे ब्राह्मण जीवनाच्या वरदानाला अधिकाराच्या रूपांमध्ये अनुभव करत नाहीत, कधी सहज कधी कष्टा द्वारे,खूप पुरुषार्थ द्वारे आचरण करणारे आहेत.त्यांची रेषा नेहमी सरळ आणि चमकत राहत नाही.वास्तव मध्ये आठवण आणि सेवेच्या सफलतेचा आधार पवित्रता आहे.फक्त ब्रह्मचारी बनणे ही पवित्रता नाही परंतु पवित्रतेचे संपूर्ण रूप ब्रह्मचारी च्या सोबतच ब्रह्मचारी बनणे आहे.ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्माच्या आचरणावरती चालणारे, यालाच बाबांचे अनुकरण म्हटले जाते, कारण ब्रह्मा पित्याचे अनुकरण करायचे आहे.शिवपित्या समान स्थितीमध्ये बनायचे आहे परंतु आचरण किंवा कर्मामध्ये, ब्रह्मा पित्याचे अनुकरण करायचे आहे. प्रत्येक पावलामध्ये ब्रह्मचारी. ब्रह्मचर्याचे वृत्त नेहमी संकल्प आणि स्वप्ना पर्यंत हवे. पवित्रतेचा अर्थ आहे नेहमी बाबांना साथी बनवणे आणि बाबाच्या सोबती मध्येच राहणे.सोबती बनवले आहे ना."माझे बाबा" हे पण आवश्यक आहे परंतु प्रत्येक वेळेत सोबती पण बाबांची हवी, याला संपूर्ण पवित्रता म्हणतात. संघटनांमध्ये सोबत, परिवारांच्या स्नेहाची मर्यादा, ती वेगळी गोष्ट आहे, ते पण आवश्यक आहे,परंतु बाबामुळेच हे संघटन, स्नेहाची सोबत आहे, हे विसरायचे नाही.परिवाराचे प्रेम आहे परंतु परिवार कोणाचा आहे? बाबांचा आहे ना. बाबा नसतील तर परिवार कोठून येईल? परिवाराचे प्रेम, परिवाराचे संघटन खूप चांगले आहे, परंतु परिवाराचे बीज विसरायचे नाही.बाबांना विसरून परिवारालाच सोबती बनवतात. मध्ये मध्येच बाबांना सोडले तर ती खाली जागा राहते,तेथे माया येऊ शकते, म्हणून स्नेहा मध्ये राहत स्नेहाची देवाण-घेवाण करत बाबांना विसरू नका, याला म्हणतात पवित्रता.हे समजण्या मध्ये तर हुशार आहात ना.

काही मुलांना संपूर्ण पवित्रतेच्या स्थितीमध्ये पुढे जाण्यामध्ये कष्ट लागतात म्हणून मध्ये मध्ये कोणाला सोबती बनवण्याचा संकल्प येतो आणि सोबती पण आवश्यक आहे,हा पण संकल्प येतो.संन्यासी तर बनवायचे नाही परंतु आत्म्यांच्या सोबत राहत,बाबांची सोबत विसरू नका, नाहीतर वेळेनुसार त्या सोबत्याची आठवण येईल आणि बाबा विसरून जातील.तर वेळेवर धोका मिळणे संभव आहे कारण साकार शरीरधारीच्या आधाराची सवय लागेल. तर अव्यक्त बाप आणि निराकार पिता नंतर आठवणीत येतील,प्रथम शरीरधारी आठवणीत येतील.जर कोणत्याही वेळेत प्रथम साकार शरीरधारीची आठवण येईल,तर क्रमांक एक ते झाले आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये बाबा झाले.जर बाबांना दुसऱ्या क्रमांका मध्ये ठेवतात तर त्यांना कोणते पद मिळेल? क्रमांक एक की क्रमांक दोन.फक्त सहयोग घेणे, स्नेही राहणे, ती वेगळी गोष्ट आहे परंतु आधार बनवणे वेगळी गोष्ट आहे.या खूप रहस्ययुक्त गोष्टी आहेत, याला अर्थ सहित जाणायला हवे. कोण कोणत्या संघटन मध्ये स्नेही बनण्याऐवजी अनासक्त बनतात, ते घाबरतात की फसायला नको. यापेक्षा तर दूर राहणे बरोबर आहे, परंतु नाही.एकवीस जन्म प्रवृत्ती मध्ये, परिवारामध्ये राहिले ना.जर घाबरल्यामुळे किनारा करतात, अनासक्त बनतात,तर ते कर्म सन्मानाचे संस्कार होतात.कर्मयोगी बनायचे आहे, कर्मसंन्यासी नाही. संघटन मध्ये राहायचे आहे, स्नेही बनायचे आहे परंतु बुद्धीचा आधार एक बाबा हवेत,दुसरे कोणी नाही. बुद्धीचा कोणत्या आत्म्या सोबत गुण किंवा कोणतीही विशेषता आकर्षित करायला नको,याला म्हटले जाते पवित्रता.पवित्रते मध्ये कष्ट वाटतात,हेच सिद्ध करते की वरदाता शिव पित्याकडून जन्माचे वरदान घेतले नाही. वरदानामध्ये कष्ट वाटत नाहीत. प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला ब्राह्मण जन्माचे प्रथम वरदान "पवित्र भव, योगी भव" चे मिळाले आहे. तर स्वतःला विचारा पवित्रता चे वरदानी आहेत की कष्टा द्वारे पवित्रतेला स्वीकार करणारे आहात.याची आठवणी ठेवा की आमचा ब्राह्मण जन्म आहे,फक्त जीवन परिवर्तन नाही परंतु ब्राह्मण जन्माच्या आधारावर जीवनाचे परिवर्तन आहे. जन्माचे संस्कार खूप सहज आणि स्वतः असतात.आपसामध्ये पण म्हणतात ना की,माझे जन्मा पासूनचे संस्कार आहेत. ब्राह्मण जन्माचे संस्कार आहेतच योगी भव पवित्र भव.वरदान पण आहे आणि मुळ संस्कार पण आहेत. जीवनामध्ये दोन गोष्टी आवश्यक आहेत,एक सोबती दुसरे संघटन, म्हणून त्रिकालदर्शी बाबा सर्वांच्या आवश्यकता जाणून, सोबत पण श्रेष्ठ, आणि संघटन पण श्रेष्ठ देतात. विशेष डबल विदेशी मुलांना दोन्ही पाहिजेत, कारण बापदादांनी ब्राह्मण जन्म होताच, सोबतीचा अनुभव करवला, सुहासिनी बनवले. जन्मताच सोबती मिळाला ना? सोबती मिळाला की शोधत आहात? तर पवित्रतेच्या मूळ संस्काराच्या रूपाला अनुभव करा, यालाच म्हणतात श्रेष्ठ लकिर किंवा श्रेष्ठ रेषा असणारे.पाया तर पक्का आहे ना?

तीसरी रेषा खऱ्या सेवाधारी ची आहे. ही सेवाधारीची रेषा तर सर्वांच्या मस्तकावरती आहे.सेवे बिना पण राहू शकत नाहीत.सेवा ब्राह्मण जीवनाला नेहमी निर्विघ्न बनवण्याचे साधन पण आहे आणि परत सेवे मध्येच विघ्न पण खूप येतात.निर्विघ्न सेवाधारी मुलांनाच खरे सेवाधारी म्हटले जाते. विघ्न येणे हे पण अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे, येणारच आहेत आणि येत राहतील, कारण हे विघ्न किंवा परीक्षा अनुभवी बनवतात.याला विघ्न न समजता अनुभवा मध्ये प्रगती होत आहे, या भावा द्वारे पहा तर प्रगतीची शिखरे अनुभव होईल. याद्वारे पुढे जायचे आहे कारण सेवा म्हणजेच संघटन,सर्वाच्या आशीर्वादाचा अनुभव करणे आहे. सेवाच सर्वांचे आशीर्वाद मिळण्याचे साधन आहे, या विधीद्वारे या प्रक्रिये द्वारे पहा, तर नेहमी असे अनुभव कराल की, अनुभवाच्या शक्ती मध्ये वृध्दी होत आहे. या विघ्नाला विघ्न न समजता, विघ्न म्हणजे निमित्त बनलेल्या आत्म्याला विघ्न न समजता अनुभवी बनणारे शिक्षक समजा.जेव्हा म्हणतात निंदा करणारे माझे मित्र आहेत,तर विघ्नाला दूर करून,अनुभवी बनवणारे शिक्षक झाले ना. हा पाठ शिकवला आहे ना.जसे आजकालच्या रोगांना दूर करणारे डॉक्टर, व्यायाम करून घेतात,तर व्यायाम करण्यामध्ये पण प्रथम कष्ट होतात,परंतु ते कष्ट नेहमीसाठीच कष्ट मुक्त, रोगमुक्त बनण्याचे निमित्त असतात.ज्यांना हे समजत नाही, ते ओरडत राहतात की, यांनी तर आणखीनच कष्ट दिले, परंतु या कष्टामध्येच औषध लपलेले आहे. या प्रकारचे रुप जरी विघ्नाचे आहे, तुम्हाला विघ्नकारी आत्मा दिसून येते, परंतु नेहमीसाठी विघ्न दूर करण्याच्या निमित्त अचल बनवण्याच्या निमित्त तेच बनतात, म्हणून नेहमी निर्विघ्न सेवाधारीलाच खरे सेवाधारी म्हणतात.असे श्रेष्ठ रेषा असणाऱ्यांना च खरे सेवाधारी म्हटले जाते.

सेवेमध्ये नेहमी स्वच्छ बुद्धी स्वच्छ वृत्ती आणि स्वच्छ कर्म, सफलतेचा सहज आधार आहे. कोणतेही सेवेचे कार्य सुरू करतात तर, प्रथम हे तपासून पहा कि बुद्धी मध्ये,कोणा आत्म्याच्या प्रति पण स्वच्छता ऐवजी जर, भूतकाळात झालेल्या गोष्टीची जरा पण स्मृती असेल, तर त्याची वृत्ती दृष्टी द्वारे, त्यांना पाहणे त्यांच्याशी बोलणे होते,तर सेवेमध्ये स्वच्छते ऐवजी,जी संपूर्ण सफलता व्हायला पाहिजे,ती होत नाही. झालेल्या गोष्टींना किंवा वृत्ती इत्यादींना, सर्वांना समाप्त करणे ही स्वच्छता आहे. झालेल्या गोष्टीचे विचार करणे पण,काही टक्केवारी मध्ये हलके पापच आहे.संकल्प पण सृष्टी बनवते.वर्णन करणे तर खूप मोठी गोष्ट आहे, परंतु संकल्प केल्यामुळेच जुन्या संकल्पाची स्मृती सृष्टी किंवा वातावरण पण असे बनते.परत असे म्हणतात मी जे म्हटले होते असेच झाले ना, परंतु काय झाले? तुमच्या कमजोर संकल्पा द्वारे, व्यर्थ वातावरणाची सृष्टी बनली ना,म्हणून नेहमी खरे सेवाधारी म्हणजेच जुन्या वातावरणाला समाप्त करणारे. जसे वैज्ञानिक, शस्त्रा द्वारे शस्त्रांना नष्ट करतात. एका विमाना द्वारे दुसरे विमान पाडतात. युद्ध करतात तर समाप्त करतात ना.तर तुमचे शुद्ध प्रकंपन पण शुद्ध वातावरणामध्ये विलीन होऊ शकतात आणि व्यर्थ पणाला समाप्त करू शकतात. संकल्प संकल्पना समाप्त करू शकतात. जर तुमचे शक्तिशाली संकल्प आहेत, तर समर्थ संकल्प, व्यर्थला नष्ट जरूर करतील, समजले.सेवेमध्ये प्रथम स्वच्छता म्हणजे पवित्रतेची शक्ती पाहिजे. या तीन रेषा चमकताना पाहत आहेत.

सेवेच्या विशेषतांच्या अनेक गोष्टी ऐकवल्या पण आहेत. सर्व गोष्टीचे सार आहे, निस्वार्थ निर्विकल्प स्थिती द्वारे सेवा करणेच,सफलतेचा आधार आहे.याच सेवेमध्ये स्वत: पण संतुष्ट आणि आनंदित राहतात आणि दुसरे पण संतुष्ट राहतात.सेवेशिवाय संघटन होत नाही. संघटनांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या विचार,वेगवेगळे प्रकार, साधन हे तर होणारच आहे. गोष्टी येतात पण, वेगवेगळे साधन ऐकत पण,नेहमी स्वतः नेहमीच अनेकांना एक बाबाची आठवण देणारे, एकरस स्थितीमध्ये राहणारे बना. कधीच अनेकता मध्ये संभ्रमित होऊ नका,आता काय करायचे आहे, खूप विचार चालले. कोणाचे ऐकायचे,कोणाचे नाही ऐकायचे.जर निस्वार्थ भावाद्वारे निर्णय कराल तर,कधी कोणालाही व्यर्थ संकल्प येणार नाहीत,कारण सेवेच्या शिवाय राहू शकत नाहीत. आठवणींशिवाय पण राहू शकत नाहीत,म्हणून सेवेची वृद्धी करत चला. स्वतःला पण स्नेह, सहयोग आणि निस्वार्थ भावामध्ये वृध्दी करत चला.बापदादांना पण आनंद होत आहे की, देश परदेशांमध्ये लहान-मोठे सर्वांनी उमंग उत्साहा द्वारे सेवेचा पुरावा दिला.परदेशा मध्ये पण सफलतापूर्वक सेवेचे कार्य संपन्न झाले,सफल झाले आणि देशांमध्ये पण सर्वांच्या सह्योगा द्वारे सर्व कार्य संपन्न झाले, सफल झाले. बाप दादा मुलांच्या सेवेची लगन पाहून हर्षित होतात, आनंदित होतात.सर्वांचे लक्ष बाबांना प्रत्यक्ष करण्याचे चांगले राहिले आणि बाबांच्या स्नेहा मध्ये कष्टाला प्रेमामध्ये बदलून कार्याचे प्रत्यक्षफळ दाखवले. सर्व मुलं विशेष सवेच्या निमित्त आलेले आहेत. बापदादा पण वाह मुलांनो! वाह! चे गीत गात राहतात.सर्वांनी खूप चांगली सेवा केली, कोणी केली,कोणी नाही केली, असे झाले नाही. जरी लहान स्थान असेल किंवा मोठे स्थान असेल परंतु लहान स्थान असणारे पण कमी नाहीत, म्हणून सर्वांच्या श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ इच्छाद्वारे कार्य चांगले राहिले आणि नेहमी चांगले होत राहिल.वेळ पण खूप लागला, संकल्पण खूप चालले, नियोजन पण केले तर संकल्प पण केले ना.शरीराची शक्ती पण लावली, धनाची शक्ती पणाला लावली, संघटनेची शक्ती पण लावली.सर्व शक्तींच्या आहुती द्वारे सेवेचा यज्ञ दोन्हीकडे, देश परदेशा मध्ये सफल झाले. खूप चांगले कार्य केले, चांगले केले की नाही केले, हा तर प्रश्नच नाही. नेहमी चांगलेच होत आहे आणि चांगले होत राहिल. मग ते एक लाख शांतीच्या मिनिटाचे कार्य केले किंवा स्वर्णजयंती चे कार्य केले, दोन्ही कार्य सुंदर राहिले. ज्या विधीद्वारे केले ती विधी पण ठीक आहे. कुठे कुठे गोष्टीची किंमत वाढवण्यासाठी पडद्यामध्ये ती गोष्ट ठेवली जाते.पडदा आणखीनच किमंत वाढवतो आणि जिज्ञासा उत्पन्न होते की पाहू या, पडद्याच्या आत मध्ये काहीतरी जरूर असेल, परंतु हाच पडदा प्रत्यक्षता होण्याचा बनेल.पडदा तयार होत आहे,धरती मध्ये जेव्हा बीज पेरले जाते,तर ते जमिनी मधे लपवले जाते.बिजाला बाहेर ठेवले जात नाही,जमीनीमध्ये पेरले जाते आणि फल किंवा वृक्ष गुप्त बिजाचे स्वरुप प्रत्यक्ष आहे.तर आत्ता बीज पेरले आहे,वृक्ष बाहेर रंगमंचा वरती स्वतः येत राहील.आनंदामध्ये नाचत आहात ना?"वाह बाबा" तर म्हणतात, परंतू "वाह सेवा" पण म्हणतात.अच्छा, समाचार तर सर्व बापदादांनी ऐकले.या सेवेद्वारे जे देश परदेशाच्या संघटना द्वारे,वेग वेगळ्या वर्गाची सेवा झाली, हे चहूबाजूला एकाच वेळेस आवाज बुलंद होण्याचे चांगले साधन आहे. पुढे पण जे पण कार्यक्रम कराल, परंतु एकाच वेळेत देश परदेशामध्ये चहूबाजूला एकाच प्रकारची सेवा करून,परत सेवेचे फलस्वरूप मधुबन मध्ये संघटित रूपामध्ये घेऊन या.चहूबाजूला एक लहर असल्यामुळे,सर्वांमध्ये उमंग उत्साह पण येतो आणि चहूबाजूला आत्मिक स्पर्धा होते, द्वेष वाटत नाही की आम्ही जास्तीत जास्त सेवेचा पुरावा देऊ.तर या उमंग उत्साहा द्वारे चहूबाजूला नाव बुलंद होत आहे, म्हणून कोणत्याही वर्गाचे बनवा परंतु चहूबाजूला संपूर्ण वर्ष एकच रुपरेखा हवी आणि सेवेकडे लक्ष जावे.तर त्या आत्म्यांना पण संघटन पाहून उमंग उत्साह येतो आणि पुढे जाण्याची संधी पण मिळते. या विधीद्वारे नियोजन करत,सेवेची वृध्दी करा.प्रथम आपल्या क्षेत्रामध्ये त्या वर्गाची सेवा करत, लहान-लहान संघटन रूपामध्ये कार्यक्रम करत रहा आणि त्या संघटना द्वारे परत जे पण विशेष आत्मे आहेत, त्यांना या मोठ्या संघटनासाठी तयार करा, परंतु प्रत्येक सेवा केंद्र किंवा आपसमध्ये मिळून कार्य करा. कारण काही जण मधुबन पर्यंत पोहोचू शकत नाही,तर तेथे पण जे संघटनाचे कार्यक्रम होतील,त्याचा लाभ त्यांना मिळू शकेल.तर प्रथम लहान लहान स्नेहमिलन करा, परत विभाग(झोन ) म्हणून संघटन करा, परत मधुबन मध्ये मोठे संघटन होईल.तर प्रथम पासूनच अनुभवी बनून परत मधुबन पर्यंत येतील. परंतु देश विदेशामध्ये एकच विषय हवा आणि एकाच वर्गाचे पण हवेत. असे पण विषय हवेत,ज्यामध्ये दोन- चार वर्गाचे मिळून पण करू शकतात. विषय मोठा असेल तर दोन-तीन वर्गाचे पण त्याच विषयामध्ये येऊ शकतात. तर आत्ता देश विदेशामध्ये धर्मसत्ता, राजसत्ता आणि विज्ञानाची सत्ता तिघांचे उदाहरण तयार करा.अच्छा.

सर्व पवित्रतेच्या वरदानाच्या अधिकारी आत्म्यांना, नेहमी एकरस, निरंतर योगी जीवनाच्या अनुभवी आत्म्यांना, नेहमी प्रत्येक संकल्प,प्रत्येक वेळी खरे सेवाधारी बनणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, विश्व-स्नेही, विश्व-सेवाधारी बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
एकत्रित स्वरूपाच्या स्मृती द्वारे,अभुल बनणारे निरंतर योगी भव

जे मुलं स्वतःला बाबांच्या सोबत एकत्रित पणाचा अनुभव करतात, त्यांना निरंतर योगी भवचे वरदान स्वतः मिळते,कारण ते जेथे पण राहतात,मिलन मेळा होत राहतो. त्यांना कोणी कितीही विसरवण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते अभुल बनतात.असे अभुल मुलंच बाबांना अतिप्रिय आहेत, तेच निरंतर योगी आहेत, कारण प्रेमाची लक्षणं स्वतः आठवण आहे.त्यांच्या संकल्प रुपी नखाला पण माया हलवू शकत नाही.

सुविचार:-
कारण ऐकवण्याच्या ऐवजी त्याचे निवारण करा, तर आशीर्वादाचे अधिकारी बनाल.